विकास परियोजनांची अंमलबजावणी
नियम १२३ विकास परियोजनांची अंमलबजावणी जिल्हा परिषदेकडे सोपविणे
राज्य शासनास त्याच्याकडून विनिर्दिष्ट करण्यात येतील अशा शर्तींच्या व निर्बंधाच्या अधीनतेने त्यास योग्य वाटतील अशा कामांची किंवा विकास परियोजनांची (मग अशी कामे किंवा परियोजना त्या जिल्हयातील असोत किंवा जिल्हयाबाहेरील असोत आणि जिल्हा यादीतील कोणत्याही विषयासंबंधीच्या असोत वा नसोत) अंमलबजावणी किंवा ती सुस्थीतीत ठेवणे शासकीय राजपत्रातील आदेशाद्वारे कोणत्याही जिल्हा परिषदेकडे किंवा पंचायत समितीकडे किंवा दोन्हीकडे सोपविता येईल आणि तद्नुसार ती कामे त्या विकास परियोजना पार पाडणे किंवा सुस्थीतीत ठेवणे हे जिल्हा परिषदेचे किंवा पंचायत समितीचे किंवा यथास्थिती दोहोंचे कर्तव्य असेल.
नियम १२४ जिल्हा परिषदेने पंचायत समितीमार्फत कामे आणि विकास परियोजना पार पाडणे
या अधिनियमाच्या पूर्वगामी तरतुदीत काहीही अंतर्भुत असले तरी परंतू राज्य शासनाने या बाबत विहीत केलेल्या नियमांचे अधीनतेने जिल्हा परिषद जी कामे किंवा विकास परियोजना पार पाडण्याचे किंवा सुस्थीतीत ठेवण्याचे ठरवील अशी कोणतीही कामे किंवा विकास परियोजना पार पाडायचे किंवा त्या सुस्थीतीत ठेवण्याचे काम जिल्हयांमध्ये पंचायत समितीच्या अभिकरणामार्फत करण्यात येईल.
नियम १२७ निरीक्षण करण्याचा व तांत्रिक मार्गदर्शन वर्गरे देण्याचा राज्य शासनाचा किंवा अधिका-यांचा अधिकार
जिल्हा परिषदेने किंव पंचायत समितीने हाती घेतलेले कोणतेही काम किंवा विकास परियोजना कार्यक्षम रीतीने किंवा काटकसरीने पार पाडण्याच्या किंवा त्या सुस्थितीत ठेवण्याच्या प्रयोजनासाठी राज्य शासनाच्या सर्वसाधारण किंवा विशेष आदेशाद्वारे प्राधिकरत केलेल्या अधिका-यास व्यक्तिस असे वाटले की जिल्हा परिषदेच्या किंवा तिच्या नियंत्रणाखाली असलेल्या ज्या कोणत्याही अधिका-याकडे किंवा कर्मचा-याकडे असे कोणतेही काम किंवा विकास परियोजना पार पाडण्याचे किंवा ती सुस्थितीत ठेवण्याचे काम सोपविले असेल त्यास त्या परियोजनेसाठी तांत्रिक मार्गदर्शन किंवा सहाय्य देणे.
आवश्यक आहे तर काम सोपविले असेल त्यास त्या प्रयोजनासाठी तांत्रिक मार्गदर्शन किंवा सहाय्य देणे आवश्यक आहे तर अशा रीतीने प्राधिकरत केलेल्या अधिका-यास किंवा व्यक्तिस अशा कामाचे किंवा विकास परियोज्ानेचे नियतकालाने निरीक्षण करता येईल आणि अशा कामांच्या किंवा विकास परियोजनांच्या संबंधात त्यास आवश्यक वाटेल असे मार्गदर्शन करता येईल किंवा सहाय्य सल्ला देता येईल आणि तो आपण केलेल्या निरीक्षणाचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिका-याकडे सादर करील व त्यात अशा निरीक्षणात आढळून आलेल्या नियमबाहय आणि सुधारणेसाठी आपल्या सूचना नमूद करील.