स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण)
- सातारा जिल्हा परिषद - जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन विषयक माहिती
- Citizen Corner
- [ Format F28 A ] No. of Uploaded Photograph so far using Mobile Application 28/08/2017
- [ Format A03 ] Swachh Bharat Mission Target Vs Achievement of BLS - 2012 (Deatil Entry Status)
पार्श्वभूमी
पिण्याच्या पाण्याची पर्याप्त उपलब्धता आणि स्वच्छतेच्या योग्य पध्दतीवर वैयक्तिक आरोग्य आणि स्वच्छता मोठया प्रमाणावर अवलंबून असते म्हणून पाणी, स्वच्छता आणि आरोग्य यामध्ये एक परस्पर संबंध आहे. पिण्यासाठी असुरक्षित पाण्याचा वापर, चुकीच्या पध्दतीने मलमुत्राची विल्हेवाट, वातावरणातील अस्वच्छता, वैयक्तिक आणि खादयपदार्थाच्या स्वच्छतेचा अभाव ही विकसनशील देशातील अनेक रोगांची मुख्य कारणे आहेत. भारतही याला अपवाद नाही. ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान सुधारण्याच्य आणि महिलांना आत्मसन्मान मिळवून देण्याच्या हेतूने १९८६ साली सरकारने केंद्रीय ग्रामीण स्वच्छता कार्यक्रमाची (CRSP) सुरुवात केली.
स्वच्छतेच्या संकल्पनेचा विस्तार करुन त्यात वैयक्तिक स्वच्छता, घराची स्वच्छता, पिण्यायोग्य शुध्द पाणी, केर- कचयाची विल्हेवाट, मलमूत्राची विल्हेवाट आणि सांडपाण्याची विल्हेवाट इत्यादी गोष्टींचा समावेश करण्यात आला. स्वच्छतेच्या या विस्तारीत संकल्पनेसह केंद्रीय ग्रामीण स्वच्छता कार्यक्रम (CRSP) चे रुपांतर १९९९ मध्ये मागणी आधारीत दृष्टीकोनासह संपूर्ण स्वच्छता अभियान (TSC) असे झाले. ग्रामीण लोकांमध्ये याबद्दलची जागृती आणि स्वच्छतेच्या सोयीबद्दलची मागणी निर्माण व्हावी यासाठी सुधारित दृष्टिकोनात माहिती, शिक्षण आणि संवाद (IEC), मनुष्यबळ विकास, क्षमता विकास उपक्रम यावर भर देण्यात आला होता. यामुळे आपल्या आर्थिक स्थितीप्रमाणे योग्य त्या पर्यायांची व निधी वाटप यंत्रणेची निवडीची लोकांची क्षमता वाढली. या कार्यक्रमाची लोकपुरस्कृत आणि लोककेंद्रीत पुढाकारावर लक्ष ठेवून अंमलबजावणी करण्यात आली. वैयक्तिक घरगुती शौचालय बांधून वापरण्यासाठी दारिद्रयरेषेखालील लोकांना आर्थिक प्रोत्साहनपर निधी देण्यात आला.
घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनांतर्गत उपक्रम घेण्याव्यतिरिक्त शालेय स्वच्छतागृह, अंगणवाडी शौचालये आणि सार्वजनिक स्वच्छता संकुले बांधण्यासाठीही सहाय्य पुरविण्यात आले.
संपूर्ण स्वच्छता अभियानाला नवी उभारी देण्यासाठी भारत सरकारने निर्मलग्राम पुरस्कार (NGP) सुरु केला. या पुरस्काराच्या माध्यमातून संपूर्ण स्वच्छतेसाठी झालेल्या प्रयत्नांची आणि फलितांची दखल घेतली गेली. निर्मल ग्राम पुरस्काराला प्रचंड लोकप्रियता मिळाली आणि निर्मल दर्जा मिळविण्यासाठी समाजात एक मोठी चळवळ सुरु करण्याचे श्रेय या पुरस्काराकडे गेले. निर्मलग्राम पुरस्काराच्या माध्यमातून ग्रामीण क्षेत्रातील स्वच्छतेची व्याप्ती वाढविण्यास मोठी मदत झाली.
निर्मल ग्राम पुरस्काराच्या यशाने प्रोत्साहित होऊन संपूर्ण स्वच्छता अभियानाचे निर्मल भारत अभियान असे नामांतर करण्यात आले. तसेच दारिद्रय रेषेबरोबर दारिद्रय रेषेवरील कुटूंबांनाही शौचालयाचे प्रोत्साहन अनुदान देण्यास सुरुवात झाली. त्याच बरोबर महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून वैयक्तिक शौचालयासाठी रु.५४२०/- देण्याचा निर्णय घेण्यात आला.
सुधारित धोरण आणि पर्याप्तेच्या माध्यमातून ग्रामीण समाजाला पूर्णपणे सामावून घेण्यासाठी मा.पंतप्रधान यांनी २ ऑक्टोबर २०१४ पासून स्वच्छ भारत मिशन राबविण्यास सुरुवात केली. यामध्ये महात्मा गांधीजींच्या १५० व्या जयंती निमित्त २ ऑक्टोबर २०१९ मध्ये संपूर्ण भारत स्वच्छ करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. यासाठी घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनासह हागणदारीमुक्तीचा कार्यक्रम जुन्या उणिवा दूर करुन प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.
स्वच्छ भारत मिशन उद्दिष्ट :
- स्वच्छता, आरोग्यदायी सवयी व हागणदारी मुक्तीव्दारे ग्रामीण क्षेत्रातील सर्वसाधारण जीवनमानात सुधारणा घडवून आणणे.
- ग्रामीण भागातील स्वच्छतेच्या व्याप्तीची गती वाढवून 2 ऑक्टोबर 2019 पर्यंत स्वच्छ भारतचे स्वप्न साकार करणे.
- शाश्वत स्वच्छतेच्या साधनांचा प्रसार करणाया पंचायतराज संस्था आणि सामाजिक गटांना जाणीव जागृती व आरोग्य शिक्षण याव्दारे प्रेरित करणे.
- पर्यावरणाच्या दृष्टीने सुरक्षित कायमस्वरुपी स्वच्छतेसाठी स्वस्त आणि योग्य तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देणे.
- ग्रामीण भागात सार्वत्रिक स्वच्छता राखण्यासाठी लोकांचे व्यवस्थापन असलेल्या आणि घनकचरा व सांडपाण्याच्या विल्हेवाटीला प्राधान्य देणाया पर्यावरणास अनुकूल स्वच्छतेच्या पध्दती विकसित करणे.
स्वच्छ भारत मिशनचे घटक :
1) माहिती शिक्षण, संवाद व क्षमता बांधणी उपक्रम :
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत माहिती शिक्षण संवाद व क्षमता बांधणी उपक्रम हा मुलभूत घटक असून लोकांच्या मानसिकतेमध्येय बदल घडवून आणून वैयक्तिक शौचालय व घनकचरा सांडपाणी व्यवस्थापनाच्या कामास चालना देणे हा हेतू आहे. शौचालय बांधणे व शौचालयाचा नियमित वापर करावा यासाठी गृहभेट व वर्तणूक बदल उपक्रमाव्दारे लोकांचे मनपरिवर्तन घडविणे. त्याचबरोबर ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावर माहिती शिक्षण संवादाच्या विविध उपक्रमांव्दारे लोकांचे प्रबोधन करण्यात यावे. तसेच स्वच्छ भारत मिशनची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी ग्रामपंचायतस्तर ते जिल्हा स्तरावरील लोकप्रतिनिधी व अधिकारी व कर्मचारी यांचेसाठी प्रशिक्षणे आयोजित करुन त्यांची स्वच्छता व पाणी विषयक ज्ञान कौशल्य व दृष्टिकोनात बदल घडवून आणणे हा हेतु आहे.
2) वैयक्तिक शौचालय बांधकाम :
कुटुंबांसाठी बांधण्यात आलेले शौचालय 4 भिंती, दरवाजा व छतासह पूर्णपणे बांधकाम केलेले असेल. तसेच शौचालयासोबत वापरासाठी पाण्याची व हात धुण्याची सुविधा असेल. सर्व ग्रामीण कुटुंबांना या अंतर्गत समाविष्ट करणे हे या कार्यक्रमांचे उद्दिष्ट आहे. या योजने अंतर्गत दिला जाणारा प्रोत्साहन अनुदान ग्रामपंचायत स्तरावरील खालील कुटूंबांना देय असेल.
1) दारिद्रय रेषेखालील सर्व कुटूंबे
2) दारिद्रय रेषेवरील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, लहान व सिमांतिक शेतकरी, घर असलेले भूमिहिन मजूर, शारिरिक दृष्टया अपंग व महिला कुटुंबप्रमुख असलेली कुटुंबे.
- वैयक्तिक शौचालयासाठी प्रोत्साहन अनुदान एकुण र.रु.१२०००/- देय आहे.
- ज्या कुटुंबाचा समावेश स्वच्छ भारत मिशनच्या बेसलाईन यादीमध्ये नाही त्या कुटुंबाना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतुन र.रु.१२०००/- चा लाभ देता येईल.
- इंदिरा आवास योजनेच्या किंवा राज्याच्या कोणत्याही ग्रामीण गृहनिर्माण योजने अंतर्गत बांधलेल्या घरातील ज्या कुटुंबांकडे शौचालय नाही त्यांनी स्वच्छता सुविधा निर्माण केल्यास ते स्वच्छ भारत मिशन अंतर्गत मिळणाया प्रोत्साहन अनुदानास पात्र राहतील.
- दारिद्रय रेषेवरील जी कुटुंबे वरील प्रोत्साहनपर अनुदान मिळण्यास पात्र नसतील त्यांनी स्वप्रेरणेतून आपल्या घरात शौचालय बांधण्याचे काम हाती घ्यावयाचे आहे.
- ग्रामीण भागात बादलीचा वापर असलेले शौचालय बांधण्याची परवानगी नाही. तसेच मानवाव्दारे मैला वाहतूक करणे, कायदयाने गुन्हा असल्याने अशा शौचालयाचे तात्काळ स्वच्छता शौचालयात रुपांतर करण्यात यावे.
3) सार्वजनिक शौचालये :
सार्वजनिक शौचालये हा स्वच्छ भारत मिशन अंतर्गत एक घटक आहे. योग्य संख्येत शौचालये, स्नानगृहे, कपडे धुण्यासाठीच्या जागा, वॉशबेसिन असलेली संकुले, गावातील सगळयांना मान्य असतील आणि सहज वापरता येतील अशा जागी उभारता येतील. सामान्यपणे कुटुंबांना शौचालय बांधणेसाठी जागा उपलब्ध नसेल आणि कुटुंबांनी सार्वजनिक शौचालयांची संचालन आणि देखभाल दुरुस्तीची जबाबदारी स्वीकारली तरच सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम करावे. सार्वजनिक शौचालये मोठया ग्रामपंचायती, बाजारपेठेची गावे, सार्वजनिक ठिकाणी, तरंगती लोकसंख्या, यात्रा स्थळ, अशा ठिकाणी सार्वजनिक शौचालये उभारण्यात यावीत. एका सार्वजनिक स्वच्छता संकुलासाठी रु.2 लाखापर्यंतचा कमाल खर्च प्रस्तावित करण्यात आला आहे. यासाठीचा केंद्रहिस्सा 60 टक्के राज्य हिस्सा 40 टक्के राहिल. नवीन धोरनानुसार वैयक्तीक शौचालयावर भर देण्यात आला आहे त्यामुळे सार्वजनिक शौचालयांना स्थगिती देण्यात आली आहे.
4) घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन :
घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनांतर्गत कंपोस्ट खड्डे, गांडूळ खत निर्मिती, बायोगॅस प्रकल्प, कुटुंबांकडील कचरा गोळा करणे, वेगळा करणे त्याचा पुर्नवापर व विक्री आणि त्यांचे व्यवस्थापन करणे व सांडपाणी व्यवस्थापणा अंतर्गत कमी खर्चाचे जलनि:सारण,सार्वजनिक शोषखड्डे, सार्वजनिक पाझरखड्डे, शोषनाली/ खड्डे, स्थिरीकरण तळे, गावातील सांडपाण्याचा पुर्नवापर असे उपक्रम राबविता येतील. यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना या योजनेची सांगड घालता येईल.
मानवी मलमूत्र व्यवस्थापन
मानव मनलमत्र व्यवस्थापन ही देशापुढील आरोग्याच्या व स्वच्छतेच्या दृष्टीने एक महत्वपूर्ण समस्या आहे. जवळजवळ 60% आजार केवळ मानवी मलमूत्रामुळे होणा-या माती व पाण्याच्या प्रदूषणामुळे मोठया प्रमाणावर आजार पसरतात. साहजिकच मानवी मलमूत्राद्वारे होणारे हे प्रदूषण टाळणे महत्वाचे आहे. ग्रामीण परिसरामध्ये पारंपारीक मलनि:स्सारण पद्धती, त्याकरीता होणारी मोठी भंाडवली गुंतवणूक, न परवडणारी देखभाल, व्यवस्थापन खर्च, पाण्याचा अपुरा पुरवठा, विखुरलेल्या वस्त्या व गावे इ. मुळे शक्य होत नाही. पारंपारीक वागणूक पद्धती, तंत्रज्ञानाबद्दल अपुरी माहीती आणि काही अंशी आर्थिक परिस्थितीमुळे उघड्यावर मल विसर्जन मोठया प्रमाणावर केले जाते. याव्दारे जमीन आणि पाणी यांचे प्रदूषण सातत्याने होत रहाते. यामधून जमीन, पाणी इत्यादीमध्ये मिसळलेले रोगजंतू पाणी, धूळ, प्राणी, माशी यासारखे कीटक, अस्वच्छ हात इत्यादीद्वारे माणसाच्या खाद्य पदार्थांपर्यंत पोहोचतात व त्यांना रोगबाधा होते. हगवण, जंत, कावीळ, टायफॉईड (विषमज्वर), पोलीओ, कॉलरा इत्यादी रोग केवळ विष्ठेद्वारा होणा-या प्रदूषणातून पसरतात. विष्ठेद्वारा पसरणा-या रोगांमुळे देशात सुमारे दहा लाख मृत्यू होतात. शिवाय होणारे आर्थिक नुकसान वेगळेच. अशा परिस्थितीमध्ये विष्ठेचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी शौचालयांचे बांधकाम करणे व वापरणे अगत्याचे आहे. यामुळे आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे रोगमुक्ती, प्रसन्न वातावरण व स्वच्छ परिसर हे फायदे होतील. त्याबरोबरच संकोचमुक्ती, शरीर स्वास्थ्यामुळे होणारी उत्पन्न वृद्धि मिळणा-या खतामुळे शेतातील उत्पन्नवृद्धी इत्यादी सामाजिक व कौटुंबिक फायदे आहेतच. शौचालय बांधताना, तो कोणत्या प्रकारचा बांधावा, या बाबत ब-याचदा स्पष्टता नसते. यासाठी शौचालय बांधताना कोणत्या बाबींकडे किमान लक्ष दयावे याबाबतची तांत्रीक निकष आणि शौचालयाचे विविध पर्याय या बाबतची माहिती खाली देण्यात आली आहे.
गावपातळीवर शौचालयांचे बांधकाम करण्यासाठीचे तांत्रिक निकष खालील प्रमाणे आहेत.
- बांधकामाच्या दृष्टीने सोपे
- वापरण्याच्या दृष्टीने सुलभ
- कमी खर्चाचे व आर्थिक दृष्ट्या परवडणारे
- देखभाल दुरूस्तीच्या दृष्टीने सोपे
- पर्यावरणाशी संतुलन ठेवणारे
- अंतिम उत्पादन पुनर्वापर करण्यायोग्य असावे
- रोगप्रतिबंधक असावा
वरील निकषांची पूर्तता करणारी आज गावपातळीवर शौचालयांचे बांधकाम करण्यासाठी शौचालयांचे विविध पर्याय उपलब्ध आहेत. त्याची माहिती खाली दिली आहे.
- दोन पाझर खड्ड्यांचे शौचालय
- सेप्टीक टँक पद्धतीचे शौचालय
- काम्पोस्ट किंवा इकोसॅन पद्धतीचे शौचालय
- बायोगॅस पद्धतीचे शौचालय
राज्यातील परिस्थितीचा विचार करता लोकांमध्ये वरीलपैकी दोन प्रकारच्या शैाचालयांचे बांधकाम करण्याचा कल दिसून येतो. यामध्ये 1) दोन शोष खड्ड्यांचा शौचालय आणि 2) सेप्टीक टँक पध्दतीचा शौचालय. या विषयीची तपशीलवार माहिती खालील भागात देण्यात आलेली आहे. वरील दोन प्रकारच्या शौचालयाच्या बांधकामामध्ये दोन प्रमुख भाग येतात. - शौचालय बैठक, विष्ठा वाहून नेण्याची व्यवस्था आणि विष्ठेचे अंतिम व्यवस्थापन
- संडास घर
शौचालयातील बैठक, विष्ठा वाहून नेण्याची व्यवस्था आणि विष्ठेचे अंतिम व्यवस्थापन हे भाग अत्यंत मह्त्वाचे असून विष्ठेच्या अंतिम व्यवस्थेसाठी खबरदारी घेतली नसेल तर ते आरोग्यप्रद शौचालय होणार नाही. संडासघर हे केवळ आडोशासाठी बांधायचे असून हे बांधकाम आर्थिक कुवतीनुसार कच्चे/पक्के बांधता येते.
1. दोन शोष खड्ड्यांचे शौचालय
तंत्रज्ञानातील मुख्य घटक आणि प्रक्रिया
या तंत्रज्ञानामध्ये तीन प्रमुख घटक आहेत
1. दोन शोष खड्डे - यामध्ये विष्ठेचे विघटन किंवा कुजण्याची प्रक्रिया होते.
2. शौचालयाची बैठक आणि विष्ठा वाहून नेण्याची व्यवस्था - बैठक व्यवस्थेमध्ये शौचालयातील मलपात्र आणि जलबंध पात्र यांचा समावेश होतो. तसेच विष्ठा खड्ड्यांपर्यत वाहून नेण्यासाठी निरीक्षण कुंडी आणि इंग्रजीतील ‘ज्ञ्’ आकाराप्रमाणे बसवण्यात येणारे पाईप्स यांचा समावेश होतो.
3. संडास घर - शौचाला बसणा्यया व्यक्तिला पुरेसा आडोसा मिळण्याच्या दृष्टीने संडास घर बांधण्यात येते. यामध्ये भिंती, छप्पर आणि दरवाजा यांचा प्रामुख्याने समावेश होतो. विष्ठेचे विघटन प्रामुख्याने पाझर खड्ड्यामध्ये होते. विष्ठा पाण्याच्या सहाय्याने खड्ड्यापर्यंत वाहून नेली जाते. प्रक्रियेमधून तयार होणारे पाणी आणि वायू खड्ड्याभोवतीच्या मातीमध्ये शोषून घेतले जाते. यामुळे विष्ठा कोरडी होते आणि ऑक्सीजनच्या सानिध्यात वाढणाया जीवाणूंच्या सहाय्याने विष्ठेचे विघटन होते.
तंत्रज्ञानाची उपयुक्तता (वैयक्तिक सामुदायिक पातळी)
शोष खडडयाचे तंत्रज्ञान हे प्रामुख्याने वैयक्तिक पातळीवर घरगुती वापरासाठी उपयोगी ठरते. सार्वजनिक पातळीवर या शौचालयाचा उपयोग करताना खड्ड्यांच्या आकारमानामध्ये आवश्यकतेनुसार बदल करणे महत्वाचे आहे. साधारणपणे या प्रकारचे शौचालय 8-10 माणसांच्यासाठी पुरेसे आहे. एका वेळी एक खड्डा वापरल्यास साधारणपणे वरील माणसांसाठी एक खड्डा कमीत कमी 7 वर्षे चालतो कारण एका माणसाच्या विष्ठे पासून प्रति वर्ष सुमारे 1 घनफूट खत तयार होते.
1.3 तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष बांधकाम
शोष खड्ड्यांचे बांधकाम -
खड्ड्यांचे बांधकाम वीटांची वर्तुळाकार रचना करून करण्यात येते. वीटांची वर्तुळाकार मांडणी करताना एकाआड थरांमध्ये साधारणपणे 2 इंच रूंदीची 6 ते 7 भोके ठेवण्यात येतात. या भोकांमुळे खड्ड्यात जाणारे पाणी आणि वायू मातीत शोषून घेण्याची प्रक्रिया सहज होते. खडड्यांच्या बांधकामातील वरील एक फूटाच्या थरांमध्ये भोके ठेऊ नयेत कारण यामुळे पावसाळ्याच्या वेळी बाहेरील पाणी किंवा माती आत जाऊ शकते. त्याचप्रमाणे आतील वायूदेखील बाहेर येऊ शकतात. खड्ड्याच्या तळाला सिमेंट काँक्रीट टाकले जात नाही तसेच बाजूलाही सिमेंट काँक्रीटचा गिलावा केला जात नाही. खड्ड्यांचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर खड्ड्यांवर आर.सी.सी. झाकण किंवा शहाबाद फरशी टाकून खड्डा बंद करण्यात येतो. विष्ठेच्या विघटनासाठी खड्ड्यांचा आलटून पालटून उपयोग करावा लागतो.
शौचालयाची बैठक आणि विष्ठा वाहून नेण्याची व्यवस्था -
शौचालय बैठकीच्या मधोमध आणि मागील भिंती पासून 7-8 इंच अंतर सोडून मलपात्र आणि जलबंध पात्र बसविण्यात येते. कमी पाण्यामध्ये (1.5 ते 2 लीटर) शौचालयाचा वापर करता यावा यासाठी जास्त उतार असणारे मलपात्र आणि जलबंध पात्र (वॉटर सिल) वापरण्यात येते. बैठकीला जोडून ज्या ठिकाणी जलबंध पात्राचा (वॉटर सिल) पाईप बाहेर येतो त्याठिकाणी 1 फूट लांब आणि 1 फूट रूंद आकाराची निरीक्षण कुंडी बांधण्यात येते. निरीक्षण कुंडीमध्ये मलपात्राकडून विष्ठा वाहून आणणारा पाईप एका बाजूने येतो तर दुस्यया बाजूला 4 इंच व्यासाचे दोन पाईप आवश्यक त्या लांबीनुसार "ज्ञ्" आकारामध्ये बसविण्यात येतात. या पाईपच्या माध्यमातून विष्ठा खड्ड्या कडे वाहून नेली जाते. एकावेळी एकच खड्डा वापरता यावा यासाठी निरीक्षण कुंडीमधून जो खड्डा वापरायचा नसेल त्या खड्ड्याकडे जाणा्यया पाईपचे तोंड बंद करून ठेवावे.
संडास घर
संडास घराचे बांधकाम आर्थिक कुवत आणि सोयीप्रमाणे बांधता येऊ शकते. यामध्ये विटांचे बांधकाम, सिंमेट काँक्रीट चे संडास घर बांधता येऊ शकेल.
1.4 साधन सामग्रीची आवश्यकता
दोन खड्ड्यांचे शौचालय बांधण्यासाठी विटा, सिमेंट, वाळू, मलपात्र, जलबंध पात्र, खड्डे व निरीक्षण कुंडीसाठी झाकणे आणि पाईप्स हे साहित्य उपलब्ध असणे गरजेचे आहे. तसेच संडास घरासाठी ठरविलेल्या प्रकाराच्या आवश्यकतेनुसार लागणारे साहित्य उपलब्ध करावे लागेल.तसेच खोदकामासाठी कुदळ, फावडे, टिकाव आणि घमेली व बांधकाम अवजारे यासारख्या साहित्याची आवश्यकता असते. बांधकामासाठी किमान एक प्रशिक्षित गवंडी आणि इतर दोन अकुशल कामगार असल्यास साधारण तीन दिवसांमध्ये बांधकाम व्यवस्थित पूर्ण करणे शक्य होते.
1.5 अंदाजित खर्च भांडवली गुंतवणूक
बांधकामासाठी अंदाजे रू. 12,000 ते 15,000 खर्च येतो. देखभाल आणि दुरूस्तीसाठी विशेष खर्चाची आवश्यकता नाही. एक खड्डा बंद करून दुसरा वापरात ठेवणे, वेळोवेळी खड्डा उपसणे या देखभाल आणि दुरूस्तीच्या दृष्टीने महत्वाच्या बाबी आहेत. या सर्व बाबी घरच्या घरी करता येऊ शकतात. फक्त या कामांसाठी घरातील दोन व्यकिं्तचा साधारणपणे 1 दिवसांचा वेळ अपेक्षित आहे.
दोन शोषखड्डयांच्या शौचालय बांधकामाचे गुण :
1) हा स्वस्त आहे.सेप्टीक संडासच्या तुलनेत याला निम्याहूनही कमी खर्च येतो.
2) याला पाणी कमी लागते.
3) याला तुलनेने जागाही कमी लागते.
4) यापासून रोगराई पसरत नाही.
5) याला दुर्गंधी येत नाही.
6) यापासून उत्तम खत मिळते.
शौषखडयांचे शौचालय बांधताना लक्षात ठेवण्याचे मुद्दे :
1) तळाच्या थरातील काँक्रीट फक्त भिंतीखालीच टाकावे. मधला भाग मोकळा सोडा.
2) एका आड एका थरात खोपे सोडा. खोप्यांची संख्या व आकार वाजवीपेक्षा जास्त किंवा कमी करु नका.
3) पाईपचा व्यास 4 इंच ठेवा.
4) पाईप भिंतीच्या आत 6 इंच यायला हवी.
5) पाईपला एका फुटास दिड ते दोन इंच याप्रमाणात उतार दया.
6) चेंबरच्या तळाला सलग उतार दया. त्यात खटकी नको.
7) चेंबरमध्ये वाय आकाराची सुबक खोबण करा व तिला उत्तम घोटाई करा.
8) 20 मि.मि.वॉटर सील असलेला ट्रॅप, (कोंबडा) व 25 ते 30 अंशाचा उतार असलेले 20 इंची मलपात्र वापरा.
9) वॉटरसील ट्रॅप व मलपात्र लेवलमध्ये बसावा.
10) मलपात्र व मागील भिंत यात कमीतकमी 8 इंच अंतर ठेवा.
11) या शौचालयाला व्हेंट पाईप (गॅस पाईप) बसवू नका.
12) टाक्यांवर ढापे बसविण्यापूर्वी तळ, खोपे, पाईप, चेंबर इत्यादी सर्व साफ करा, कोठेही पडलेला माल राहू देवू नका.
13) ढाप्यांमधील फटी व्यवस्थित बुजवा.
14) ढाप्यांवर 9 ते 10 इंच मातीचा भराव टाका.
15) चेंबरवर झाकण बसविण्यापूर्वी वीट लावून एक पाईप बंद करा.
सेप्टिक टँक शौचालय :
या तंत्रज्ञानामध्ये विष्ठेचे विघटन घडवून आणण्यासाठी सिमेंट काँक्रिटमध्ये टाकीचे बांधकाम करण्यात येते. या टाकीलाच सेप्टिक टँक असे म्हणतात. या तंत्रज्ञानामध्ये हवेशिवाय वाढणा्यया जिवाणूंच्या मदतीने विष्ठेचे विघटन घडवून आणले जाते.
शौचालयाची बैठक आणि विष्ठा वाहून नेण्याची व्यवस्था - पाझर खड्ड्यांच्या शौचालयाप्रमाणेच या शौचालयामध्ये ही शौचालयाची बैठक आणि त्यामध्ये मलपात्र बसविले जाते. विष्ठेपर्यंत किटक पोहचू नयेत आणि विष्ठेच्या विघटनादरम्यान संडासघरामध्ये दुर्गंधी पस डिग्री नये या दृष्टीने जलबंध पात्र (वॉटर सील) बसविण्यात येते.
संडास घर - सेप्टीक टँक पद्धतीमध्ये शौचालयाची बैठक आणि संडास घराचे बांधकाम हे साधारण पणे दोन खड्ड्यांच्या शौचालया प्रमाणेच केले जाते. परंतू सेप्टीक टँक टाकीचे बांधकाम योग्य पद्धतीने करणे ही यातील अतिशय महत्वाची बाजू आहे.
टाकीचे आकारमान टाकीचे एकूण घनफळ उ टाकीमध्ये दरदिवशी येणारे पाणी ज्र् द्रव धारणा काळ (45 दिवस) टाकीमध्ये दोन किंवा तीन कप्पे केले जातात. तीन कप्पे केले असता सर्व कप्पे सारख्या आकाराचे असावेत. तर दोनच कप्पे करावयाचे असल्यास पहिला कप्पा मोठा म्हणजे एकूण लांबीच्या 2/3 व दुसरा कप्पा लहान म्हणजे एकूण लांबीच्या 1/3 असावा. पहिल्या कप्प्यातील पाणी दुसया कप्प्यात आणि पुढे जाण्यासाठी भिंतीमध्ये जागा ठेवण्यात येते. टाकीमध्ये येणारे मल पदार्थ साधारणपणे तीन भागात विभागले जातात. हलके पदार्थ हे वरच्या 1/3 भागामध्ये, जड पदार्थ खालच्या 1/3 भागात आणि कमीत कमी घन पदार्थ असणारे पाणी मधल्या 1/3 भागामध्ये तरंगतात. या रचनेला अनुसरून दोनही कप्प्यांमध्ये ठेवला जाणारा जोड हा मधल्या 1/3 भागामध्ये ठेवणे आवश्यक आहे. पहिल्या व दुस्यया कप्प्यांमध्ये पाणी सरकण्यासाठी ठेवण्यात येणारा जोड एकूण पाण्याच्या उंचीच्या तळातून 40% उंचीवर तर दुस्यया व तिस्यया कप्प्यांमध्ये पाणी सरकण्यासाठी ठेवण्यात येणारा जोड एकूण पाण्याच्या उंचीच्या वरपासून 40% उंचीवर ठेवण्यात येते. यामुळे कमीत कमी घन पदार्थ असणारे पाणी पुढे सरकत राहते आणि तळाशी साठून राहणाया घन पदार्थांची विघटन प्रक्रियाही व्यवस्थित चालू राहते. (आकृतीत दर्शविल्याप्रमाणे) सेप्टीक टँकमध्ये विष्ठेचे विघटन हवेच्या सान्निध्या शिवाय राहू शकणाया जीवाणूंच्या माध्यमातून होते. यामुळे या प्रकारातही मिथेन आणि अन्य गॅस तयार होतात. परंतू या प्रकारात तयार होणारे गॅस हे सेप्टीक टँक वर बसविण्यात येणाया व्हेंट पाईपच्या मदतीने हवेमध्ये सोडले जातात. हे गॅस हवेसाठी घातक असल्यामुळे या प्रकारचे गॅस हवेत सोडणे पर्यावरणाच्या दृष्टीने सुरक्षित नाही. सेप्टीक टँक मधून बाहेर पडणा्यया पाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी सोक अवे सिस्टिम किंवा पाझर खड्ड्याचे बांघकाम करणे गरजेचे आहे.
2.5 अंदाजित खर्च
साधारणपणे 1 घनमीटर आकाराच्या सेप्टीक टँकचे बांधकाम करण्यासाठी येणारा अंदाजे खर्च डिग्री 25,000 इतका आहे. सेप्टीक टँकच्या देखभाल दुरूस्तीमध्ये विशिष्ठ कालावधी नंतर गाळ उपसणे यापलीकडे विशेष खर्च नाही. सेप्टीक टँकच्या स्वच्छतेसाठी पंपाचा वापर केला जातो. ग्राम पंचायत किंवा जवळची नगर परिषद यांचे कडून पंप उपलब्ध करून घ्यावे लागतात. अशा प्रकारे पंपाने सेप्टीक टँकची स्वच्छता करण्यासाठी अंदाजे खर्च रू. 2,000 ते 3,000 आहे.
घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन :
घनकचरा :
कोणत्याही मानवी समुदायात घरगुती, सार्वजनिक व व्यापारी कामकाजामधून घनपदार्थ निरुपयोगी म्हणून बाजूला काढले जातात. प्रत्यक्षात ते पदार्थ उपयोगी असले तरी त्या वेळच्या विशिष्ट कामानंतर ते निरुपयोगी ठरतात. असे पदार्थ म्हणजेच घनकचरा.
घनकचयाचे वर्गीकरण :-
घनकचरा त्याच्या व्यवस्थापन पध्दतीच्या संदर्भानुसार चार प्रकारांत विभागता येतो.
अ) सेंद्रीय कचरा (जैविक विघटन योग्य).
आ) असेंद्रीय कचरा (जैविक विघटनास अयोग्य).
इ) धूळ, माती, खडी, इत्यादी.
ई) धोकादायक कचरा.
सेंद्रिय कचयाचे व्यवस्थापन :-
सेंद्रिय कचरा सर्वसाधारणपणे मोठया प्रमाणात ओल्या स्वरुपात असतो. यात प्रामुख्याने स्वंयपाक घरातील शिळे खरकटे अन्न, टाकाऊ भाज्या, मासे, मांस, बाजारातील टाकाऊ भाजीपाला, पालापाचोळा, झाडांच्या फांदया, कागद इत्यादी पदार्थाचा समावेश असतो.
निसर्गामध्ये सेंद्रिय पदार्थाचे विघटन व पाचन नैसर्गिकरित्या (Bacteria and Fungi) मार्फत चालू असते. मात्र माणसांची एकत्रित वस्ती झाल्यामुळे अशा वस्तीतील सेंद्रिय कचयाच्या व्यवस्थापनासाठी आपल्याला जाणीवपूर्वक व्यवस्था करावी लागते. भारतातील हवामान व वातावरण परिस्थितीत नैसर्गिकरित्या सेंद्रिय कचयावर प्रक्रिया करणे सोईचे व फायदेशीर ठरते. थंड हवेच्या देशातून ज्वलन प्रक्रिया, रासायनिक विघटन पध्दती वापरल्या जातात, पण या पध्दतीमुळे वातावरण प्रदुषित होते म्हणून आपल्या देशात नैसर्गिक जीवाणू प्रणीत प्रक्रिया वापरणेचे फायद्याचे ठरते.
1. खतखड्डा :-
निसर्गात सेंद्रिय पदार्थाचे विघटन व पाचन सतत होत असते. या तत्वाचा वापर करुन विविध खतखड्डयांच्या पध्दती विकसित केल्या आहेत. सर्वसाधारणपणे घरगुती वापरासाठी करावयाचा खतखड्डा 3 फूट रुंद व 3 फूट अथवा सोयीप्रमाणे अधिक फूट लांब असू शकतो. या खड्डयांमध्ये कचरा विविध पध्दतीनी भरता येऊ शकतो.
2. जैविक वायु संयंत्र (Biogas Technology) :
यामध्ये निर्वतीय पाचनक्रिया होते. सेंद्रिय पदार्थाचे ऑक्सिजन विरहित परिस्थितीत पाचन होते. हे कार्य निर्वातीय जीवाणूव्दारा होते. सेंद्रिय पदार्थ ऑक्सिजन विरहित कुजल्यास त्यातून ज्वलनशील मिथेन, कार्बन डायऑक्साईड, हायड्रोजन इत्यादी वायू मिळतात, खत मिळते. काही सेंद्रिय पदार्थ मोठया प्रमाणावर मिळू शकत असल्यास त्याठिकाणी जैविक वायू संयंत्र उभारणे फायदेशीर ठरते. जे पदार्थ निर्वातीय पाचनास योग्य असतील ते वेगळे करुन त्या पदार्थाचे जैविक संयंत्रास निर्वातीय पाचन करता येईल. त्यामधून तयार होणारा जैविक वायू (बायोगॅस) जळण म्हणून वापरता येईल व त्यातून बाहेर पडणारे खत विकता येईल अथवा शेतीसाठी वापरता येईल. अशा प्रकारची मंडईतील भाजीपाल्याच्या कचयांवर चालणारी, कारखान्यातील उपहारगृहाच्या कचयावर चालणारी, इत्यादी प्रकारची जैविक संयंत्रे यशस्वी ठरली आहेत.
3. गांडूळ खत :-
गांडूळाच्याव्दारे सेंद्रिय कचयाचे उत्कृष्ट खतात रुपांतर होते ही अनेक प्रयोगांव्दारे सिध्द झाले आहे. गांडूळ सेंद्रिय पदार्थ अन्न म्हणून वापरतात. गांडूळांच्या विविध जातींवर संधोशन करुन काही विशिष्ट जातीचेंच संवर्धन करुन जास्त कार्यक्षम जाती वेगळया केल्या गेल्या आहेत. अशा प्रकारचे मुद्दाम वाढलेले गांडूळ कचयाच्या ढिगायात सोडले जातात. गांडूळ सर्व कचरा खाऊन त्या कचयांचे वितंचकयुक्त खतामध्ये रुपांतर करतात. हे खत शेतीसाठी अत्यंत उपयुक्त सेंद्रिय खत ठरले आहे. गांडूळ वापरासाठी करावयाच्या ढिगांच्या पध्दती गांडूळांच्या जातीप्रमाणे वेगवेगळया आहेत. विशिष्ट परिस्थितीनुसार योग्य जात निवडावी लागते.
गांडूळ खत निर्मिती :
गांडूळाच्या मदतीने कचयापासून सेंद्रिय खत करण्यात येतो. ज्यामुळे केरकचयांचे निर्मुलन तर होतेच सोबतच खत मिळाल्यामुळे शेतीचे उत्पादन वाढण्यास मदत होते.
खड्डयाच्य तळाशी चापट दगडाच्या तुकडयाचा भर घालावा. (लवकर न कुजणारे गडब्याचे बुडके, कडबा, पाचरट, अर्धवट कुजलेला कचरा टाकावा.
खड्डयात दररोज निघणारे शेण, गुरांचे मलमुत्र, कोरडे गवत, पाला पाचोळा, पिकांची धसकटे, पिकांचा पेंढा, किंवा कडबा, घरातील तसेच उकिरडयावरील केरकचरा यांचा थर घालावा.
25 सें.मी.थर उंच झाल्यावर त्यावर पाणी टाकावे म्हणजे हे पदार्थ मऊ होतील. व ते घट्ट दाबता येतील. अशा तहेने एक थर भरल्यानंतर त्यावर शेणकाला व थोडी राख किंवा माती टाकावी. त्यामुळे कुजन्याची क्रिया जलदगतीने होईल.
शेवटचा थर वाळलेल्या कचयाचा असावा. या पूर्ण भरलेल्या खड्डयातील कचरा पुर्णवेळ ओला असणे आवश्यक आहे. कचयाचा थर अधिक जाड नसावा. नाहीतर खड्डयातील तपमान 60 अंश सेल्सीअस पर्यंत पोहचून ही उष्णता गांडूळासाठी नुकसान कारक होईल.
प्रत्येक खड्डयात साधारणपणे दिड किलो किंवा दिड हजार गांडूळ टाकावे. ही संख्या दुप्पट होण्यासाठी 30 ते 40 दिवसाचा वेळ लागतो या कालावधीनंतर खड्डयातील सर्व कचयांचे गांडूळ खतात रुपांतर होते. त्यानंतर गांडूळ आणि गांडूळ खत खड्डयातून वेगवेगळे करावे.
खतापासून गांडूळ वेगळे करण्यासाठी कुजलेला कचरा सावलीत ठेवावा आणि त्यावर पाणी शिंपडणे थांबवावे. त्यामुळे सर्व गांडूळ ढिगायाच्या खालील भागात जेथे ओलाव्याचे प्रमाण वरच्या थरापेक्षा जास्त असेल तेथे जमा होतील.
तयार झालेले गांडूळ खत जमिनीत टाकावा. ज्यामुळे जमिनीतील सेंद्रिय पदार्थाची पातळी टिकून राहील
यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतुन रु. 11520/- अनुदान मिळेल.
नाडेप (Nadep) :
या पध्दतीत कचराकुंडी विटांच्या सहाय्याने जमिनीच्यावर बांधली जाते. विटकामामध्ये सवातील विघटन प्रक्रियेसाठी अधून मधून भोके ठेवली जातात व या टाकीत वरील प्रमाणे कचरा, शेण व माती वेगवेगळया थरांमध्ये भरले जातात. या पध्दतीत खत जास्त चांगल्या प्रतीचे मिळते. मात्र या पध्दतीत खड्डा बांधकामासाठी सुरुवातीला भांडवली गुंतवणूक करावी लागेल. (खड्डयात होणारी पाचन क्रिया ऑक्सिजनच्या सान्निध्यात पाचन करणाया सवातीय जीवाणूव्दारा होते. याला सवातीय पाचन म्हणतात. या प्रक्रियेत सेंद्रिय पदार्थाचे ऑक्सिजनच्या सान्निध्यात पाचन होते. कार्बनडाय-ऑक्साईड, हायड्रोजन , अमोनिया इत्यादी वायू हवेत निघून जातात. खत म्हणून वापरता येण्याजोगे घनपदार्थ मिळतात.) यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतुन रु. 10746/- अनुदान मिळेल.
असेंद्रिय कचयाचे व्यवस्थापन :
काच, प्लॅस्टिक, लाकूड, रबर, वेगवेगळे धातू इत्यादी पदार्थाचा यात समावेश ह??