जि. प. प्रिंटिंग प्रेस
सातारा जिल्हा परिषदेने १९८३ साली स्वतःचे मालकीचे मुद्रणालय सुरु केले आहे. मा.सभापती अर्थ समिती व मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली मुख्य लेखा व वित्त अधिकारी हे मुद्रणालयाचे प्रमुख नियंत्रक म्हणून काम पहातात. जिल्हा परिषदेने ठरवून दिलेल्या नियमावलीप्रमाणे मुद्रणालयाचे कामकाज ना नफा ना तोटा तत्वावर चालते.
महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागाने दिनांक-३० ऑक्टोंबर १९८५ रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णय क्र.१०८५/४१ (सी.आर.)१५५४/२६ नुसार महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषदा व अन्य शासकीय कार्यालयांना छपाई कामासाठी निविदा न मागविता जिल्हा परिषद मुद्रणालयाकडून थेट छपाई कामाची मागणी नोंदवून छपाई करुन घेता येते.
जिल्हा परिषदांचे लेखासंहितेप्रमाणे लागणारी रजिष्टर व फॉर्मस् छापून योग्य किमतीत पुरवली जातात तसेच जिल्हा परिषदांच्या दैनंदिनी देखील मागणी प्रमाणे योग्य किमतीत छपाई करुन दिल्या जातात. तसेच शासनाने विविध विभागाचे मागणी प्रमाणे छपाई करुन दिली जाते.
अधिक माहितीसाठी संपर्क
दूरध्वनी क्रमांक : ०२१६२-२२७९६२
ईमेल : zppresssatara@gmail.com