पशुसंवर्धन विभाग
- पशुसंवर्धन विभाग : जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण योजना) अंतर्गत एकात्मिक कुक्कुट विकास कार्यक्रम सन २०१८-१९ अंतर्गत एक दिवशीय सुधारित मिश्र कुक्कुट पिल्लांचे गट वाटप योजनेबद्दल माहिती व लाभार्थी निवडी करिता करावयाच्या अर्जाचा नमुना
- पशुसंवर्धन विभाग : एकात्मिक कुक्कुट विकास कार्यक्रम (जिल्हा वार्षिक योजना सन २०१५-१६)
- एकात्मिक कुक्कुट विकास कार्यक्रम - जिल्हा वार्षिक योजना सन २०१४-१५ : लाभार्थी
- पशुवैदयकिय दवाखान्यांमध्ये कार्यरत असणा-या अधिकारी, कर्मचारी यांची माहिती
पशुवैद्यकीय दवाखान्यांची संख्या
श्रेणी - १ : ५६
फिरते पथक : २
श्रेणी - २ : ११३
------------------------
एकूण : १७१
पशुवैद्यकीय दवाखान्यांची संख्या
अ.क्र | तालुका | पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-१ | पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-२ |
---|---|---|---|
१ | सातारा | सातारा, अंगापूर, नागठाने, नुने, परळी मालगांव, शेंद्रे, फिरते पथक | वडूथ, कुमठे, केडगांव, नांदगांव, कामथीठोसेघर, कोपर्डे, वडगांव, अतित, जिहे, चिचणेर, सोनवडी लिब, आरुळ, काशिळ |
२ | कराड | हजारमाची, मसूर, औंड, तळबिड, शेरे उंब्रज | पेडगांव, उंडाळे, मासोली, आटके, शामगांव बंलवडे ब्रु., येणके, पेर्ले, सुर्ली, इंदोली |
३ | कोरेगांव | रहिमतपूर, वाघोली, खेड, वाठार स्टे.पिपरी | करंजखोप, किन्हई, एकंबे, चिलेवाडी सोळशी, बोरगांव, बनवडी, वाठार किरोली चिमणगांव, आंबवडे देऊर सातारारोड |
४ | फलटण | आदर्की, साखरवाडी, आसू, गिरवी | गुणवरे, बरड, ढवळ, हिगणगांव, तरडगांव घाडगेवाडी, विडणी, जिती, पाडेगांव |
५ | पाटण | पाटण, ढेबेवाडी, मल्हारपेठ, बहुले, तारळे गव्हाणवाडी, फिरते पथक | सणबूर, चाफळ, तळमावले, धामणी, मुरुड केरळ, काडोली, हेळवाक, मोरगीरी, कारवट कुंभारगांव |
६ | खटाव | पुसेगांव, का.खटाव, पुसेसावळी, मायणी औंध, चोराडे, वडगांव, खटाव, गोपूज वडूज | पडळ, बुध, चितळी, निढळ, डिस्कळ, तडवळे, निमसोड, कलेढोण, सि.कुरोली |
७ | माण | दहिवडी, वडजल, म्हसवड, मोहि, वावरहिरे | मार्डी, पळशी, देवापूर, वरकुटे, बिजवडी, मलवडी महिमानगड, कुळकजाई |
८ | वाई | बोरगांव, भुईंज, वाशिवली | रेनावळे, उडतारे, उळुंब, गोपर्डी, शिगांव, बावधन, सुरुर, किकली ओझर्डे, केंजळ, पाचवड , वेलंग, कवठे, मांढरदेव |
९ | खंडाळा | पारगांव, शिरवळ, लोणुद, लोहम, कोपर्डे | अहिरे, पळशी, भादे |
१० | जावली | मेढा, कुडाळ, केळघर, | हुमगांव, बामणोली, मालचौंडी, , मार्ली केडांबे, गांजे, भणंग, सायगांवकरहर, काटवली |
११ | महाबळेश्वर | पाचगणी, महाबळेश्वर | मांघर, झांजवड भिलार, तळदेव, कुंभरोशी, खिगर, माचुतर चिखली मेटगुताड, गोगवे, वाघावळे |
एकूण | ५८ | ११३ |
पशुसंवर्धन विभागामार्फत शेतक-यांसाठी वैयक्तिक लाभाच्या योजना
विशेष घटक योजना
अ) दोन दुधाळ जनावरांचे गट वाटप
योजनेचे उद्देश
- जिल्हा दुध उत्पादनास चालना देणेसाठी
- अनु.जाती व नवबौध्द लाभार्थींना स्वयंरोजगाराद्वारे उत्पन्नाचे साधन उपलब्ध करुन देणेसाठी.
योजनेचे स्वरुप
- फक्त अनु.जाती व नवबौध्द लाभार्थींसाठी
- दोन गाई / म्हैशींचे वाटप (प्रत्येक लाभार्थीस)
- ७५ टक्के अनुदान विम्यासह रु.६३७९६/-
लाभार्थी निवडीचे निकष
- दारिद्रय रेषेखालील लाभार्थी
- अत्यल्प भुधारक शेतकरी
- अल्प भूधारक शेतकरी
- सुशिक्षित बेरोजगार
- महिला बचत गटातील लाभार्थी (३०टक्के महिला लाभार्थी ), (३ टक्के अपंगासाठी )
ब) अनुसूचित जातीतील लाभार्थ्यांना १० अ १ शेळी गट वाटप-
योजनेचे उद्देश
- अनु.जाती व नवबौध्द लाभार्थींना ग्रामीण भागात स्वयंरोजगाराद्वारे उत्पन्नाचे साधन उपलब्ध करुन देणेसाठी विषेश घटक योजने अंतर्गत १० अ १ शेळी गट वाटप करण्यात येतो.
योजनेचे स्वरुप
- फक्त अनु.जाती व नवबौध्द लाभार्थींसाठी
- १० अ १ शेळी गट वाटप (प्रत्येक लाभार्थीस)
- ७५ टक्के अनुदान विम्यासह र.रु. ५३४२९/-
लाभार्थी निवडीचे निकष
- दारिद्रय रेषेखालील लाभार्थी
- अत्यल्प भुधारक शेतकरी
- अल्प भूधारक शेतकरी
- सुशिक्षित बेरोजगार
- महिला बचत गटातील लाभार्थी (३०टक्के महिला लाभार्थी ), (३ टक्के अपंगासाठी)
क) दुभत्या जनावरांना खादय वाटप
योजनेचे उद्देश
- दुभत्या जनावरांच्या भाकड काळात त्यांना खादय उपलब्ध करुन देणे.
योजनेचे स्वरुप
- प्राधान्याने वरील योजनेत वाटप केलेल्या जनावरांना १०० टक्के अनुदानावर भाकड काळासाठी गाईस १५० किलो व म्हैशींस २५० किलो खादय मोफत वाटप करण्यात येतो.
जिल्हा वार्षिक योजना
अ) वैरण उत्पादनासाठी उत्तेजन
योजनेचे उद्देश
- जिल्ह्यातील वैरण उत्पादनामधील कमतरता काही प्रमाणात भरुन काढणेसाठी व पशुपालकांकडे असलेल्या पशूधनाची उत्पादकता वाढविण्याच्या अनुषंगाने जास्तीत जास्त दुध उत्पादनासाठी पशुधनाला पुरेशी हिरवी वैरण उपलब्ध करणे.
योजनेचे स्वरुप
१०० टक्के अनुदानावर वैरणीसाठी बियाणे दिले जाते.(मका,कडवळ,बहुवार्षिक चारा पिकाची ठोंबे इ.) रु..६००/- अनुदान मर्यादेत वाटप करण्यात येते
लाभार्थी निवडीचे निकष
- लाभार्थींकडे स्वतःची शेतजमीन व सिचनाची सुविधा असणे आवश्यक आहे.
- ३ ते ४ जनावरे असणा-या लाभार्थींना प्राधान्य.
ब) एकात्मिक कुक्कुट विकास कार्यक्रम
योजनेचे उद्देश
- परसातील पक्षी पालनास चालना देण्यसाठी व ग्रामीण भागामध्य अंडी यांचेद्वारे सकस आहाराची उपलब्धता होणेसाठी.
योजनेचे स्वरुप
- ५० टक्के अनुदानावर सुधारीत जातीच्या गिरीराज एक दिवशीय प्रत्येकी १०० पिल्लांचे ८०००/- अनुदान वाटप करण्यात येते. (प्रकल्प खर्च १६०००/-)
लाभार्थी निवडीचे निकष
- कोणत्याही गटातील एका कुटुंबातील एकच व्यक्ती लाभ घेऊ शकते.
- दारिद्रय रेषेखालील लाभार्थी, भुमिहिन शेतमजूर,मागासवर्गीय, अल्प व अत्यल्प भुधारक लाभार्थी यांना प्राधान्य. (३० टक्के महिला लाभार्थी ), (३ टक्के अपंगासाठी)
क) कामधेनू दत्तक ग्राम योजना
योजनेचे उद्देश
- पशुसंवर्धन विभागाच्या सर्व योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणेसाठी
योजनेचे स्वरुप
- निवड झालेल्या दत्तक गावामध्ये पशुसंवर्धन विषयक गोचीड निर्मुलन, पशुपालक मंडळ स्थापना, वांझ तपासणी शिबीरे, लसीकरण्, खनिज मिश्रण वाटप इ. योजना वर्षभर राबविल्या जातील यासाठी रु. १५२५००/- लक्ष प्रती गाव निधी खर्च करण्यात येतो.
लाभार्थी निवडीचे निकष
- पैदासक्षम जनावरांची संख्या किमान ३०० असावी.
- गांव दुध संकलन केंद्राच्या मार्गावर असावे.
- सक्रीय सहभाग मिळत असलेल्या गावांला प्राधान्य.
जिल्हा परिषद सेस योजना
अ) श्वान दंश लसीकरण १०० टक्के परतावा
योजनेचे उद्देश
- पिसाळलेल्या श्वानांच्या दंशामुळे जनावरांचे संभाव्य मैंत्यु टाळण्याकरिता करण्यात येणा-या लसीकरणा करणेसाठी.
योजनेचे स्वरुप
शेतक-यांच्या जनावरांस कुत्रे चावल्या नंतर देण्यात येणारी ५ इंजेक्शनस्चे रु.२२५/- परत दिले जातात.
लाभार्थी निवडीचे निकष
- लस स्थानिक औषध दुकानातून खरेदीची पावती
- स्थानिक शासकीय पशुवैदयकाचे प्रमाणपत्र
ब) वैरण विकास बियाणे
योजनेचे उद्देश
- जिल्यातील वैरण उत्पादनामधील कमतरता काही प्रमाणात भरुन काढणेसाठी.
- पशुपालकांकडे असलेल्या पशूधनाची उत्पादकता वाढविण्याच्या अनुषंगाने जास्तीत जास्त दुध उत्पादनासाठी पशुधनाला पुरेशी हिरवी वैरण उपलब्ध करणेसाठी.
योजनेचे स्वरुप
- १०० टक्के अनुदानावर वैरणीसाठी बियाणे दिले जाते.(मका,कडवळ इ.) रु..६००/- अनुदान मर्यादेत.
लाभार्थी निवडीचे निकष
- लाभार्थींकडे स्वतःची शेतजमीन व सिचनाची सुविधा असणे आवश्यक आहे.
- ३ ते ४ जनावरे असणा-या लाभार्थींना प्राधान्य.
क) सर्वसाधारण लाभार्थींस शेळी गट वाटप
योजनेचे उद्देश
- जिल्ह्यातील दुध व मांस उत्पादनास चालना देणेसाठी.
- सर्वसाधारण लाभार्थींना स्वयंरोजगाराद्वारे उत्पन्नाचे साधन उपलब्ध करुन देणेसाठी.
योजनेचे स्वरुप
- ५० टक्के अनुदानावर ५अ१ शेळयांचा गट वाटप
लाभार्थी निवडीचे निकष
- लाभार्थींचे वार्षिक उत्पन्न २५,०००/- चे आत असणे आवश्यक.
- लाभार्थी शासकीय नोकरीत नसावा.
- लाभार्थ्यांस ३ पेक्षा जास्त अपत्य नसावेत. (३० टक्के महिला लाभार्थी )
ड) २ एच.पी विद्युत कडबाकुट्टी यंत्र वाटप
योजनेचे उद्देश
- शेतकर्यांकडील जनावरांसाठी उपलब्ध वैरणीची कुट्टी केल्यामुळे सुमारे ३० टक्के वैरणीची बचत होते, त्यामुळे शेतकर्यांचे वैरण व परिश्रमात बचत होते.
योजनेचे स्वरुप
- ५० टक्के अनुदानावर ५ जनावरे असणार्या शेतकर्यांचे अर्ज क्षेत्रीय संस्थामार्फत प्राप्त झालेनंतर पशुसंवर्धन व दुग्धशाळा समितीमार्फत निवड केलेल्या लाभार्थ्यांना २ एच.पी विद्युत कडबाकुट्टी यंत्र वाटप करण्यात येते.
लाभार्थी निवडीचे निकष
- लाभार्थीकडे ५ जनावरे असलेबाबत स्थानिक पशुवैद्यकीय संस्थेचा दाखला.
- १ मे २००१ नंतर तिसरे अपत्य नसलेबाबत ग्रामसेवकाचा दाखला.
- लाभार्थीच्या कुटूंबातील कोणतीही व्यक्ती शासकीय/ निमशासकीय नोकरीत नसलेबाबत दाखला.