पाटण तालुका
पाटण
मराठेशाहीत पाटणकर हे ह्या प्रांताचे देशमुख होते. पाटण गावाचे पाटण आणि रामापूर असे दोन भाग आहेत.
चाफळ
पाटण उंब्रज या रस्त्यावरील हे ठिकाण. श्री समर्थ रामदासांनी श्रीरामाच्या मूर्तीची येथे स्थापना केली. रामदास स्वामी बारावर्षाच्या तीर्थाटनानंतर आलयानंतर तयांनी येथे मारुतीची स्थापना केली. समर्थांनी स्वहस्ते श्रीरामाचे मंदिर बांधले. जीर्ण झालेले हे मंदिर उद्योगपती अरविद मफतलाल यांनी १९७२ मध्ये नवीन बांधून दिले. समर्थ स्थापित ११ मारुतीपैकी ३ मारुती याच परिसरात आहेत. चाफळ पासून १.५ कि.मी. अंतरावर माजलगाव येथेही रामदासांनी ११ मारुतीपैकी एकाची स्थापना केली. कवी यशवंताचे जन्मगांव चाफळ. मंदीराचे सभागृह नऊ खणांचे असून त्याच्या खांबावर अप्रतिम कोरीव काम आहे. गाभार्यामध्ये रामलक्ष्मण व सीता यांच्या मोठया व सुंदर अशा संगमरवरी मूर्ती आहेत. त्यापुढं दगडी राममूर्ती आहे. या मंदीराचे शिखरही उंच आणि कलात्मेतेने नटलेले आहे. येथे एक ध्यान गुंफा म्हणजेच समर्थांची ध्यानस्थ बसण्याची एकांताची जागा होय. जमिनीखालील या गुहेत जाताना पहिली उंच पायरी उतरल्यावर आणखी चार पायर्याउतराव्या लागतात मग एक दगडी चौकट लागते. या जागेवरती बसून छत्रपती शिवाजी व समर्थ रामदास गुप्त चर्चा करत असे सांगतात.
दिवशी धारेश्वर
येथील धारेश्वर हे महादेवाचे मंदीर प्रसिध्द आहे. याचे पुजारी हे बहुसंख्येने जंगम आणि लिगायत असून अविवाहित असतात. तसेच येथे गुंफा व एक झरा आहे. ही गुहा २०० फुट लांब, ३५ फुट रुंद व ७ फुट उंच आहे. समर्थ स्थापित ११ मारुतीपैकी ३ मारुती याच परिसरात आहेत. चाफळ पासून १.५ कि. मी. अंतरावर माजलगाव येथेही रामदासांनी ११ मारुतीपैकी एकाची स्थापना केली. पाटणपासून अंदाजे २० कि.मी. अंतरावर शंकराचे रुप असलेले हे नाईकबा मंदीर या भागात प्रसिध्द आहे. पिडीभोवती चांदीचा मुखवटा आहे. दसरा व चौत्र पंचमीला येथे यात्रा भरते.
बहुलेश्वर मंदीर
हे गाव निसरे या गावातून ३ मैल अंतरावर आहे. हे गाव ऐतिहासिक शिवमंदीरासाठी प्रसिध्ध्द आहे. या मंदीराला बहुलेश्वर मंदीर म्हणतात. बहुलेश्वरांनी एका गुराख्याला दर्शन देऊन येथे लिगाची स्थापना करण्याची प्रेरणा दिली अशी आख्यायिकया आहे. दरवर्षी श्रावणी सोमवार आणि महाशिवरात्रीच्या दिवशी या मंदीरात भाविक मोठया संख्येने येतात.
दातेगड किल्ला
दातेगड यालाच ससुंदरगड म्हणतात. या गडावर असलेली तलवार आकाराची विहिर हेच महत्वाचे आकर्षण आहे. या तलवारीच्या आकाराच्या विहिरीचा सर्व भाग खंडकात कोरलेला आहे.
वाल्मिकी
निसर्गरम्य पर्यटनस्थळ आहे. वाल्मिक ऋषींची तपोभूमी वांग नदीचे उगमस्थान असून जवळच नाईकबाबा हे धार्मिक ठिकाण आहे.
कोयना धरण
पाटण तालुक्यातील हेळवाक या गावाजवळ कोयनाधरण आहे. डोंगररांगांनी निर्माण झालेल्या खोल दरीत कोयना नदी आडवून हे प्रचंड धरण बांधण्यात आले आहे. या धरणाजवळ वसलेल्या वस्ती वजा गावाला कोयनानगर असे म्हणतात. महाराष्ट्राला वरदान ठरलेले कोयना धरणाच्या हे विशाल शिवसागर जलाशयात १३ मार्च १९९९ ला लेक टॅपिगचा यशस्वी प्रयोग करण्यात आला. या धरणावर चार टप्प्यामध्ये विद्युत निर्मिती करण्यात येते. विद्युत केंद्र पाहण्यासाठी कुंभार्ली घाट उतरुन पायथ्याच्या पोफळी या गावी जावे लागते. इथल्या विद्युत निर्मितीमुळे हे धरण म्हणजे महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणतात. जलाशयाच्या खालून चारकिलोमीटरचा बोगदा तयार करुन त्यातून पाण्याचा प्रवाह नेऊन वीज निर्मिती करण्यात आली आहे. पोफळी येथे जलविद्युत केंद्र आहे. कोयनानगर परिसरात नवनिर्मित भव्य नेहरु स्मारक उद्यान आहे.
गुणवंत गड
हा किल्ला पाटणच्या नैऋत्येस सहा मैल अंतरावर आहे. अठराव्या शतकात या गडावर पेशव्यांचे सैन्य होते. इसवी सन १८१८ मध्ये कोणतीही लढाई किवा प्रतिकार न होता हा किल्ला ब्रिटीशांच्या ताब्यात आला.
कोयना अभयारण्य
सातारा जिल्हयाच्या पश्चिम भागात कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कोयना अभयारण्य येते. जंगलात हरीण, रानगवा,लांडगा,रानडुक्कर, अस्वल, वाघ हे प्राणी बुलबुल,घार रानकोंबडा, सुर्यपक्षी हे पक्षी, करवंद, जांभूळ, चिच, करंजा, पळस, साग इ. वृक्ष विपुल प्रमाणत आढळतात. विविध प्रकारच्या वनौषधी बरोबर तमालपत्र, चारोळी,दगडफूल, कढीलिब, दालचिनी इ. मसाल्याच्या पदार्थांच्या वनस्पती आढळतात. तापोळ्यापासून शिवसागर जलशयातून मेटवलीला जाता येते. या अभयारण्यात वासोटा हा भव्य किल्ला आहे. विस्तीर्ण अशा शिवसागर जलाशय आणि कोयना धरण यांच्या दरम्यानच्या या अभयारण्यात लांडग्यांचा चित्कार हरणांची हुंकार आणि वाघांच्या डरकाळ्या कानावर पडतात.