राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रम
राज्य लोकसंख्या धोरणाअंतर्गत उद्दिष्टे साध्य करणेसाठी सातारा जिल्ह्यात वाढत्या लोकसंख्येवरील नियंत्रणासाठी राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रम राबविण्यात येतो. या कार्यक्रमांतर्गत कुटुंब कल्याण स्त्री व पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया, तांबी, आंतरा, निरोध व गर्भनिरोधक गोळ्या वाटप या निर्देशकांवर विशेष भर देणेत येतो. जिल्ह्यातील IPHS प्राआकेंद्रे, 1 सामान्य रुग्णालय, 2 उपजिल्हा रुग्णालये व 18 ग्रामीण रुग्णालयामध्ये कुटुंब कल्याण नसबंदी शस्त्रक्रिया सुविधा उपलब्ध आहे.
लाभार्थी:
15 ते 45 वर्षे वयोगटातील पात्र लाभार्थी
फायदे:
कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यानंतर रु.1450/- पात्र लाभार्थी
अर्ज कसा करावा
शस्त्रक्रियेस पात्र लाभार्थी नजिकच्या आरोग्य केद्रांत आरोग्य तपासणी करुन शस्त्रक्रिया किंवा अन्य गर्भनिरोधक साधनासाठी वै.अ./आरोग्य कर्मचारी यांचेकडे अर्ज करुन शकतात.