बंद

    यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना

    • तारीख : 24/01/2018 -

    📜 शासन निर्णय:
    मुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग कल्याण विभाग, महाराष्ट्र शासनाचा शासन निर्णय क्रमांक निओ-२०१७/प्र.क्र.०६०/विजाभाज-१ दिनांक २४ जानेवारी २०१८ नुसार.


    📌 योजनेचा उद्देश:

    • मुक्त जाती व भटक्या जमातींचा विकासाच्या मुख्य प्रवाहात समावेश करणे

    • जीवनमान उंचावणे

    • उत्पन्नाचे स्त्रोत वाढवणे

    • भूमिहीन लाभार्थ्यांना जमीन व वसाहत उभारून स्थैर्य निर्माण करणे

    • आर्थिक स्वावलंबनासाठी घरकुल प्रदान करणे

    • ही योजना प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना यांच्या धर्तीवर राबविण्यात येते

    लाभार्थी:

    लाभार्थी कुटुंब भटक्या/मुक्त जमातीमधील असावे व पोटासाठी गावोगावी फिरत असावे वार्षिक उत्पन्न ₹1.20 लाखांपेक्षा कमी असावे स्वतःचे घर नसावे घरट्या/छपरात/कुडाच्या घरात राहत असावे जमीन नसावी (परंतु प्रकल्पग्रस्त व पुनर्वसितांना अपवाद) गावांमध्ये सामूहिक वसाहत उभारणीचा विचार

    फायदे:

    वरील निकष पूर्ण करणाऱ्या नागरिकांना मोफत घरकुल (अधिकृत खर्च किंवा साहाय्य रक्कम स्थानिक निकषांनुसार ठरते)

    अर्ज कसा करावा

    अर्जदारांनी आपल्या ग्रामपंचायतीकडे अर्ज सादर करावा

    संचिका:

    YCMVY (4 MB)