बंद

    एकात्मिक बाल विकास योजना – लेक लाडकी योजना

    • तारीख : 30/10/2023 -

    लेक लाडकी  योजना

    माझी कन्या भाग्यश्री योजना अधिक्रमित करून त्याएैवजी मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना महिला व बाल विकास विभाग,शासन निर्णय क्र.एबावि-2022/प्र.क्र.251/का.6दि30/10/2023 नुसार सुरू करणेत आली आहे.

    मुलींचा जन्मदर वाढविणे,मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन तथा खात्री देणे यासाठी दिनांक 01 आगष्ट 2017 पासून माझी कन्या भाग्यश्री(सुधारित)नविन योजना करण्यात आली होती.सदर योजनेस अपुरा प्रतिसाद विचारात घेता सदर योजना अधिक्रमित करून दिनांक 1 एप्रील 2023 पासून मुलींच्या जन्मानंतर तिच्या  सक्षमीकरणासाठी लेक लाडकी ही नविन योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

    योजनेची उद्दिष्टे

    1.मुलीच्या जन्मास प्रोत्साहन देवून मुलींचा जन्मदर वाढविणे.

    2.मुलींच्या शिक्षणास चालना देणे.

    3.मुलींचा मृत्यूदर कमी करणे व बालविवाह रोखणे.

    4.कुपोषण कमी करणे.

    5.शाळाबाह्यय मुलींचे प्रमाण 0(शून्य)वर आणण्यासाठी प्रोत्साहीत करणे.

    सदर योजनेअंतर्गत  लाभ द्यावयाचा  लाभ खालील अटी व शर्ती नुसार

    लेक लाडकी योजनाअंतर्गत पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबात मुलीच्या जन्मानंतर व शिक्षण घेत असताना काही रक्कम व लाभार्थी मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर अशी पाच हप्त्यात मुलीला रक्कम देण्यात येणार आहे.

    कोणाला मिळणार लाभ याबाबत

    लेक लाडकी योजनाअंतर्गत पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबात दिनांक 1 एप्रिल 2023 वा तदनंतर मुलीच्या जन्मानंतर 5 हजार रूपये,इयत्ता पहिलीत 6 हजार रूपये.सहावीत 7 हजार रूपये,अकरावीत 8 हजार रूपये तर मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला 75 हजार रूपये याप्रमाणे एकूण रूपये 1,01,000/-एवढी रक्कम पाच हप्त्यात देण्यात येईल.

    अटी व शर्ती

    1.ही योजना पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक कुटूंबामध्ये दिनांक 1 एप्रिल 2023 रोजी वा त्यांनतर जन्माला येणा-या एक अथवा दोन मुलींना लागू राहील.तसेच एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागु राहील.

    1. पहिल्या अपत्याच्या तिस-या हप्त्यासाठी व दुस-या अपत्याच्या दुस-या हप्त्यासाठी अर्ज सादर करतेवेळी माता-पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील.

    3.तसेच दुस-या प्रसूतीच्या वेळी जुळी अपत्ये जन्माला आल्यास एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील.मात्र त्यांनतर माता /पित्याने कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील.

    4.दिनांक 1 एप्रिल 2023 पूर्वी एक मुलगी/मुलगा आहे व त्यांनतर जन्माला आलेल्या दुस-या  मुलीस किंवा जुळ्या मुलींना (स्वतंत्र)ही योजना अनुज्ञेय राहील.मात्र पाता /पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील.

    5.लाभार्थींचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक लाहील.

    1. लाभार्थी बॅंक खाते महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे.

    7.लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रू.1.00 लक्ष पेक्षा जास्त नसावे.

    आवश्यक कागदपत्रे

    1.लाभार्थीचा जन्माचा दाखला

    2.कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला(वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त नसावे)याबाबत तहसिलदार/सक्षम अधिकारी यांचा दाखला आवश्यक राहील.

    3.लाभार्थी आधार कार्ड

    4.पालकांचे आधार कार्ड

    5.बॅंक पासबुकच्या पहिल्या पानाची  झेरॅाक्स व CKYC झालेबाबत बॅकेचा दाखला(बॅक खाते आधार कार्डशी संलग्न)

    6.रेशन कार्ड पिवळे किंवा केशरी साक्षांकित प्रत

    7.मतदान ओळखपत्र(शेवटच्या लाभाकरिता 18 वर्ष पूर्ण झाल्यांनतर मुलीचे मतदार यादीत नाव असल्याचा दाखला)

    8.संबंधित टप्प्यावरील लाभाकरिता शिक्षण घेत असल्याबाबतचा संबंधित शाळेचा दाखला(Bonafied)

    9.कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र

    10.अंतिम लाभाकरिता मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक राहील.(अविवाहीत असल्याबाबत लाभार्थींचे स्वयं घोषणापत्र)

    11.लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असलेबाबतचा दाखला

    12.लाभार्थीचा व आईचा संयुक्त फोटो

    लाभ कसा  व किती मिळणार आहे

    अ.क्र. तपशिल हप्ता रक्कम रूपये
    1 मुलीच्या जन्मा नंतर पहिला हप्ता 5000/-
    2 इयत्ता पहिलीत दुसरा हप्ता 6000/-
    3 इयत्ता सहावीत तिसरा हप्ता 7000/-
    4 इयत्ता अकरा वीत चौथा हप्ता 8000/-
    5 मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्या नंतर पाचवा हप्ता 75000/-
    एकुण 101000/-

     

    लेक लाडकी योजनेचा लाभ घेण्याची कार्यपध्दती

    .क्र. निर्देशांक
    1 मुलीच्या पालकांनी अंगणवाडी सेविकेकेडे अर्ज सादर करणे-(सदर योजनेअंतर्गत लाभासाठी मुलीच्या पालकांनी 1 एप्रिल 2023 रोजी वा तदनंतर मुलीचा जन्म झाल्यानंतर संबंधित ग्रांमीण अथवा नागरी क्षेत्रातील संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेत मुलीच्या जन्माची नोंदणी केल्यांनतर त्या क्षेत्रातील अंगणवाडी सेविकेकडे आवश्यक त्या कागदपत्रांसह विहित नमुन्यात अर्ज सादर करावा)
    2 अंगणवाडी सेविकेने संबंधित लाभार्थ्याकडुन अर्ज परिपुर्ण भरून घ्यावा पर्यवेक्षिका यांचेकडे सादर करावा(गरजेप्रमाणे लाभार्थ्यास अर्ज भरण्यास मदत करावी आणि सदर अर्ज अंगणवाडी पर्यवेक्षिका यांच्याकडे सादर करावा.)
    3 अंगणवाडी पर्यवेक्षिका यांनी अर्जाची तपासणी करून दरमहा बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचेकडे प्रस्ताव यादी मंजुरीसाठी सादर करावी.(अंगणवाडी पर्यवेक्षिका यांनी सदर अर्जाची व प्रमाणंपत्रांची छाननी/तपासणी करून प्रत्येक महिन्याला नागरी व ग्रामीण क्षेत्रातील बाल विकास प्रकल्प अधिकारी तसेच संस्थामधील अनाथ मुलींच्या बाबतीत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी एकत्रित यादी  जिल्हा कार्यक्रम अधिकारी,जिल्हा परिषद यांना मान्यतेसाठी सादर करावी.)
    4 अंगणवाडी पर्यवेक्षिका/बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी अर्ज प्राप्त झालेनंतर अर्जाची छाननी करून अर्ज अपुर्ण काही कागदपत्रे नसलेस अर्जदारास लेखी कळविणे(पर्यवेक्षिका/बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी त्यांच्याकडे प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी करून एखादा अर्ज संपूर्ण भरलेला नसल्यास अथवा सर्व प्रमाणपत्रासह सादर केलेला नसल्यास असा अर्ज मिळाल्यापासून 15 दिवसाच्या आत पूर्तता करण्याकरिता अर्जदारास लेखी कळवावे.त्याप्रमाणे अर्जदाराने 1 महिन्यात कागदपत्रांच्या पूर्ततेसह अर्ज दाखल करावा.काही अपरिहार्य कारणास्तव अर्जदार या मुदतीत अर्ज दाखल करून शकला नाही तर त्यास वाढीव 10 दिवसांची मुदत देण्यात यावी.अशा प्रकारे कमाल 2 महिन्याच्या कालावधीमध्ये सदरच्या अर्जावर कार्यवाही पूर्ण करावी.)
    5 बाल विकास प्रकल्प अधिकारी/जिल्हा महिला बाल विकास अधिकारी यांनी अर्जाची कागदपत्रांची तपासणी करून दरमहा जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांचेकडे  अपुर्ण अर्जांचा अहवाल तसेच परिपूर्ण प्रस्ताव आनलाईन मंजुरीसाठी सादर करावे.(अंगणवाडी पर्यवेक्षिका यांनी सदर अर्जाची व प्रमाणंपत्रांची छाननी/तपासणी करून अर्ज प्रकल्प स्तरावर दिलेनंतर  प्रत्येक महिन्याला नागरी व ग्रामीण क्षेत्रातील बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी तसेच संस्थामधील अनाथ मुलींच्या बाबतीत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी आनलाईन प्रस्ताव  जिल्हा कार्यक्रम अधिकारी,जिल्हा परिषद यांना मान्यतेसाठी  वरील कागदपत्रासहं आनलाईन मंजुरीसाठी सादर करावेत.)
    6 अनाथ मुलींना लाभ मिळण्याबाबत अनाथ प्रमाणपत्र जोडणे-(अनाथ मुलींना लाभ मिळण्याबाबत अर्ज सादर करतांना महिला व बाल विकास विभागाच्या सक्षम प्राधिका-यांकडून देण्यात  आलेले अनाथ प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.)
    7 एखादे कुंटुंब आपले राज्यातुन अन्य राज्यातील जिल्ह्यात स्थलांतर झालेनंतर.(एखादे लाभार्थी कुटुंब या योजनेतील एक अथवा काही टप्प्यांचा लाभ घेतल्यानंतर राज्यातील अन्य जिल्ह्यात स्थलांतरीत झाले असेल तर पुढील टप्प्यातील लाभ अनुज्ञेय होण्याकरिता त्यांनी स्थलांतर झालेल्या जिल्ह्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतील अधिकारी यांचेकडे अर्ज सादर करावा .सदर अर्जाची संबंधित अधिका-यांनी छाननी करून पात्र ठरत असल्यास राज्य कक्षाक़डे शिफारस करावी व राज्य कक्षाकडून अंतिम निर्णय घेण्यात येईल.त्याचप्रमाणे एखादे लाभार्थी कुटुंब या योजनेमधील एक अथवा काही टप्प्यांचा लाभ घेतल्यानंतर राज्याबाहेर स्थलांतरीत झाले असल्यास त्यांनी थेट राज्य कक्षाकडे अर्ज सादर करावा व राज्य कक्ष अंतिम निर्णय घेईल.)

    योजनेअंतर्गत विविध जबाबदाया व कार्यपध्दती खालीलप्रमाणे राहील.

    फॅार्मची आनलाईन पोर्टलवर नोंदणी करणे.

    लेक लाडकी योजनेच्या लाभार्थींची पात्रता पडताळणी करण्याची जबाबदारी ही अंगणवाडी सेविका,संबंधित पर्यवेक्षिका यांची राहील.लाभार्थी पात्रतेची खातरजमा करून लाभार्थीचा अर्ज व सर्व कागदपत्रे आनलाईन पोर्टलवर अपलोड करावीत व प्रमाणित केल्यानंतर लाभार्थांचा आनलाईन अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करावा.

    अ.क्र. कार्यक्षेत्र लाभार्थांची अर्ज स्वीकृती/तपासणी/पोर्टलवर अपलोड करणे अर्ज पडताळणी करून सक्षम अधिका-याकडे आनलाईन मान्यतेकरिता सादर करणे  अंतिम मंजूरी देण्या करिता सक्षम अधिकारी पोर्टलची संपूर्ण जबाबदारी,संचालन,अद्ययावत इ.बाबत राज्य कक्ष प्रमुख जबाबदार असतील.
    1 ग्रामीण अंगणवाडी सेविका/

    पर्यवेक्षिका

    संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण) संबंधित जिल्हा कार्यक्रम अधिकारी, (म.व बा.वि.)
    2 नागरी भाग अंगणवाडी सेविका/

    मुख्यसेविका

    संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी)

    अंगणवाडी सेविका/पर्यवेक्षिका/मुख्यसेविका  यांनी  अपलोड केलेले अर्ज पोर्टलवर परिपूर्ण अपलोड केले असल्याबाबतची  सक्षम अधिका-यांनी खातरजमा करावी.जिल्हा स्तरावरील अधिका-यांनी सदर आनलाईन अर्ज Digitized  करून लाभार्थांस अंतिम लाभ मिळेपर्यंत जतन करण्याची दक्षता घ्यावी.

    सदर योजनेची प्रसिध्दी  जिल्हा कार्यक्रम अधिकारी,जिल्हा परिषद यांनी जिल्हा माहिती अधिकारी यांच्या समन्वयाने करावी.गाव पातळीवरील होणा-या ग्रामसभा/महिला सभांमध्ये सदर योजनेबाबत व्यापक प्रसिध्दी देण्यात यावी.

    सदर योजनेअंतर्गत लाभार्थांना विविध टप्यावर देण्यात येणारा लाभ थेट लाभार्थी हस्तातंरण(DBT) व्दारे  देण्यात येईल.त्याकरिता महिला व बाल विकास विभाग राज्यस्तरावरून  निश्चित केलेल्या आयसीआयसीआय बॅंकेमध्ये खाते उघडण्यात आले असुन त्यामधुन पोर्टलप्रमाणे लाभार्थांना लाभ अनुज्ञेय करण्याकरिता ग्रामीण क्षेत्राच्या बाबतीत जिल्हा कार्यक्रम अधिकारी,जिल्हा परिषद यांना निधी वर्ग करण्यात येईल.व ते थेट लाभार्थी हस्तातंरण(DBT) व्दारे  लाभार्थांच्या खात्यावर जमा करतील.त्याकरिता लाभार्थी व माता यांचे संयुक्त बॅंक खाते उघडणे अनिवार्य राहील. जिल्हास्तरावरून सदर लाभार्थींची पडताळणी करून पात्र यादी तयार केली जाते.तदनंतर बॅकेला सदर लाभार्थीच्या नावे निधी वर्ग (DBT)करणेबाबतची मंजुर यादी दिली जाते व त्यानुसार सदर रक्कम बॅंकेमार्फत लाभार्थीच्या व तिच्या आईच्या संयुक्त खात्यावर बॅंकेमार्फत DBT व्दारे जमा केली जाते. एखाद्या  प्रकरणी मातेचा मृत्यू झालेला असल्यास लाभार्थी व पिता यांचे संयुक्त खाते उघडण्यात यावे.मात्र,अशा प्रकरणात अर्ज सादर करतांना मातेचे मृत्यू प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.अनाथ मुलींना लाभ देताना विभागाच्या इतर योजनांचा लाभ ज्या पध्दतीने त्यांना देण्यात येतो,त्याप्रमाणे कार्यपद्दती करावी.

    एखादे लाभार्थी कुटुंब या योजनेतील एक अथवा काही टप्प्यांचा लाभ घेतल्यानंतर राज्यातील अन्य जिल्ह्यात स्थलांतरीत झाले असेल तर पुढील टप्प्यातील लाभ अनुज्ञेय होण्याकरिता त्यांनी स्थलांतर झालेल्या जिल्ह्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतील अधिकारी यांचेकडे अर्ज सादर करावा .सदर अर्जाची संबंधित अधिका-यांनी छाननी करून पात्र ठरत असल्यास राज्य कक्षाक़डे शिफारस करावी व राज्य कक्षाकडून अंतिम निर्णय घेण्यात यावा.त्याचप्रमाणे एखादे लाभार्थी कुटुंब या योजनेमधील एक अथवा काही टप्प्यांचा लाभ घेतल्यानंतर राज्याबाहेर स्थलांतरीत झाले असल्यास त्यांनी थेट राज्य कक्षाकडे अर्ज सादर करावा व राज्य कक्ष अंतिम निर्णय घेईल.)

     

     

    महिला व बाल विकास विभाग, शासन निर्णय क्र. एबावि-२०२२/प्र.क्र.२५१/का.६,दिनांक ३० ऑक्टोबर, २०२३

    सोबतचे परिशिष्ट

    ———————————————————————————

    फॉर्म- लेक लाडकी योजना अंतर्गत नोंदणीसाठी अर्ज आणि हप्ता मागणी पत्र

    (पहिला हप्ता / दुसरा हप्ता / तिसरा हप्ता / चौथा हप्ता / पाचवा हप्ता)

    ———————————————————————————

    अनिवार्य माहिती.

    वैयक्तिक माहिती

    1.लाभार्थी तपशिल (पहिले अपत्य / दुसरे अपत्य / जुळे अपत्ये)

    1)लाभार्थीचे नाव ——————————————————————–

    2)आधार क्रमांक ——————————————————————–

    3)लाभार्थीचे पालकांचे (आई वडील) यांचे नाव- —————————————————————————————————————————–

    आधार क्रमांक- ———————————–भ्रमणध्वनी क्रमांक- ——————

    ईमेल आय.डी.———————————————-

    (आधार कार्ड प्रत फॉर्म सोबत जोडावी)

    1. सध्याचा निवासाचा पत्ता.
    घर/इमारत/सदनिका क्रमांक रोड/रस्ता/लाईन
    क्षेत्र/परिसर गाव/शहराचे नाव
    पोस्ट ऑफिस तालुका
    जिल्हा पिन कोड
    1. भ्रमणध्वणी क्रमांकः
    1. या योजनेच्या लाभासाठी फॉर्म भरतेवेळी असलेल्या जिवंत अपत्याची संख्या– ( ).
    2. अर्ज करते आहे:-अ) पहिल्या अपत्यासाठी ( )ब) दुस-या अपत्यासाठी( )क)जुळ्या अपत्येसाठी (   )

    (टिप- पहिल्या अपत्यासाठी तिस-या हप्त्यासाठी व दुस-या अपत्यासाठी दुस-या हप्त्यासाठी अर्ज करीत असल्यास कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्यआहे.)

    1. बँके खाते तपशील (सोबत नाव खाते क्रमाक व बँकेचे नाव दाखविणारे पासबुक प्रत जोडावी.

    बॅंक खाते क्रमांक

     

     

    बॅंक आय. एफ. सी. कोड क्रमांक

     

     

     

    बॅंक शाखेचे नाव

     

     

    बॅंक खाते आधार कार्डशी संलग्न आहे किंवा नाही.

     

    1. लेक लाडकी योजनेच्या कोणत्या टप्प्याच्या लाभासाठी अर्ज केला आहे.

    अ) पहिला हप्ता——-  ब) दूसरा हप्ता——क) तिसरा हप्ता ——-ड) चौथा हप्ता- —–इ)पाचवा हप्ता——

    8.मी याव्दारे प्रमाणित करतो/ करते की, वरीलप्रमाणे नमूद केलेली सर्व माहिती सत्य, परिपूर्ण आणि अचुक आहे व माहिती खोटी आढळून आल्यास त्यास मी स्वतः सर्वस्वी जबाबदार राहील.

    दिनांक      /        /

     

    लाभार्थी/ पालक स्वाक्षरी/डाव्या हाताचा अंगठाची निशाणी

    ठिकाण:-

     

     अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रेः

     

    1) लाभार्थीचा जन्माचा दाखला

    2) कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १ लाखपेक्षा जास्त नसल्याबाबत तहसिलदार / सक्षम अधिकारी संलग्न

    3) लाभार्थीचे आधार कार्डची छायांकित प्रत (प्रथम लाभावेळी ही अट शिथील राहील)

    4)पालकाचे आधार कार्डची छायांकित प्रत

    5) बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत

    6) रेशनकार्ड (पिवळे अथवा केशरी रेशन कार्ड साक्षांकित प्रत)

    7)लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असलेबाबतचा दाखला

    8)लाभार्थीचा व आईचा संयुक्त फोटो

    9) मतदान ओळखपत्र छायांकित प्रत (शेवटच्या लाभाकरिता १८ वर्ष पूर्ण झाल्यांनतर मुलीव नाव असल्याचा दाखला)

    10) संबधित टप्प्यावरील लाभाकरिता शिक्षण घेत असल्याबाबतचा संबंधित शाळेचा दाखला (Bonafied)

    11)कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र (पहिल्या अपत्यासाठी तिस-या हप्त्यासाठी व दुस-या अपत्यासाठी दुस-या हप्त्यासाठी अर्ज करीत असल्यास कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे )

    12) अंतिम लाभाकरिता मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक राहील.(अविवाहीत असल्याबाबत लाभार्थींचे स्वयं घोषणापत्र)

     

     

    अंगणवाडी सेविका यांनी भरावयाची माहिती

     

     

    1.अंगणवाडी सेविकेचे नाव————————————————-

    2.अंगणवाडी सेविकेचा मोबाईल क्रमांक- ———————————————-

    1. अंगणवाडी केंद्राचे नाव ————————————————
    2. अंगणवाडी केंद्राचे कोड क्रमांक-
    3. अंगणवाडी केंद्रात लाभार्थीचे नोंदणी केल्याचे दिनांक   /     /              (DD/MM/YYYY)
    4. गावाचे / शहराचे नाव————————————————-
    5. तालुका ———————————————जिल्हा———————-
    6. पिन कोड——————————–

    संलग्न कागदपत्रांची तपासणी यादी.

     

    अ.क्र कागदपत्र कागदपत्रे सोबत जाडली आहेत का? लागु तेथे खुण करावी.
    1 लाभार्थीचे आधार कार्ड होय (    )     नाही (    )    लागु नाही (   )
    2 लाभार्थीच्या आईचे आधार कार्ड होय (    )    नाही (    )     लागु नाही (   )
    3 लाभार्थीचे जन्माचा दाखला होय (    )    नाही (    )     लागु नाही (   )
    4 लाभार्थीचे आई हयात नसल्यास पालकांचे आधार कार्ड होय (    )    नाही (    )     लागु नाही (   )
    5 कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न दाखला (एक लाखा पेक्षा कमी) होय (    )    नाही (    )     लागु नाही (   )
    6 निवासी किंवा रहिवासी पत्याचा पुरावा (महाराष्ट्र राज्य) होय (    )    नाही (    )     लागु नाही (   )
    7 कुटुंब नियोजन प्रमाणपत्र होय (    )    नाही (    )     लागु नाही (   )
    8 शाळेचे बोनाफाईड प्रमाणपत्र होय (    )    नाही (    )     लागु नाही (   )
    9 पाचवा हप्ता घेताना अविवाहीत असल्याबाबत लाभार्थीचे स्वयं घोषणा प्रमाणपत्र होय (    )    नाही (    )     लागु नाही (   )

     

    अंगणवाडी सेविका यांनी सादर अर्जाचा दिनांक     /      /          (DD/MM/YYYY)

     

    दिनांक      /      /2025

     

    ठिकाण:-

     

     

    अंगणवाडी सेविका यांचे नाव व स्वाक्षरी

     

     

    पर्यवेक्षिका यांनी भरावयाची माहिती

     

    मी, श्रीमती ————————————————————यांनी या फॅार्ममध्ये दिलेल्या माहितीची पडताळणी केली आहे हा फॉर्म योग्य प्रकारे भरलेला आहे.

    दिनांक         /     /२०

    बीट कोड ——————-

    ठिकाण———————-

    पर्यवेक्षिका यांचे नाव व स्वाक्षरी

     

    ————————————–येथुन कापा– ———————————

     

    लाभार्थींना  अंगणवाडी सेविका यांनी द्यावयाची पोहच पावती

    (पहिला हप्ता / दुसरा हप्ता / तिसरा हप्ता / चौथा हप्ता / पाचवा हप्ता)

    अंगणवाडी सेविका यांचे नाव– ———————————————————

    अंगणवाडी केंद्र कोड क्रमांक ———————————————————–

    गाव/शहराचे नाव ——————————————————————-

    तालुका- ——————————-जिल्हा- ———————राज्य –महाराष्ट्र

    लाभार्थीचे नाव —————————————-दिनांक-       /     /       रोजी चेकलिस्ट नुसार कागदपत्रासह फॉर्म सादर केला आहे.

    दिनांक      /       /२०

    ठिकाण:-

    अंगणवाडी सेविका यांचे नाव व स्वाक्षरी

    लाभार्थी:

    लेक लाडकी योजना अंतर्गत, पिवळ्या आणि केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबांमध्ये, 1 एप्रिल 2023 किंवा त्यानंतर मुलगी जन्मल्यास

    फायदे:

    वरील प्रमाणे

    अर्ज कसा करावा

    ऑफलाईन