बंद

    एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजना

    • तारीख : 23/09/2018 -

    महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व एकत्रित आयुष्यमान भारत योजना अंतर्गत सातारा जिल्ह्यामध्ये 46 रुग्णालये असून पाच लाखा पर्यंत लाभार्थी कुटुंबांना मोफत होत आहे. या योजनेअंतर्गत 1556 प्रकारच्या शस्त्रक्रिया / उपचार समाविष्ट आहेत, या एकत्रित योजनेअंतर्गत पत्र लाभार्थी यांच्याकडील पिवळे, केशरी, अन्नपूर्णा अंत्योदय योजना तसेच नव्याने पांढरे रेशन कार्ड समाविष्ट करण्यात आलेले आहे. आयुष्यमान  भारत योजना करिता सामाजिक आर्थिक जातनिहाय जनगणना 2011 पात्र यादीनुसार लाभार्थी समाविष्ट आहेत. सातारा जिल्ह्यामध्ये या दोन्ही योजनेअंतर्गत 2715916 लाभार्थी  समाविष्ट असून त्यापैकी 802859 इतके लाभार्थी आयुष्यमान भारत योजने अंतर्गत आहेत व 964841 इतके लाभार्थी महात्मा ज्योतिराव फुले योजने अंतर्गत आहेत.तसेच ९५३०१६ इतकी पांढरे रेशनकार्ड धारक समाविष्ट आहेत.

    लाभार्थी:

    सर्व पात्र लाभार्थी

    फायदे:

    रु.5.00 लक्ष पर्यंत वैद्यकीय शस्त्रक्रियेसाठी मदत

    अर्ज कसा करावा

    शासनाने नामनिर्देशीत केलेल्या रुग्णालयाकडील आरोग्य मित्र यांचेकडे रेशनकार्ड, आधारकार्ड सह अर्ज करता येतो.