जिल्हा परिषद सेस मधून देणेत येणारे विविध पुरस्कार व वैयक्तिक लाभांच्या योजना
उद्येश
दरवर्षी राज्यात कृषि क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणा-या शेतकरी, महिला शेतकरी, कृषि पत्रकार गट तसेच संस्था यांना विविध पुरस्काराने गौरविण्यात येते. या पुरस्काराकरिता प्रस्ताव सादर करणेबाबत कार्यपध्दती आणि मार्गदर्शक सूचना व पुरस्काराचे प्रकार खालीलप्रमाणे.
अनु.क्र. | पुरस्कार |
---|---|
1 | डॉ.जे.के.बसू सेंद्रीय शेती पुरस्कार |
2 | कै.यंशवंतराव चव्हाण फलोत्पादन शेती पुरस्कार. |
3 | कै.यंशवंतराव चव्हाण पुष्पोत्पादन शेती पुरस्कार. |
4 | कै.यंशवंतराव चव्हाण दुग्धोत्पादन शेती पुरस्कार. |
पुरस्कारासाठी परीक्षण व निरीक्षण समिती समिती खालील प्रमाणे
अ.क्र. | परीक्षण व निरिक्षण समिती | हुद्या |
---|---|---|
1 | गट विकास अधिकारी,पंचायत समिती | अध्यक्ष |
2 | पशुधन विकास अधिकारी (मुख्यालय ) | सदस्य |
3 | मंडल कृषि अधिकारी (संबंधित मंडल ) 9-14 | सदस्य |
4 | कृषि अधिकारी, पंचायत समिती (सधन ) | सदस्य सचिव |
अ.क्र. | परीक्षण व निरिक्षण समिती | हुद्या |
---|---|---|
1 | मुख्य कार्यकारीअधिकारी, जिल्हा परिषद सातारा | अध्यक्ष |
2 | अति. मुख्य कार्यकारीअधिकारी, जिल्हा परिषद सातारा | सदस्य |
3 | जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद सातारा | सदस्य |
4 | कार्यक्रम समन्वयक कृषि विज्ञान केंद्र बोरगाव / कालवडे (संबधित तालुका ) | सदस्य सचिव |
5 | कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद सातारा | सदस्य |
सन 1999-2000 पासून सातारा जिल्हा परिषदेमार्फत सेंद्रीय शेतीमध्ये उल्लेखनिय कामगिरी करणा-या शेतक-यांना डॉ.जे.के.बसू सेंद्रीय व आधुनिक शेती पुरस्काराने गौरविण्यात येते. तथापी सदर पुरस्कारांची व्याप्ती वाढविण्याच्या सूचना जिल्हयातील शेतकरी व सन्माननिय पदाधिकारी यांचे कडून होत सदर बाबीचा विचार करून जिल्हा परिषद 717 अनध्ये सन 2024-25 पासून जिल्हयातील सेंद्रीय शेती, फळपिके, फुलशेती व दुग्धमधील दरार जरेखनिय कामगिरी करणा-या शेतक-यांना स्वतंत्र कृषि पुरस्कार, फुलशेती व दुग्धव्यवसाय इ समावेश करण्यात आला आहे. तसेच सदर पुरस्कांरांच्या बक्षिसाच्या रक्कमेची अदायगी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या 2024-25 च्या स्वनिधीचे अंदाजपत्रकामध्ये स्वतंत्र लेखाशिर्षक देखील निर्माण करण्यात आले आहे. तर पुरस्कारांसाठी कार्यपध्दती व मार्गदर्शक सुचना खालील प्रमाणे राहतील.
- डॉ.जे. के. बसू सेंद्रीय शेती पुरस्कार
- पुरस्कारासाठी संबंधित व्यक्तीचे सेंद्रीय शेतीमधील कार्य उल्लेखनिय असावे व संबंधित व्यक्ती स्वत: शेती करणारा असावा व स्वतःचे नांवे शेत जमिन धारणेचा 8/अ उतारा असणे आवश्यक राहील.
- सर्वसाधारणपणे मागील किमान 5-10 वर्षाचा सेंद्रीय शेतीमध्ये अनुभव असणा-या व्यक्तीस प्राधान्य द्यावे.
- संबंधित व्यक्तीचे सेंद्रीय शेतीमधील कार्य परिसरातील इतर शेतक-यांना प्रेरणादायी व दिशादर्शक असावे व पुरस्कारार्थीच्या शेतीतील उपक्रमांचा इतर शेतक-यांना फायदा होणारा असावा.
- व्यक्तीचे कृषि उत्पादन/उत्पन्न, कृषि विस्तार, निर्यात, कृषि प्रक्रीया/ पीकफेरबदल, सेंद्री शेतीसाठी वापरलेले अत्याधुनिक तंत्रज्ञान, त्यामधील त्यांचे कार्य तसेच समाजातील स्थान याबाब सर्वकष विचार करावा.
- शासकीय किंवा शासन अंगीकृत वा सहकारी संस्था यांच्या आस्थापनेवर काम करणारे किंवा सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी पुरस्कारासाठी पात्र असणार नाहीत.
- कै. यशवंतराव चव्हाण फलोत्पादन शेती पुरस्कार
- पुरस्कारासाठी संबंधित व्यक्तीचे फलोत्पादन शेतीमधील कार्य उल्लेखनिय असावे व संबंधित व्यक्ती स्वत: शेती करणारा असावा व स्वत:चे नांवे शेत जमिन धारणेचा 8/अ उतारा असणे आवश्यक राहील.
- सर्वसाधारणपणे मागील किमान 5-10 वर्षाचा फलोत्पादन शेतीमध्ये अनुभव असणा-या व्यक्तीस प्राधान्य द्यावे.
- संबंधित व्यक्तीचे फलोत्पादन शेतीमधील कार्य परिसरातील इतर शेतक-यांना प्रेरणादायी व दिशादर्शक असावे व पुरस्कारार्थीच्या शेतीतील उपक्रमांचा इतर शेतक-यांना फायदा होणारा असावा.
- व्यक्तीचे कृषि उत्पादन/उत्पन्न, कृषि विस्तार, निर्यात, कृषि प्रक्रीया/ पीकफेरबदल, फलोत्पादन शेतीसाठी वापरलेले अत्याधुनिक तंत्रज्ञान, त्यामधील त्यांचे कार्य तसेच समाजातील स्थान याबाबत सर्वंकष विचार करावा.
- शासकीय किंवा शासन अंगीकृत वा सहकारी संस्था यांच्या आस्थापनेवर काम करणारे किंवा सेवानिवृत्त अधिकारी/ कर्मचारी पुरस्कारासाठी पात्र असणार नाहीत.
- कै.यशवंतराव चव्हाण पुष्पोत्पादन शेती पुरस्कार
- पुरस्कारासाठी संबंधित व्यक्तीचे पुष्पोत्पादन शेतीमधील कार्य उल्लेखनिय असावे व संबंधित व्यक्ती स्वत: शेती करणारा असावा व स्वत:चे नांवे शेत जमिन धारणेचा 8/अ उतारा असणे आवश्यक राहील.
- सर्वसाधारणपणे मागील किमान 5-10 वर्षाचा पुष्पोत्पादन शेतीमध्ये अनुभव असणा-या व्यक्तीस प्राधान्य द्यावे.
- संबंधित व्यक्तीचे पुष्पोत्पादन शेतीमधील कार्य परिसरातील इतर शेतक-यांना प्रेरणादायी व दिशादर्शक असावे व पुरस्कारार्थीच्या शेतीतील उपक्रमांचा इतर शेतक-यांना फायदा होणारा असावा.
- व्यक्तीचे कृषि उत्पादन/उत्पन्न, कृषि विस्तार, निर्यात, कृषि प्रक्रीया/ पीकफेरबदल, पुष्पोत्पादन शेतीसाठी वापरलेले अत्याधुनिक तंत्रज्ञान, त्यामधील त्यांचे कार्य तसेच समाजातील स्थान याबाबत सर्वंकष विचार करावा.
- शासकीय किंवा शासन अंगीकृत वा सहकारी संस्था यांच्या आस्थापनेवर काम करणारे किंवा सेवानिवृत्त अधिकारी/ कर्मचारी पुरस्कारासाठी पात्र असणार नाहीत.
- कै.यशवंतराव चव्हाण दुग्धोत्पादन शेती पुरस्कार
- पुरस्कारासाठी संबंधित व्यक्तीचे दुग्धोत्पादन शेतीपुरक व्यवसायामधील मधील कार्य उल्लेखनिय असावे व संबंधित व्यक्ती स्वत: शेती करणारा असावा व स्वत:चे नांवे शेत जमिन धारणेचा 8/अ उतारा असणे आवश्यक राहील.
- सर्वसाधारणपणे मागील किमान 5-10 वर्षाचा दुग्धोत्पादन शेतीपुरक व्यवसायामधील अनुभव असणा-या व्यक्तीस प्राधान्य द्यावे.
- संबंधित व्यक्तीचे दुग्धोत्पादन शेतीपुरक व्यवसायामधील कार्य परिसरातील इतर शेतक-यांना प्रेरणादायी व दिशादर्शक असावे व पुरस्कारार्थीच्या शेतीतील उपक्रमांचा इतर शेतक-यांना फायदा होणारा असावा.
- व्यक्तीचे कृषि उत्पादन/उत्पन्न, कृषि विस्तार, निर्यात, कृषि प्रक्रीया/ पीकफेरबदल, दुग्धोत्पादन शेतीपुरक व्यवसायामधील वापरलेले अत्याधुनिक तंत्रज्ञान, त्यामधील त्यांचे कार्य तसेच समाजातील स्थान याबाबत सर्वंकष विचार करावा.
- शासकीय किंवा शासन अंगीकृत वा सहकारी संस्था यांच्या आस्थापनेवर काम करणारे किंवा सेवानिवृत्त अधिकारी/ कर्मचारी पुरस्कारासाठी पात्र असणार नाहीत.
- उत्स्फुर्त आणि नाविन्यपुर्ण पुरस्कारार्थींचे जास्तीत जास्त आणि दर्जात्मक प्रस्ताव जिल्हा परिषद स्तरावर प्राप्त होणेकरीता तालुकास्तरावर गट विकास अधिकारी, पंचायत समिती कार्यालय यांचे मार्फतच प्रस्ताव सादर करावेत.
- मार्गदर्शक सुचना प्राप्त होताच जिल्हा परिषद तसेच पंचायत समितस्तरावरून जिल्हास्तरीय वर्तमानपत्र व इतर प्रसार माध्यमाव्दारे विस्तृत प्रमाणात प्रसिदधी देऊन निकषानुसार पात्र पुरस्कारार्थींचे जास्तीत जास्त प्रस्ताव पंचायत समिती पातळीवरून येतील याबाबत नियोजन करावे.
- पंचायत समितीस्तरावरून सर्व प्रस्ताव छाननी करावी व तालुकास्तरीय समितीव्दारे संबंधित पुरस्कारार्थीचे शेतीस प्रत्यक्ष क्षेत्रीय भेट देऊन केलेल्या कामाची पाहणी करावी व विहित प्रपत्रामध्ये गुण द्यावेत. सदर प्रक्रीय शीघ्रतेने पुर्ण करून सर्व प्रस्ताव जिल्हास्तरीय समितीकडे सादर करावेत.
- पुरस्काराचा प्रस्ताव सादर करण्यासाठी सोबत प्रपत्र-अ, प्रपत्र-1 व प्रपत्र-1.1 विहीत केले आहे.
- प्रपत्र–अ जे की सर्व पुरस्कारासाठी समान असून त्यामध्ये गट विकास अधिकारी,पंचायत समिती यांनी संबंधित पुरस्कारार्थींची सर्वसाधारण माहिती सादर करणेची आहे.
- प्रपत्र-1 संबंधित पुरस्कारार्थीने भरणेचा असून त्यामध्ये संबंधित पुरस्काराच्या अनुषंगाने केलेल्या कामाचा तपशिल सादर करणेचा आहे. सदरचे प्रपत्र पुरस्कार निहाय स्वतंत्र आहे.
- प्रपत्र-1.1 मध्ये तालुका स्तरीय समितीने प्रत्यक्ष क्षेत्रीय भेट देऊन त्यामध्ये आढळून आलेल्या बाबींसाठी गुण द्यावयाचे आहेत व त्यावर तालुका स्तरीय समितीचे सर्व सदस्यांनी स्वाक्षरी करुन प्रमाणित करणेचे आहे. सदरचे प्रपत्र पुरस्कार निहाय स्वतंत्र आहे.
- प्रत्येक पुरस्काराकरीता संबंधित प्रपत्रातील माहिती पुर्णत: भरल्याची आणि सर्व संबंधितांच्या स्वाक्षरी असल्याची खात्री करूनच प्रस्ताव जिल्हास्तरीय समितीकडे सादर करावेत.
- प्रस्तावित शेतकरी शासन किंवा शासन अंगीकृत संस्थेमध्ये नोकरी करत नसल्याबाबत तसेच सेवानिवृत्त शासकीय कर्मचारी नसले बाबतचे प्रतिज्ञापत्र घ्यावे. तसेच याबाबतची खातरजमा संबंधित गावातील सरपंच, ग्रामसेवक यांचेकडून करून घ्यावी.
- प्रस्ताव सादर करताना त्यामध्ये 7/12, 8/अ मुळप्रतीत जोडणे अनिवार्य राहील. तसेच प्रस्तावासोबत संबंधितांचा एक पासपोर्ट साइज फोटो तसेच फोटोच्या मागे शेतक-याचे संक्षिप्त नांव, मोबाइल नंबर नमुद करून लिफाप्यात सादर करावे. तसेच प्रस्ताव स्पायरल बायडींग केलेला असावा व संबंधित शेतक-याने राबविलेल्या विविध उपक्रमांचे रंगीत फोटो, वर्तमानपत्रातील कात्रणे, यापुर्वी मिळालेल्या पुरस्कारांच्या प्रमाणपत्रांच्या प्रती प्रस्तावासोबत सादर कराव्यात.
- सर्व प्रस्ताव दोन प्रतीत सादर करावेत त्यापैकी केवळ एक मुळ प्रत जिल्हास्तरीय समितीकडे सादर करावी व एक प्रत पंचायत समितीस्तरावर जतन करून ठेवावी.
- जिल्हा स्तरीय समितीकडे प्रस्ताव प्राप्त् झालेनंतर संबंधित पुरस्कारार्थीचे शेतीस प्रत्यक्ष क्षेत्रीय भेटीचे आयोजन करुन जिल्हा स्तरीय समितीने विहित प्रपत्रात (प्रपत्र-1.1 मध्ये )गुण द्यावेत.
- तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय समितीने दिलेल्या गुणांचे एकत्रीकरण करून प्रत्येक पुरस्काराचा गुणांचा तुलनात्मक तक्ता तयार करून पुरस्कारार्थींचे गुणानुक्रम निश्चित करावेत.
- जिल्हास्तरीय समिती मधील सर्व सदस्यांच्या मान्यतेने प्रत्येक पुरस्काराचे गुणानुक्रम अंतिम करून पुरस्कार विजेत्या शेतक-यांचा समारंभपुर्वक सत्कार करण्यात यावा व पुरस्काराचे वितरण मान्यवरांचे हस्ते करावे.
- नाविन्यपूर्ण योजना अतंर्गत कृषि पर्यटन केंद्र प्रशिक्षण
- कृषि विज्ञान केंद्राव्दारे प्रशिक्षणाचे आयोजन.
- महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ येथे कृषि संलग्न विभागासेाबत कार्यशाळेचे आयोजन.
- जिल्हा परिषद स्वनिधी मधून कृषि पर्यटनास चालना देणेची योजना.
- नाविन्यपुर्ण योजना अंतर्गत सातारा ऑरगॅनिक उपक्रमास चालना देणे
- शेतकऱ्यांना अनुदानावर कडबाकुट्टी यंत्र वाटप योजना :- जनावरांना वापरण्यात येणाऱ्या चाऱ्याची उपयुक्तता वाढविणेसाठी जिल्हा परिषदेच्या सेस निधीमधून शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदानावर कडबाकुट्टी यंत्राचे वाटप करण्यात येते. यामध्ये अल्प,अत्यल्प भुधारक शेतकरी,महीला शेतकरी, अपंग शेतकरी व मागासवर्गीय शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाते.
- शेतकऱ्यांना अनुदानावर सिंचन साहीत्याचे वाटप करणेची योजना :- ज्या शेतकऱ्यांकडे पिकांना पाणी देण्यासाठी सिंचन सुविधा उपलब्ध आहे अशा गरजू शेतकऱ्यांना विद्यूतपंपसंच,डीझेल इंजिन अथवा पेट्रो डीझेल इंजिन तसेच एचडीपीई पाईप सारख्या सिंचन साहीत्याचे 50 टक्के अनुदानावर वाटप केले जाते. यामध्ये अल्प,अत्यल्प भुधारक शेतकरी,महीला शेतकरी,अपंग शेतकरी व मागासवर्गीय शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाते.
- शेतकऱ्यांना अनुदानावर ताडपत्री वाटप योजना :- धान्याचे पावसापासून संरक्षण करणे, मळणी वेळी धान्याची साठवणूक करणे इत्यादी साठी शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदानावर ताडपत्रींचे वाटप जिल्हा परिषद सेस योजनेमधून केले जाते. यामध्ये अल्प,अत्यल्प भुधारक शेतकरी,महीला शेतकरी,अपंग शेतकरी व मागासवर्गीय शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाते.
- शेतकऱ्यांना अनुदानावर सुधारीत/संकरीत बियाणे वाटप योजना :- बियाणे बदलाचा दर वाढवून पिकांचे प्रति हेक्टरी उत्पादकता वाढविणेसाठी शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदानावर बाजरी,मका,सोयाबीन, भुईमुग, वाटाणा, घेवडा इत्यादी पिकांचे संकरीत/सुधारीत वाणाचे बियाणेचे वाटप केले जाते. यामध्ये अल्प,अत्यल्प भुधारक शेतकरी,महीला शेतकरी,अपंग शेतकरी व मागासवर्गीय शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाते.
- शेतकऱ्यांना अनुदानावर पिक संरक्षण आयुधांचे वाटप करणेची योजना :- पिकांचे किड व रोगा पासून संरक्षण करणेसाठी शेतकऱ्यांना बॅटरी ऑपरेटेड स्प्रेपंप,इंपोर्टेड स्प्रेपंप,एचटीपी स्प्रेपंप इत्यादी पिक संरक्षण आयुधांचे वाटप 50 अनुदानावर वाटप केले जाते. यामध्ये अल्प,अत्यल्प भुधारक शेतकरी,महीला शेतकरी,अपंग शेतकरी व मागासवर्गीय शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाते.
- शेतकऱ्यांना अनुदानावर सायकल कोळप्यांचे वाटप योजना :- पिकातील आंतरमशागतीचे काम करणे,तण नियंत्रण करणे यासाठी शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदानावर सायकल कोळप्यांचे वाटप केले जाते. यामध्ये अल्प,अत्यल्प भुधारक शेतकरी,महीला शेतकरी,अपंग शेतकरी व मागासवर्गीय शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाते.
- शेतकऱ्यांना कृषि पर्यटनासाठी प्रोत्साहन देणेची योजना
- सातारा जिल्हा वैशिष्ठयपुर्ण जिल्हा असून जिल्हयास ऐतिहासिक व भौगोलिक वारसा लाभलेला आहे. जिल्हयाच्या पश्चिमेकडील भागात सहयाद्रीच्या डोंगररांगा, जंगल, नदयांचे उगमस्थान असून अनेक देवस्थान जिल्हयात आहेत. तसेच पुर्व भागामध्ये विस्तृत पठारी प्रदेश आहे.
- जिल्हयात बाजरी पासून स्ट्रॉबेरी, भात,ऊस या सारख्या विविध पिक पध्दतींचा समावेश आहे.जिल्हयाची वैशिष्ठयपुर्ण भौगोलिक परिस्थिती कृषि पर्यटनास पुरक असल्याने व शेतीस उत्तम पुरक व्यवसाय असल्याने कृषि पर्यटन व्यवसायासाठी मोठया प्रमाणावर संधी जिल्हयातील शेतकऱ्यांना उपलब्ध आहे.मात्र हा व्यवसाय शास्त्रोक्त पध्दतीने केल्यासच किफायतशीर हेाऊ शकतो हि बाब लक्षात घेऊन सातारा जिल्हा परिषदेमार्फत सन 2014-15 पासून कृषि पर्यटनास चालना देणेची नाविन्यपुर्ण योजना सुरू केली. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या स्वनिधीचे अंदाजपत्रकात तरतुद करण्यात आली.
- सदरचा व्यवसाय करण्यास इच्छूक असणाऱ्या शेतकऱ्यांना जिल्हा परिषदेमार्फत एकत्रित केले व त्यांना जिल्हा परिषदेकडून कोणकोणत्या बाबीसाठी मदत/सहकार्य अपेक्षित आहे याची माहीती घेण्यात आली.त्यामध्ये इच्छूक शेतकऱ्यांना कृषि पर्यटनाचे तांत्रिक व सखोल प्रशिक्षणाची आवश्यक आहे हे लक्षात आले. कृषि पर्यटन व्यवसाय यशस्वीपणे राबविणेसाठी केंद्र चालकांना सखोल प्रशिक्षण मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी सातारा जिल्हा परिषदेने सन 2014-15 पासून कृषि पर्यटन केंद्र सुरू करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना कृषि विज्ञान केंद्र,बारामती येथे निवासी प्रशिक्षण देणेची योजना सुरू केली. व त्यामध्ये सहभागी शेतकऱ्यांना जिल्हा परिषदेच्या निधीमधून प्रशिक्षण देणेची सोय निर्माण केली.
- सन 2014-15 पासून शंभरपेक्षा जास्त शेतकऱ्यांना बारामती येथे निवासी प्रशिक्षण देण्यात आले. तसेच तालुका स्तरावरील क्षेत्रीय कृषि अधिकाऱ्यांना देखील या प्रशिक्षणामध्ये सहभागी करून घेण्यात आले,जेणेकरून तालुका स्तरावर कृषि पर्यटनाबाबची माहीती शेतकऱ्यांना उपलब्ध होईल. या प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षणार्थींना कृषि पर्यटनाशी निगडीत अनेक विषयांचे सखोल मार्गदर्शन तज्ञांमार्फत करण्यात आले.
- कृषि पर्यटन व्यवसाय करीत असताना त्यामध्ये आलेल्या अनुभवांची देवाण घेवाण करण्यासाठी जिल्हयातील कृषि पर्यटन केंद्र चालकांचे मासिक चर्चासत्र जिल्हा परिषदेमार्फत आयोजित करण्यात येत आहे. सदरचे चर्चासत्रामध्ये या व्यवसायातील अडी-अडचणी व त्यावरील उपाययोजनांबाबत सखोल चर्चा करण्यात येते.जिल्हयात तसेच परजिल्हयात ज्या ठिकाणी यशस्वीपणे कृषि पर्यटन सुरू आहे तसेच ज्या ठिकाणी नाविन्यपुर्ण उपक्रम राबविला जात आहे. अशा कृषि पर्यटन केंद्रांना इच्छूक केंद्र चालकांची क्षेत्रीय भेट देणेची योजना सन 2016-17 मध्ये सुरू करण्यात येत आहे.
- कृषि पर्यटनास शासनाची कोणतीही योजना सद्यास्थितीत सुरू नाही. परंतू कृषि पर्यटनामध्ये अंर्तभूत असलेल्या फळबाग, गांडुळ प्रकल्प, रेशीम उद्योग, शेततळे, रोपवाटीका यासारख्या बाबींच्या शासकीय योजनांचा लाभ प्राधान्याने कृषि पर्यटनधारकांना करण्यास जिल्हा परिषद पुढाकार घेत आहे.
- कृषि पर्यटनास चालना देण्याच्या उद्येशाने शेतकऱ्यांना प्रोत्साहीत करणे देखील आवश्यक असून जिल्हा परिषदेने सन 2015-16 पासून उत्कृष्ट कृषि पर्यटन केंद्रचालकास कृषि पर्यटन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे.जिल्हयात सन 2013-14 मध्ये केवळ 5-6 कृषि पर्यटन केंद्र सुरू झाली होती, मात्र जिल्हा परिषदेने या संकल्पनेमध्ये पुढाकार घेतल्याने महाराष्ट्र कृषि पर्यटन विकास महामंडळाकडे 86 कृषि पर्यटन केंद्रांची नोंदणी झाली असून त्यापैकी 50 ते 60 इतकी कृषि पर्यटन केंद्र सुरू झाली आहे.
- कृषि पर्यटनाच्या शेती पुरक व्यवसायामुळे जिल्हयातील शेतकऱ्यांच्या मासिक उत्पन्नात मोठया प्रमाणावर वाढ झालेचे दिसून येते. सदरची वाढ हि रू.50,000/- पासून रू .2,50,000/- प्रति महिना इतकी झालेली आहे.यावरून सदरचा व्यवसाय यशस्वीपणे राबविला जात असल्याचे दिसून येते.
- शेतकऱ्यांना सेंद्रीय शेतीस प्रोत्साहन देणेच्या योजना
- रासायनिक खतांचा व किटकनाशकांचा वापर दिवसेंदिवस वाढत चालला असून त्यामुळे सामान्य लोकांचे आरोग्याचे प्रश्न गंभिर स्वरूप धारण करू लागले आहेत. लोकांना विषमुक्त अन्न खायला मिळावे यासाठी उत्पादक शेतकरी तसेच उपभोक्ता सामान्य नागरीक यांचे मध्ये रासायनिक खतांचे व किटकनाशकांचे दुष्परीणामाबाबत व्यापक जागृती निर्माण करणे हि काळाची गरज आहे किंबहुना आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. सदरच्या समस्येवर मात करण्यासाठी सेंद्रीय शेतीस व सेंद्रीय उत्पादन खरेदीसाठी प्रोत्साहन देणे शिवाय पर्याय नाही. या सामाजिक हिताच्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी सातारा जिल्हयातील शेतकऱ्यांच्या सहभागातून सातारा ऑरगॅनिक हा उपक्रम सातारा जिल्हा परिषदेमार्फत राबविला जात आहे.
- सातारा ऑरगॅनिक उपक्रमाचा शुभारंभ जिल्हयाचे मा.पालकमंत्री महोदय यांचे हस्ते दिनांक 15 ऑगस्ट 2015 रोजी करण्यात आला.
- या उपक्रमांतर्गत जिल्हयातील सेंद्रीय शेती उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना एकत्रित करणे, सेंद्रीय शेती उत्पादक शेतकऱ्यांची ओळख निर्माण करून देणे, त्यांचे मार्फत उत्पादीत होणाऱ्या सेंद्रीय शेतमालाची माहिती संकलित करणे, सेंद्रीय शेत मालाच्या विक्रीसाठी जि.प.च्या अखत्यारीतील जागा उपलब्ध करून देणे, सेंद्रीय शेतीचे उत्पादन खरेदी करणाऱ्या ग्राहकांची माहिती संकलित करणे, सेंद्रीय शेती उत्पादक शेतकरी व ग्राहक यांचेमध्ये समन्वय साधून उत्पादक-ग्राहक साखळी निर्माण करून देणे यासारख्या विविध प्रक्रीया जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येत आहेत.
- सेंद्रीय शेतीचा प्रचार व प्रसार करणेसाठी जिल्हयात तालुकानिहाय सेंद्रीय शेती तज्ञ समन्वयक यांची नेमणूक जिल्हा परिषदेने करून दिली असून या समन्वयांकाकडे जिल्हयातील इतर शेतकऱ्यांसाठी एक दिवसाची कार्यशाळा व शिवार फेरी आयोजित करण्यात येते व या कार्यशाळेमध्ये सेंद्रीय शेती विषयक मार्गदर्शन शेतकऱ्यांना करण्यात येते. कार्यशाळा ज्या समन्वयकाच्या शेतात आयोजित केली जाते त्यास जिल्हा परिषद निधीमधून प्रति कार्यशाळा रूपये 7,500/- मानधन व उपस्थितांना चहा-पाणी व भोजन इत्यादीचे खर्चासाठी देण्यात येते.
- शालेय विद्यार्थ्यांना देखील सेंद्रीय शेतीचे महत्व व प्रत्यक्ष सेंद्रीय शेती विषयक संकल्पना पटवून दिल्यास त्याचा संदेश विद्यार्थ्याच्या कुटुंबापर्यत पोहचविला जाणार आहे, हि बाब लक्षात घेऊन जिल्हा परिषदांकडील प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सहलींचे आयोजन सेंद्रीय शेती समन्वयक शेतकऱ्याच्या शेतावर केले जाते व त्यापोटी समन्वयकास जिल्हा परिषद निधीमधून रू.1,000/- मानधन देण्यात येते.
- शालेय विद्यार्थी व सेंद्रीय शेती समन्वयकांना सेंद्रीय शेती मधील विविध संकल्पनांची शास्त्रोक्त माहिती उपलब्ध करून देणेसाठी जिल्हा परिषदेने पुस्तिका तयार करून दिली आहे.यामध्ये सेंद्रीय शेतीच्या सर्व संकल्पना मोजक्या शब्दात रंगित सचित्र स्वरूपात दिली आहे. जिल्हा परिषदेने या पुस्तिकेच्या 3000 प्रती वाटप केल्या आहेत.
- तसेच सेंद्रीय शेतीमध्ये उल्लेखनिय काम करणाऱ्या शेतकऱ्यांचा जिल्हा परिषदेमार्फत दर वर्षी 1 जुलै या कृषि दिनी डॉ.जे.के.बसू सेंद्रीय व आधुनिक शेती पुरस्कार या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.यामध्ये रोख रक्कम, प्रशिस्तीपत्र, सन्मानचिन्ह, पुष्प-गुच्छ इ. चे वितरण मान्यवरांचे हस्ते करण्यात येते.
- जिल्हा परिषद सेस सन 2024-25 चे निधीमधून शेतक–यांना मधुमक्षिका पालनास प्रोत्साहन देणेची योजना
अटी व शर्ती
- लाभार्थीचे वय 18 वर्षे पुर्ण असावे, योजनेचा लाभ घेणेसाठी लाभार्थी शेतकरी असावा, स्वत:च्या नांवे 8/अ उतारा असावा, लाभार्थीकडे मधमाशा पालनासाठी उपयुक्त फळझाडे /फळभाज्या/ फुल पिके/ कडधान्य/गळीतधान्य/ तृणधान्य पिके असावीत तसेच स्वमालकीच्याक्षेत्रात अथवा परिसरामध्ये मधमाशा पालनासाठी उपयुक्त जंगली वनस्पती असाव्यात.
- एकूण प्राप्त अर्जापैकी प्रवर्ग निहाय प्राधान्य पुढील प्रमाणे अ.जा.15%, अ.ज.7.5%, महिला 30%, अपंग 5%, उर्वरीत इतर
- पात्र लाभार्थींचे प्रस्ताव गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांचे मार्फत सादर झाल्यानंतर सदर लाभार्थींच्या निवडीस जि.प.ठराव समिती सभेची मान्यता घ्यावी. मंजूर लक्षांक/तरतुदीपेक्षा जास्त अर्ज आल्यास पंचायत समितीस्तरावर प्राप्त अर्जांची प्रवर्गनिहाय निहाय लॉटरी काढून योजनेच्या लाभासाठी जेष्ठता यादी तयार करावी व सदर यादीस जि.प.ठराव समितीची मान्यता घ्यावी.
- तालुक्यास निर्धारीत लक्षांका इतक्या मान्यता प्राप्त यादीतील लाभार्थींना गट विकास अधिकारी अथवा कृषि अधिकारी पं.स.यांनी पुर्वसंमत्ती दयावी व लाभार्थीस जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी,सातारा /मध संचालनालय, महाबळेश्वर यांचे कार्यालयाकडून अनुदानीत 5 मधपेटयांची (आवश्यक साहित्य व वसाहतीसह) खरेदी करण्यास सुचित करावे. सदर लाभार्थींनी मधसंचालनालय,महाबळेश्वर / खादी ग्रामोद्योग,सातारा येथिल कार्यालयामध्ये 5 मधपेटयांसाठी लाभार्थी हिस्सा भरून त्यांचे कार्यालयामार्फत प्रथम प्रशिक्षण घेणे बंधनकारक राहील.
- मध संचालनालय, महाबळेश्वर कार्यालयाकडून आवश्यक प्रशिक्षण पुर्ण केलेचे प्रमाणपत्र सादर केले नंतर लाभार्थीस जि.प.योजने अंतर्गत जास्ती जास्त 5 मधपेटयांसाठी ( आवश्यक साहिय व वसाहतीसह ) अनुदान देय राहील.
- खादी व ग्रामोदयाग मंडळाचे अधिनस्त संचालक,मधसंचालनालय, महाबळेश्वर यांचे कडील प्रति 5 मधपेटयांचे युनिटचा दर व देय अनुदान खालील प्रमाणे राहील.
- वरील रकान्यात दर्शविलेल्या मधमाशांचे प्रकार व मधपेटीच्या प्रकारापैकी कोणत्याही प्रकारची निवड करण्याची लाभार्थीस मुभा राहील व त्यानुसार अनुदान देय राहील.
- एका लाभार्थीस 5 मधपेटी युनिटसाठी जि.प.अनुदान देय असून सदरचे अनुदान लाभार्थीने जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी,सातारा / मध संचालयनालयामार्फत मधपेटयांची खरेदी केल्यानंतर तसेच प्रशिक्षण घेतले नंतर व याचा पुरावा सादर केल्यानंतर जि.प.अनुदान अदा करावे.
- योजने अंतर्गत लाभार्थींचे जि.प.अनुदान यांचे बँक खाती डीबीटी पध्दतीने वर्ग करण्यात यावे, या करीता गट विकास अधिकारी,पंचायत समिती यांचेस्तरावर वित्त प्रेषणाव्दारे निधी उपलब्ध करून दयावा.
मधपेटयांचे युनिटचा दर व देय अनुदान खालील प्रमाणे अ.क्र मधमाशा व मधपेटीचा प्रकार प्रति नग मधपेटयांची किंमत रुपये ५ युनिट मधपेटयांची पुर्ण किंमत रुपये खादी ग्रामोद्योग व्दारे दिले जाणारे 50 टक्के अनुदान प्रती ५ युनिट रु. जिल्हा परिषदेमार्फत दिले जाणारे 50 टक्के अनुदान रु. एकुण देय अनुदान रु. 1 मेलीफेरा वसाहतीसह जंगली मधपेटी युनिट 3930/- 19650/- 9825/- 9825/- 19650/- 2 सातेरी वसाहतीसह जंगली मधपेटी युनिट 5400/- 27000/- 13500/- 13500/- 27000/- 3 सातेरी वसाहतीसह सागवानी मधपेटी युनिट 6700/- 33500/- 16750/- 16750/- 33500/- 4 मेलीफेरा जंगली रिकाम्या मधपेटी युनिट 1980/- 9900/- 4950/- 4950/- 9900/- 5 सातेरी जंगली रिकाम्या मधपेटी युनिट 2400/- 12000/- 6000/- 6000/- 12000/- 6 सातेरी सागवानी रिकाम्या मधपेटी युनिट 3700/- 18500/- 9250/- 9250/- 18500/-
सेंद्रीय शेतीमध्ये उल्लेखनिय कामगिरी करण्या-या शेतक-यांना सदर पुरस्काराने जिल्ह परिषदेमार्फत गौरविण्यात येईल. या पुरस्कारांसाठी इच्छुक शेतक-यांनी गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांचेमार्फत प्रस्ताव विहीत कागदपत्रांसह सादर करणे बंधनकारक राहील. सदर पुरस्कारासाठी तीन व्यक्तींची निवड जिल्हा परिषदेमार्फत केली जाईल.
पुरस्काराचे स्वरूप
अनु.क्र. | रक्कम | बक्षीस |
---|---|---|
प्रथम क्रमांक | 25,000/- | पुरस्कार विजेत्या व्यक्तीस स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ /रोप सपत्नीक सत्कारच्या स्वरूपात गौरविण्यात येईल |
व्दितीय क्रमांक | 15,000/- | |
तृतीय क्रमांक | 10,000/- |
पुरस्कारासाठी निकष
फळ पिकांचे / फलोत्पादन शेतीमध्ये उल्लेखनिय कामगिरी करण्या-या शेतक-यांना सदर पुरस्काराने जिल्हा परिषदेमार्फत गौरविण्यात येईल. या पुरस्कारांसाठी इच्छूक शेतक-यांनी गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांचेमार्फत प्रस्ताव विहीत कागदपत्रांसह सादर करणे बंधनकारक राहील. पुरस्कारासाठी एकूण तीन व्यक्तींची निवड जिल्हा परिषदेमार्फत केली जाईल.
अनु.क्र. | रक्कम | बक्षीस |
---|---|---|
प्रथम क्रमांक | 25,000/- | पुरस्कार विजेत्या व्यक्तीस स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ /रोप सपत्नीक सत्कारच्या स्वरूपात गौरविण्यात येईल |
व्दितीय क्रमांक | 15,000/- | |
तृतीय क्रमांक | 10,000/- |
पुरस्कारासाठी निकष
फुलपिकांचे / पुष्पोत्पादन शेतीमध्ये उल्लेखनिय कामगिरी करण्या-या शेतक-यांना सदर पुरस्काराने जिल्हा परिषदेमार्फत गौरविण्यात येईल. या पुरस्कारांसाठी इच्छूक शेतक-यांनी गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांचेमार्फत प्रस्ताव विहीत कागदपत्रांसह सादर करणे बंधनकारक राहील. सदर पुरस्कारासाठी एकूण तीन व्यक्तींची निवड जिल्हा परिषदेमार्फत केली जाईल. पुरस्काराचे स्वरूप पुढील प्रमाणे राहील.
अनु.क्र. | रक्कम | बक्षीस |
---|---|---|
प्रथम क्रमांक | 25,000/- | पुरस्कार विजेत्या व्यक्तीस स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ /रोप सपत्नीक सत्कारच्या स्वरूपात गौरविण्यात येईल |
व्दितीय क्रमांक | 15,000/- | |
तृतीय क्रमांक | 10,000/- |
पुरस्कारासाठी निकष
दुग्धोत्पादन या शेतीपुरक व्यवसायामध्ये मध्ये उल्लेखनिय कामगिरी करण्या-या शेतक-यांना सदर पुरस्काराने जिल्हा परिषदेमार्फत गौरविण्यात येईल. या पुरस्कारांसाठी इच्छूक शेतक-यांनी गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांचेमार्फत प्रस्ताव विहीत कागदपत्रांसह सादर करणे बंधनकारक राहील. सदर पुरस्कारासाठी एकूण तीन व्यक्तींची निवड जिल्हा परिषदेमार्फत केली जाईल. पुरस्काराचे स्वरूप पुढील प्रमाणे राहील.
अनु.क्र. | रक्कम | बक्षीस |
---|---|---|
प्रथम क्रमांक | 25,000/- | पुरस्कार विजेत्या व्यक्तीस स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ /रोप सपत्नीक सत्कारच्या स्वरूपात गौरविण्यात येईल |
व्दितीय क्रमांक | 15,000/- | |
तृतीय क्रमांक | 10,000/- |
पुरस्कारासाठी निकष
विविध पुरस्कासाठी प्रस्ताव तयार करणे आणि सादर करणेबाबत कार्यपध्दती
सेंद्रीय शेतीमध्ये उल्लेखनीय काम तसेच आधुनिक तत्रंज्ञानाचा वापर करुन शेतीचे उत्पादन करणारा सातारा जिल्हयातील कोणताही शेतकरी या पुरस्कारासाठी निवडीमध्ये भाग घेऊ शकेल. सदरचा पुरस्कार केवळ सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने देणेत येतो व त्याचे वितरण दरवर्षी 1 जुलै या दिवशी केले जाते. डॉ.जे.के.बसू हे आंतरराष्ट्रीय किर्तीचे मृदा शास्त्रज्ञ होते.सन 1925 ते 1940 या काळात मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगांव येथे त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील दक्षिण कालवा विभागातील ऊस जमिनीचे सर्वेक्षण करून ऊसाखालील जमिनींचे वर्गीकरण केले.सदर सर्वेक्षणानुसार त्यांनी अ,ब,क,ड,ह,फ या जमिनींच्या प्रकारानुसार ऊस लागवडीसाठी दोन सरीतील अंतर,पाण्याच्या पाळया,ऊसाचे वाण,खतांच्या मात्रा निश्चित करण्याचे संशोधनात्मक कामकाज केले.
भारतात अशा प्रकारचे मृद सर्वेक्षण करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य आहे.जमिनीच्या प्रकारानुसार ऊसाकरीता केलेल्या सदरहू शिफारशी मुळे ऊसाचे उत्पादन वाढू लागले व त्याचा बहूसंख्य शेतकऱ्यांना होऊ लागला.अशा प्रकारे महाराष्ट्रातील मृद सर्वेक्षणाच्या कामाचा पाया डॉ.जे.के.बसू यांच्या कारकिर्दीत घालण्यात आला.सन 1999-2000 मध्ये त्यांचे सुपुत्र मा.श्री.रतिकांत बसू यांनी सातारा जिल्हयास सहकुटुंब भेट दिली. त्याचवेळी पाडेगाव ऊस संशोधन केंद्रास देखील भेट देऊन सदर भेटीवेळी उपस्थित असलेले जिल्हा परिषदेचे तात्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री.दिलीप बंड यांचे कडे डॉ. जे.के.बसू यांचे स्मृती प्रित्यर्थ शेतकऱ्यांसाठी काही मदत करण्याचे मत मा.श्री.रतिकांत बसू यांनी व्यक्त केले. त्यास अनुसरून सातारा जिल्हयातील सेंद्रीय व आधुनिक शेती मध्ये उल्लेखनिय काम करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी डॉ.जे.के.बसू सेंद्रीय व आधुनिक शेती पुरस्कार देणेची संकल्पना बसू कुटुंबियांनी मान्य करून त्यासाठी त्यांनी रूपये 1.00 लाखाची रक्कम कायम स्वरूपी ठेव जिल्हा परिषदेस सुपुर्द केली.
सदर पुरस्कारासाठी व्यक्ती / संस्थांची निवड करणेसाठी मा.अध्यक्ष,जिल्हा परिषद यांचे अध्यक्षतेखाली निवड समिती निश्चित करण्यात आली आहे.जि.प.कडे सदरच्या ठेवीतून मिळणाऱ्या व्याजाच्या रक्कमेतून पुरस्कारासाठी निवड होणाऱ्या शेतकऱ्यांस बक्षिसाची रक्कम रोखीने दिली जात आहे.
सातारा जिल्हा हा पर्यटनाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. परंतू शेती क्षेत्र ही पर्यटनाचे स्थळ होऊ शकेल. यातुन “कृषी पर्यटन” संकल्पनेचा उदय झाला. या योजनेची वैशिष्टये
देशात हरित क्रांतीनंतर अन्नधान्य व कृषि उत्पादन वाढीसाठी सुधारित, संकरीत जातीच्या बियाणेचा वापर वाढला तसेच अधिक उत्पादन काढण्यासाठी सिंचन सुविधा, रासायनिक खतांचा वापर, पिकांवरील किड/रोगांचे नियंत्रणासाठी किटकनाशके/बुरशीनाशके यांचा वापर शेतकरी मोठया प्रमाणावर करु लागले, सुरवातीच्या काळात रासायनिक खताला प्रतिसाद मिळाल्याने कृषि उत्पादनात देखील मोठया प्रमाणावर वाढ झाली. परंतु मर्यादित क्षेत्रातुन अधिकाअधिक कृषि उत्पादन वाढीसाठी शेतक-यांमध्ये स्पर्धा होऊन रासायनिक खते, किटकनाशके व सिंचनाचा अतिरिक्त वापर होऊ लागला आहे. त्याचे दुष्परिणाम गेल्या काही वर्षापासून दिसून येत आहे. जमिनीचे आरोग्य बिघडून शेती उत्पादनामध्ये रासायनिक खतांचे, किटकनाशकांचे अंश राहिल्याने विषयुक्त अन्नाचे सेवन होऊन लोकांच्या आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत.
या दुष्परिणामांवर उपाययोजना म्हणून सेंद्रीय शेती पध्दतीचा अंगीकार करणे ही काळाजी गरज निर्माण झालेली आहे.
त्यासाठी सेंद्रीय शेतीचे महत्व पटवून देणे, सेंद्रीय कृषि उत्पादनांचे आरोग्याच्या दृष्टिने फायदे, विषमुक्त अन्न म्हणजे काय, सेंद्रीय शेतीस प्रोत्साहन देणे, सेंद्रीय शेतमालास बाजारपेठ उपलब्ध करुन देणे, सेंद्रीय शेती बाबत तज्ञांमार्फत शालेय विद्यार्थ्यांना सेंद्रीय शेती कशी व का करायची याचे महत्व पटवून देण्यासाठी प्रशिक्षण देणे इत्यादीसाठी सातारा जिल्हा परिषदेमार्फत सन 2015-16 पासून सातारा ऑरगॅनिक हा नाविन्यपुर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. सातारा ऑरगॅनिक उपक्रमातंर्गत तालुक्यात सेंद्रीय शेती करणारे 32 शेतक-यांची तालुका तज्ञ मार्गदर्शक म्हणून नेमणुक करण्यात आली आहे. या उपक्रमाअंतर्गत वर नमुद केले प्रमाणे सेंद्रीय शेतीच्या विविध संकल्पना शालेय विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शेतक-यांचे शेतावर पाहण्यास व अनुभवन्यास मिळणेसाठी शालेय विद्यार्थ्याच्या सहलीचे आयोजन करणेत आले आहे. शालेय विद्यार्थ्याना मार्गदर्शन केल्याचे मोबदल्यात त्यांना कृषि विभागा मार्फत मानधनपोटी अनुदान ही देण्यात येत आहे. योजनेतंर्गत नेमणुक केलेल्या मार्गदर्शक तज्ञावर विविध जबाबदा-या निश्चित करणेत आल्या आहेत.
योजनेचा उद्देश
शालेय विद्यार्थ्यांना सेंद्रीय शेतीचे महत्व पटवून देऊन सेंद्रीय कृषि उत्पादन घेण्याबाबतच्या संकल्पनेचा विस्तार घरोघरी पोहचविणे हा प्रमुख उद्देश प्रस्तावित योजनेमधून साध्य करावयाचा आहे. सेंद्रीय शेतीच्या विविध संकल्पना शालेय विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शेतक-यांचे शेतावर पाहण्यास व अनुभवन्यास मिळणेसाठी विद्यार्थ्याच्या सहलींचे आयोजन तालुक्यासाठी नेमलेल्या तज्ञ मार्गदर्शक शेतक-यांचे शेतावर करणेत आले आहे.जेणेकरुन विद्यार्थी सेंद्रीय शेतीची संकल्पना आत्मसात करतील तसेच सेंद्रीय शेतीचे महत्व वाढीस लागेल व त्याचा प्रचार व प्रसार करतील.
जिल्हा परिषद सेस निधी मधून शेतकऱ्यांना व्यक्तीगत लाभाच्या खालील प्रमुख योजनांचा लाभ देण्यात येतो.
लाभार्थी:
ग्रामीण भागातील शेतकरी
फायदे:
वरील प्रमाणे
अर्ज कसा करावा
पंचायत समिती कार्यालयास अर्ज दाखल करणे.