स्वच्छ भारत मिशन
परिचय:-
पाणी व स्वच्छता विभाग हा सातारा जिल्हा परिषदेमधील एक विभाग आहे. पाणी व स्वच्छता विकासाशी संबंधित विविध कार्यक्रम , व योजना राबविण्यासाठी जिल्हा परिषदेमध्ये पाणी व स्वच्छता समितीची स्थापना करण्यात आलेली आहे .सदर विभाग हा मा जिल्हाधिकारी सो व मुख्यकार्यकारी अधिकारी याचे प्रमुख नियत्रणाखाली जिल्हातील पाणी व स्वच्छता विषयक विविध योजनेचे अमलबजावणी केली जात आहे.
दृष्टी आणि ध्येय :-
ग्रामीण भागातील जनतेस दर दिवसी दर व्यक्तीला 55 ली शुद्ध पाणी पुरवणे व वैयक्तीक शौचालये देणे बरोबरच स्वच्छ व आरोग्यदायी वातावरण गाव स्तरावर निर्माण करून देणे .
उद्दिष्टे आणि कार्ये :-
स्वच्छ भारत मिशन योजनेचा उद्देश :
सर्व नागरिकांना आरोग्यदायी जीवनाचा लाभ करुन देणे तथा महिला, वृध्द, मुले यांचेसाठी सुलभरित्या शौचालयाची उपलब्धता होवून स्वच्छतेच्या सवयी अंगी बाळगणे तसेच माती, हवा, पाणी पर्यायाने संपूर्ण पर्यावरण प्रदूषण मुक्त करुन समाज रोगराईमुक्त करणे. प्रतिष्ठित, आरोग्यदायी, कुचंबनारहित जीवनशैलीचा अंगीकार करणे, सांडपाणी, घनकचरा, मैला आदी बाबींचे सुयोग्य तथा पर्यावरणानुकुल व्यवस्थापन करणे हा योजनेचा उद्देश आहे.
जल जीवन मिशन योजनेचा उद्देश :
सर्व नागरिकांना दरडोई दर दिवशी सातत्याने 55 लिटरप्रमाणे वैयक्तिक नळाव्दारे शुध्द व गुणवत्तापुर्व पाणी पुरवठा करणे.