ई-गव्हर्नंस
उपक्रम | विभाग / तपशील | फायदे |
---|---|---|
मासिक पगार पत्रक : प्राथमिक शिक्षक | प्राथमिक शिक्षक : मासिक पगार पत्रक पगार पत्रक : आस्थापना विषयक बाबी |
१२००० प्राथमिक शिक्षकांचे मासिक पगार पत्रक करण्यासाठी ४० ते ५० कर्मचारी प्रत्येक तालुकानिहाय ७/८ ते आठ दिवस (साधारण ५०० शिक्षक) लागत असत. गेल्या १० वर्षापासून तेच काम फक्त दोन पुर्ण वेळ व ८ आठ अर्धवेळ कर्मचारी (दोन दिवस प्रती महिना) करता. याशिवाय मागणीनुसार ते आस्थापना विषयक व भ. नि. नि. विषयक कोणतीही माहिती त्वरीत देवू शकतात. |
जि. प. भ. नि. नि. | शिक्षकेत्तर कर्मचार्यांचा भ. नि. नि. | ही संगणक प्रणाली अवलंबण्याआधी अर्थ विभागातील ६/८ कर्मचारी भ. नि. नि. या विषयावर काम करीत होती. १९८९ पासून हे काम आता फक्त दोन पुर्ण वेळ कर्मचारी करतात. यामध्ये खाते नोंदवही अद्यावत ठेवणेपासून ते ब्रॉडशीट व स्लिपा तयार करणे तसेच भ. नि. नि. वरील व्याज आकारणी केली जाते. |
जि. प. हिशोब प्रणाली | हिशोब प्रणाली | दररोज १५/२० मिनिटे प्रमाणक व जमा पावती यांचे प्रणाली मध्ये भरणा केल्यावर अर्थ विभागांकडील फॉर्म नंबर १३ ते २१ नंबरचे अहवाल आपोआप तयार होतात. यासाठी पुर्वी ४/५ अर्थ विभागांकडील कर्मचारी व प्रत्येक पं. स. कडील १ कर्मचारी पुर्ण वेळ द्यावा लागत असे. आता फक्त १ कर्मचारी पुर्ण वेळ व पंचायत समितीकडील १ कर्मचारी महिन्यातून १ दिवस या कामासाठी लागतो. |
जि. प. निवृत्ती वेतन | जिल्ह्यातील ६००० सेवानिवृत्त कर्मचार्यांचे निवृत्ती वेतन संगणकीकृत | जिल्ह्यातील ६००० सेवानिवृत्त कर्मचार्यांचे निवृत्तीवेतन (११ पंचायत समितीसह) दरमहा तयार केले जाते. |
कामकाज सनियंत्रण | बांधकाम विभाग (सर्व पंचायत समितीसह) | जिल्हा परिषद व पंचायत समितींकडील सर्व कामे मंजूरीचे तारखेपासून ते सद्यस्थतीपर्यंत सर्व माहिती तपशीलवार उपलब्ध |
अंदाजपत्रक सनियंत्रण | अर्थ विभाग | सर्व अनुदान्रेखर्च यांचे संनियत्रण |
प्राथमिक शिक्षक नियुक्त्या | शिक्षण विभाग (प्राथमिक) | सर्व प्राथमिक शिक्षकांची नियुक्ती प्रणाली संगणकीकृत |
ग्रामसेवक नियुक्त्या | ग्रामपंचायत विभाग | सर्व ग्रामसेवकांची नियुक्ती प्रणाली संगणकीकृत |
रेकॉर्ड रुम | सर्व विभाग | अभिलेख कक्ष |
हिशोब संगणक प्रणाली | सर्व विभाग | प्राथमिक चाचणी कार्यरत |