आरोग्य विभाग
आरोग्य विभाग माहिती 2023 पाहण्यासाठी क्लिक करा
- राष्ट्रीय आरोग्य अभियान सातारा PIP २०१९-२०
- राष्ट्रीय आरोग्य अभियान सातारा PIP २०१९-२० माहे फेब्रुवारी २०२० अखेर मंजूर अनुदान व खर्च
- आरोग्य विभाग : Health dept.
- आरोग्य विभाग : The cigarettes and other tobacco products ACT 2003 (Prohibition of advertisement and regulation of trade and commerce, production, supply and distribution)
- आरोग्य विभाग : सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने (जाहिरात, प्रतिबंध, व व्यापार वाणिज्य, उत्पादन, पुरवठा, व वितरण याचे विनीमन) कायदा २००३
- प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र बांधकाम सद्यस्थिती माहिती (माहे मार्च २०१५ अखेर)
सार्वजनिक आरोग्य
आरोग्य म्हणजे केवळ व्याधी किवा विकलांगता याचा अभाव नव्हे, तर संपूर्ण शारीरिक, मानसिक आणि सामाजिक स्वास्थ्य म्हणजे आरोग्य अशी जागतिक आरोग्य संघटनेची आरोग्य विषयक संकल्पना आहे. ‘‘सर्वासाठी आरोग्य‘‘ हे उद्दिष्ट ठेवून ते साध्य करण्याची बांधीलकी राज्य शसनाने स्विकारली असून त्यासाठी गेल्या काही वर्षापासून प्रतिबंधक, प्रवर्तक, उपचारात्मक आणि पुनर्वसनात्मक आरोग्य सेवा जनतेला पुरविणेकरीता आरोग्य विषयक सुविधांचे जाळे उभारणेसाठी राज्य शासनाकडून प्रयत्न करणेत येत आहे. राज्याच्या कानाकोप-यामध्ये ग्रामीण जनतेला आरोग्य विषयक सुविध पोहचविणेसाठी ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे यांची स्थापना करणेत आली आहे. तसेच अलिकडे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गंत विविध कार्यक्रम, क्षयरोग नियंत्रण, कुष्ठरोग निर्मुलन, इ. कार्यक्रमांवर भर दिला जात आहे. पावसाळ्यामध्ये गॅस्ट्रो,, हिवताप व पाण्यामुळे होणाऱ्या इतर रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून विविध उपाययोजना राबविन्यात येत आहेत. सार्वजनिक आरोग्य सेवेमध्ये खालील आरोग्य कार्यक्रमाअंतर्गत सेवा पुरविण्यात येतात.
१) वाढत्या लोकसंख्येस आळा घालणेसाठी राष्ट्रीय कुटुंब कल्याण तथ लोकसंख्या नियंत्रण कार्यक्रम.
२) मातृत्वाच्या वाटेवर प्रकृतीशी झगडण-या माता, त्यांची बालके जन्मतःच गंभीर असतात. त्यासाठी राष्ट्रीय प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रम. त्याचप्रमाणे शालेय तसेच आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी कार्यक्रम.
३) डासांमुळे फैलावण-या वाढत्या रोगांवर नियंत्रणसाठी राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम.
४) शारीरिक विकलांगता आणणा-या रोगापासून मुक्तीसाठी राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रम.
५) मनुष्य प्रकृतीचा क्षय करणा-या रोगांवर नियंत्रणसाठी सुधारीत राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम.
६) मानवी जीवनातील अंधःकार दूर करणेसाठी राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम.
७) दूषित पाण्यामुळे तसेच इतर प्रकारे उद्भवण-या साथीच्या रोगांवर प्रतिबंध व उपाययोजना राबविणेसाठी एकात्मिक रोग सर्व्हेक्षण कार्यक्रम.
८) दूषित रक्ताव्दारे पसणा-या लैंगिक व एडस् सारख्या रोगांचा मुकाबला करणेसाठी राष्ट्रीय एडस् नियंत्रण कार्यक्रम.
९) याशिवाय इतर कार्यक्रमांतर्गंत आयोडीनयुक्त मीठाच्या कमतरतमुळे उद्भवणा-या गलगंडासारख्या रोगांवर नियंत्रणासाठी राष्ट्रीय आयोडीन न्यूनता विकार नियंत्रण कार्यक्रम. त्याचप्रमाणे एक सामाजिक व राष्ट्रीय गरज म्हणून जन्म मृत्यू व विवाह नोंदणी
जे काम ग्रामपंचायत पातळीवर केले जाते परंतू त्याचे नियंत्रण मात्र सार्वजनिक आरोग्य विभगामार्फत केले जाते.
वरील सर्व कार्यक्रमासाठी आवश्यक ते वैद्यकीय/निमवैद्यकीय कर्मचा-यांचे प्रशिक्षण व त्याबरोबरच आरोग्य विषयक सामाजिक हिताच्या गोष्टींना व्यापक स्वरुपात सर्व माध्यमांव्दारे प्रसिध्दी देवून जनजागरणचे महत्वाचे काम या विभागामार्फत केले जाते.
आरोग्य विषयक उपलब्ध सुविधा
ग्रामीण भागात दर ३०,००० लोकसंख्येत एक (डोंगरी भागात २०,००० लोकसंख्येमागे एक) प्राथमिक आरोग्य केंद्र आणि दर ५००० लोकसंख्येत एक आरोग्य उफद्र (डोंगरी भागात ३,००० लोकसंख्येमागे एक) या निकषाप्रमाणे जिल्हयात प्राथमिक आरोग्य केंद्रे व उफद्रे स्थापन करणेत आली आहेत. जिल्हयात १ सामान्य रुग्णालय, १७ ग्रामीण /कुटीर रुग्णा., ७१ प्राथमिक आरोग्य केंद्रे, ६ प्राथमिक आरोग्य पथके, ४०० उफद्रे व १७ जिल्हा परिषद आयुर्वेदीक दवाखाने कार्यरत आहेत. जिल्हयातील शासकीय आरोग्य संस्थांची आकडेवारी खालील तक्यामध्ये दर्शविली आहे.
जीवन विषयक आकडेवारी
जिल्हयाचा जन्मदर, मृत्यू दर व अर्भक मृत्यू दर काढणेसाठी मृत्यूच्या कारणांचे सर्व्हेक्षण ही योजना जिल्हयातील २० गावामध्ये सुरु आहे. प्रत्येक प्रा.आ.केंद्रांतील एक गाव या योजनेंतर्गंत निवडणेचे प्रस्तावित आहे. या योजनेतर्गंत दरमहा रहिवाशी जन्म-मृत्यू घटनांची नोंद केली जाते. मृत्यूच्या बाबतीत कारणांचा शोध घेतला जातो व त्या आधारे जिल्हयातील जीवन विषयक दर काढले जातात.
मृत्यूच्या कारणांचे सर्वेक्षण (ग्रामीण) योजनेवरुन जिल्हयाचे जीवन विषयक दर खालीलप्रमाणे -
जिल्हयातील सर्व महसुली गावामध्ये घडलेल्या जीवन विषयक घटनांची नोंद करणेसाठी महसुली गाव स्तरावर निबंधक म्हणून ग्रामसेवक अथवा ग्राम विकास अधिकारी काम पहातात.
जनगणना २००१ व २०११
सन २०११ च्या जनगणनेनुसार सातारा जिल्हयाची लोकसंख्या ही ३०.०३ लक्ष आहे. २००१ ते २०११ या कालखंडात ६.९४ टक्के एवढी लोकसंख्या वाढ झालेली आहे. सन २०११ च्या जनगणनेनुसार जिल्हयातील साक्षरतेचे प्रमाण ८४.२० टक्के असून ९२.०९ टक्के पुरुष व ७६.२९ टक्के स्त्रीया साक्षर आहेत. लोकसंख्येची घनता दर चौ.कि.मी.मध्ये २८७ आहे.
भारत, महाराष्ट्र व सातारा जिल्ह्याचे १९०१ पासून सर्वसाधारण तुलनात्मक लिंग प्रमाण -
(दर हजार पुरुषांमागे स्त्रीयांचे प्रमाण)
सातारा जिल्ह्यातील तालुकानिहाय सन २००७-०८ ते २०१४-१५ (मार्च २०१५ अखेर) पर्यंतची ० ते ६ वर्षे वयोगटातील लिंग प्रमाण -
(दर हजार पुरुषांमागे स्त्रीयांचे प्रमाण)
राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रम
राज्य लोकसंख्या धोरणाअंतर्गत उद्दिष्टे साध्य करणेसाठी सातारा जिल्ह्यात वाढत्या लोकसंख्येवरील नियंत्रणासाठी राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रम राबविण्यात येतो. या कार्यक्रमांतर्गत कुटुंब कल्याण नसबंदी शस्त्रक्रिया, तांबी, निरोध व गर्भनिरोधक गोळ्या वाटप या दर्शकांवर विशेष भर देणेत येतो. जिल्ह्यातील ७१ पैकी ५५ प्राथमिक आरोग्य केंद्रे, ४ प्रा.आ.पथके, १ सामान्य रुग्णालय, २ उपजिल्हा रुग्णालये व १० ग्रामीण रुग्णालये आणि १६५ खाजगी रुग्णालयामध्ये कुटुंब कल्याण नसबंदी शस्त्रक्रिया सुविधा उपलब्ध आहे.याशिवाय जिल्ह्यात दरमहा ५ बिनटाका पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया शिबीरे व ५० स्त्री बिनटाका नसबंदी शिबीरे आयोजित करण्यात येतात.
सातारा जिल्हयातील झालेल्या शस्त्रक्रियांचे या गुणवत्तापुर्वक कामामुळे जिल्हयाचा लोकसंख्यावाढीचा दर १४.६ पर्यंत खाली आला आहे. त्यामुळे लोकसंख्यावाढ नियंत्रण, जननदर १.८ व जन्मदर १५ पर्यंत कमी करणे हे उद्दिष्ट साध्य होणार आहे. लोकसंख्या नियंत्रणासाठी शासनामार्फत ९ मे २००० पासून धोरणांची अंमलबजावणी चालु असून प्रामुख्याने लोकसंख्या वाढीस कारणीभुत विविध सामाजिक घटक त्यामध्ये मुलींचे कमी वयात लग्न, मुलगाच हवा हा समाजात दृढ असलेला हव्यास यासाठी जनजागृतीचे उपक्रम राबविण्यात येत आहेत.
पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया
राष्ट्रीय कार्यक्रमांत पुरुषांचा सहभाग वाढविणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्हयात गतवर्षी पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया शिबीरांचे आयोजन करुन जास्तीत जास्त पुरुष नसबंदी करणेत येतात.
सुधारित सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजना
या योजनेअंतर्गत निव्वळ एक मुलगी अथवा दोन मुलींवर कुटूंब कल्याण शस्त्रक्रिया करुन घेतलेल्या दारिद्रय रेषेखालील जोडप्यातील मुलींच्या नावे एका मुलीवर शस्त्रक्रिया केल्यानंतर लाभार्थींस रोख (धनादेशाव्दारे) रु.२०००/- व मुलीच्या नावे रु.८०००/- चे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र व दोन मुलीवर शस्त्रक्रिया केल्यानंतर लाभार्थींस रोख (धनादेशाव्दारे) रु.२०००/-व दोन मुलीच्या नावे प्रत्येकी रु.४०००/- चे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र तसेच सदर मुलींचे लग्न वयाच्या २० वर्षानंतर झाल्यानंतर देय राहते.
सुधारीत सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजनेअंतर्गंत लाभ दिलेले लाभार्थी -
प्रजनन व बालआरोग्य कार्यक्रम
बालमृत्यु व मातामृत्यु तसेच माता व बालकांचे आजाराचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने माता व बालकांना सर्व समावेशक सेवा देण्यासाठी प्रजनन व बाल आरेाग्य कार्यक्रमाची आखणी केली आहे.
पल्स पोलिओ कार्यक्रम
देशातून पोलिओचे निर्मुलन करणेसाठी दर वर्षी पल्स पोलिओ मोहिमेत ० ते ५ वयोगटातील बालकांना पोलिओचे दोन अतिरीक्त डोस दिले जातात. सन २०१३-१४ मध्ये दिनांक १९ जानेवारी २०१४ रोजी जिल्हयातील २,५९,७९२ व दिनांक २३ फेब्रुवारी २०१४ रोजी २,६३,४१७ एवढया ५ वर्षाखालील बालकांना डोस दिले. त्याचबरेाबर संशयीत पोलिओ रुग्ण सर्व्हेक्षण मोहिम (एएफपी) दरवर्षी यशस्वीपणे राबविलेने सातारा जिल्हयात १९९८ पासून आज अखेर एकही पोलिओ रुग्ण सापडलेला नाही.
सन २०१४-१५ मध्ये दिनांक १८ जानेवारी २०१५ रोजी जिल्हयातील २,६५,१५६ व दिनांक २२ फेब्रुवारी २०१५ रोजी २,६२,२२६ एवढया ५ वर्षाखालील बालकांना डोस दिले.
लसीद्वारे टाळता येणारे साथउद्रेक
(गोवर, घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, पोलिओ)
राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम
सातारा जिल्हयात हिवतापाचा प्राद्रुर्भाव होऊ नये म्हणून स्थलांतरीत होणा-या लोकसंख्येतील (ऊसतोड प्रकल्प कामे, उत्सव यात्रा) ताप रुग्णांचा शोध घेऊन त्यांना गृहीतोपचार देणे, त्यांच्यातील हिवताप रुग्ण शोधणे व त्यास समुळ उपचार देणे तसेच डासांच्या नियंत्रणासाठी विविध पातळीवर प्रयत्न केले. जीवशास्त्रीय उपाय योजनेअंतर्गत जिल्हयात ५१८ गप्पी मासे पैदास केंद्रे, ९५७ डासोत्पत्ती स्थाने कायम कार्यरत असून जिल्हयातील सर्व डासोत्पत्ती स्थानांमध्ये प्रा.आ.केंद्रामार्फत गप्पी मासे सोडण्याची कार्यवाही करणेत आली. किटकजन्य रोगाच्या प्रतिबंधासाठी नियमितपणे किटक शास्त्रीय सर्व्हेक्षण करण्यात आले. जिल्हयात मार्च २०१५ मध्ये हिवतापासाठी ४७६०६ रक्त नमुने गोळा करण्यात आले त्यातील तपासणीमध्ये ०९ हिवताप रुग्ण आढळुन आले. सर्व रुग्णांना समुळ उपचार देणेत आला. डेंग्युच्या प्रतिबंधासाठी निदानाची सुविधा जिल्हा व तालुकास्तरावर उपलब्ध असून डेंग्यु प्रतिबंधासाठी किटकशास्त्रीय सर्व्हेक्षण, कंटेनर सर्व्हे नियमित करणेत येतो.
किटकाद्वारे होणारे साथ उद्रेक - (हिवताप, डेंग्यू, चिकूनगुन्या)
हवेद्वारे होणारे साथउद्रेक - (विषाणूजन्य ताप)
एकात्मिक रोग सर्व्हेक्षण कार्यक्रम
सातारा जिल्हा सन २००४ पासुन एकात्मिक साथरोग सर्व्हेक्षण कार्यक्रम सुरु असून दुषित पाण्यापासुन होणारे प्राणघातक आजार कॉलरा, गॅस्ट्रो, काविळ, अतिसार, पोलिओ, विषमज्वर इ.टाळण्यासाठी ग्रामपंचायतीव्दारे दैनंदिन पिण्याचे पाणी शुध्दीकरण केले जाते व आरोग्य विभागामार्फत ओटी टेस्ट घेऊन संनियंत्रण केले जाते. तसेच पाणी उदभवाचे पहाणी करुन दर ३ महिन्यातून एकदा पाणी नमुने तपासणीसाठी प्रयेागशाळेकडे पाठविले जातात. प्रयोग शाळेकडील पाणी तपासणीचा अहवाल पिण्यास अयोग्य असलेल्या पाणी नमुनेच्या बाबतीत संबधीत ग्रामपंचायतींना गटविकास अधिकारी यांचेमार्फत पाणी शुध्दीकरणाबाबत सुचित केले जाते.
उद्दिष्टये - साथरोग सर्व्हेक्षण बळकटीकरणासाठी उद्रेक माहिती त्वरीत संकलीत करुन साथ नियंत्रणांसाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना ग्रामीण पातळीवर उपलब्ध करुन देणे, प्रयोगशाळा बळकटीकरणातून प्रयोगशाळेत आवश्यक सुविधा, रोग तपासणी, रोगास कारणीभूत ठरणारे अन्न व पाणी यांची वेळोवळी तपासणी करणे, काही निश्चित रोगांसाठी स्वच्छता व्यवस्थापन करणे, शहरी साथरोग सर्व्हेक्षणांचे बळकटीकरण करणे, साथरोग सर्व्हेक्षण कार्यक्रमांत खाजगी वैद्यकीय व्यवसायिक, वैद्यकीय महाविद्यालय, स्वयंसेवी संस्था व लोकसमुदायाचा समावेश करुन घेण्याचा प्रयत्न करणे, तालुका / जिल्हा पातळीवर माहितीचे त्वरीत वहन होणेसाठी इलेक्ट्रानिक प्रसार माध्यमांचा वापर करणे, व्यवस्थापन व माहिती पध्दतीव्दारे (MIS) महत्वाची संख्यात्मक माहिती प्राप्त करण्यात सुधारणा करणे, इतर खात्यामध्ये तसेच आरोग्य खात्यांतर्गंत असलेल्या समन्वयात सुधारणा करणे.
पाण्याव्दारे होणारे साथउद्रेक - (काविळ, अतिसार, हगवण, गॅस्ट्रो, कॉलरा, टायफाईड)
सन २०१४ (डिसेंबर १४ अखेर) मध्ये ३७७६३ पाणी नमुने तपासणीसाठी घेणेत आले त्यापैकी २३८५ (६.३ऽ) पाणी नमुने दुषित आढळुन आले. तसेच ग्रामपंचायतीकडील एकुण ५६१४ टीसीएलचे नमुने तपासले असून ८६ (१.५३ऽ) नमुने अप्रमाणीत आढळुन आलेले आहेत.
सन २०१५ (माहे मार्च २०१५ अखेर) मध्ये ९४०६ पाणी नमुने तपासणीसाठी घेणेत आले त्यापैकी ५१२ (५.४ऽ) पाणी नमुने दुषित आढळुन आले. तसेच ग्रामपंचायतीकडील एकुण १४१६ टीसीएलचे नमुने तपासले असून २३ (१.६२ऽ) नमुने अप्रमाणीत आढळुन आलेले आहेत.
तालुकानिहाय लाल/पिवळे/हिरवे कार्ड वाटप माहिती (माहे मार्च २०१५ अखेर)
जिल्हयातील संवर्गनिहाय मंजूर, भरलेल्या व रिक्त पदांची माहिती - मार्च २०१५ अखेर
आरोग्य विभाग, जि.प.सातारामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजना
योजना | योजनेचा थोडक्यात तपशिल | योजनेचा लाभ घेणेसाठी संपर्क |
---|---|---|
राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रम | राज्य लोकसंख्या धोरणाअंतर्गत उद्दिष्टे साध्य करणेसाठी सातारा जिल्ह्यात वाढत्या लोकसंख्येवरील नियंत्रणासाठी राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रम राबविण्यात येतो. या कार्यक्रमांतर्गत कुटुंब कल्याण नसबंदी शस्त्रक्रिया (स्त्री/पुरुष नसबंदी, टाका/बिनटाका शस्त्रक्रिया), तांबी, निरोध व गर्भनिरोधक गोळ्या वाटप या दर्शकांवर विशेष भर देणेत येतो. | वैद्यकीय अधिकारी, प्राआकेंद्रे सर्व |
नियमीत लसीकरण कार्यक्रम | नियमित लसीकरण कार्यक्रमांतर्गंत बाळ जन्मलेपासून लसीव्दारे टाळता येणा-या आजारांचे (उदा. क्षयरोग, डीपीटी, पोलिओ, टीटी, गोवर, इ.) मोफत लसीकरण केले जाते. | वैद्यकीय अधिकारी, प्राआकेंद्रे सर्व |
सुधारित सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजना | समाजातील मुलींचे घटते प्रमाण पाहता मुलींच्या जन्माचे स्वागत करुन स्त्रीयांचा सामाजिक दर्जा उंचावण्यासाठी तसेच मुलींचे प्रमाण वाढविण्यास प्रोत्साहन देण्यासाठी सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजना राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत निव्वळ एक मुलगी अथवा दोन मुलींवर कुटूंब कल्याण शस्त्रक्रिया करुन घेतलेल्या दारिद्रय रेषेखालील जोडप्यातील मुलींच्या नावे एका मुलीवर शस्त्रक्रिया केल्यानंतर लाभार्थींस रोख (धनादेशाव्दारे) रु.२०००/-व मुलीच्या नावे रु.८०००/- चे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र व दोन मुलीवर शस्त्रक्रिया केल्यानंतर लाभार्थींस रोख (धनादेशाव्दारे) रु.२०००/- व दोन मुलीच्या नावे प्रत्येकी रु.४०००/- चे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र तसेच सदर मुलींचे लग्न वयाच्या २० वर्षानंतर झाल्यानंतर देय राहते. | वैद्यकीय अधिकारी, प्राआकेंद्रे सर्व |
जिल्हा परिषद स्वनिधीमधून कॅन्सर, किडनी, ह्दयरोग, अशा दुर्धर रोगाने पिडीत असलेल्या रुग्णांना आर्थिक मदत देणेबाबत | जिल्हा परिषदंनी त्यांच्या कार्यक्षेत्रामधील रहिवाश्यांचे आरोग्य सुरक्षितता, शिक्षण इत्यादी किवा त्यांच्या सामाजिक आर्थिक किवा सांस्कृतिक संवर्धन करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ च्या कलम १०० (३) मधील तरतुदीच्या अनुषंगाने जिल्हा परिषदांनी त्यांच्या स्वतःच्या उत्पन्नातून जिल्हयातील ग्रामीण भागातील सर्वांसाठी कॅन्सर, ह्दयरोग व किडनी निकामी होणे या दुर्धर रोगाने पिडीत असलेल्या रुग्णांना आर्थिक मदत रु.१००००/- पर्यंत देण्यात येते | जिल्हा आरोग्य अधिकारी |
जननी सुरक्षा योजना | जिल्हयातील दारिद्रय रेषेखालील स्त्रियांना पहिल्या २ बाळंतपणासाठी सदर योजनेतून अनुदान दिले जाते. सदर स्त्रिला प्रसुतीनंतर दवाखान्यात प्रसती झाल्यास ७ दिवसात रक्कम रु.७००/- व घरी प्रसुती झाल्यास रक्कम रु.५००/- अनुदान वितरीत करणेबाबत शासनाच्या मार्गदर्शन सूचनाप्रमाणे आरोग्य सहाय्यक (म) ना सूचित करण्यात आले आहे. गरोदरपणातील जोखमीमुळे सिजेरियन शस्त्रक्रिया झाल्यास लाभार्थींस रु.१५००/- एवढे सहाय्यक अनुदान ती स्त्री ज्या दवाखान्यात प्रसूत झाली असेल त्या बिलाच्या पूर्ततेसाठी अनुदान वितरीत करण्यात येते. वरील सर्व सेवा लाभार्थीना मिळणेसाठी प्रत्येक उफद्रांचे आरोग्य सेविकेकडे रु.१५००/- अग्रिम ठेवण्यात आले आहे. जननी सुरक्षा योजनेंसाठी लाभार्थ्यांना देय असलेले अनुदान बाळंतपणाच्या वेळी किवा बाळंतपणानंतर जास्तीत जास्त ७ दिवसांच्या आत अदा करावे अशा सूचना आहेत. | वैद्यकीय अधिकारी, प्राआकेंद्रे सर्व |
उपकेंद्र बळकटीकरण | राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान योजनेतंर्गंत उपकेंद बळकटीकरणासाठी इमारत असलेल्या उपकेंद्रांला दरवर्षी रु.१०,०००/- निधी देणेत येतो. त्याअतंर्गंत आरोग्य सेविका व सरपंच यांचे नावे संयुक्त खाते उघडण्यात येते. त्यामधून उपकेंद्र कार्यक्षेत्रातील अति जोखमीच्या मातांना संदर्भ सेवा देण्याचा खर्च, स्थानिक आरोग्य सेवा सुधारण्यासाठी अत्यावश्यक बाबी, उपकेंद्र किरकोळ दुरुस्ती, औषधे, इ. साठी या अनुदानातून खर्च करणेत यावा. | वैद्यकीय अधिकारी, प्राआकेंद्रे सर्व |
ग्राम आरोग्य पोषण, पाणी पुरवठा व स्वच्छता समिती | राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानमधून प्रत्येक गावामध्ये लोकसंख्येच्या आधारे सदर कार्यक्रमांसाठी निधी उपलब्ध करुन देणेत येतो. त्याअंतर्गंत अंगणवाडी सेविका व सरपंच यांचे नावे संयुक्त बँक खाते उघडण्यात येते. या अनुदानामधून गावातील साफ सफाई मोहिम, शालेय आरोग्य कार्यक्रम, गृह भेटी सर्व्हेक्षण, गरीब घरातील असलेल्या स्त्रीच्या आरोग्य विषयक सेवांसाठी संदर्भ सेवांसाठी या अबंधीत रक्कमांचा वापर करणेबाबत येतो. | वैद्यकीय अधिकारी, प्राआकेंद्रे सर्व |
रुग्ण कल्याण समिती (प्राआकेंद्र) | सर्व प्राआकेंद्रांमध्ये रुग्ण कल्याण समितीची स्थापना करण्यात येते. रुग्ण कल्याण समितीचे अध्यक्ष त्या कार्यक्षेत्रातील विद्यमान जिल्हा परिषद सदस्य हे आहेत. रुग्णालयातील अत्यावश्यक सेवा साहित्य सामुग्री, विशेष तज्ञांच्या सेवा, देखभाल दुरुस्ती, इ. बाबींवर अनुदान खर्च करणेत येते. प्रति वर्ष प्रति प्राआकेंद्रांस रु.१.०० लक्ष अनुदान उपलब्ध करुन देणेत येते | वैद्यकीय अधिकारी, प्राआकेंद्रे / ताआअ सर्व |
आशा (ASHA - Acriditated Social Health Activist) | लोकसहभाग व आरोग्य विभाग समन्वय साधण्यासाठी आशाची नियुक्ती करणेत येते. त्यानुसार आशांची निवड करणेत येते. गावपातळीवर आरोग्य सेवा नियोजन, सुसंवाद, समुपदेश, प्रथमोपचार, औषधे साठा ठेवणे, रेकॉर्ड व नोंदी ठेवणे, इ.कामकाज आशा करतात | वैद्यकीय अधिकारी, प्राआकेंद्रे / ताआअ सर्व |
जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम (JSSK) |
मातामृत्यू व अर्भक मृत्यूदर कमी करणे हे आरसीएच कार्यक्रमाचे महत्वाचे उद्दिष्ट आहे. यासाठी प्रसुतीपूर्व, प्रसुती दरम्यान व प्रसुती पश्चात मोफत सेवा देणे, तसेच नवजात अर्भकाला जन्मानंतर ३० दिवसापर्यंत आवश्यक त्या सर्व सेवा मोफत पुरविण्यात आल्यास निश्चितपणे माता मृत्यूदर व अर्भक मृत्यूदर कमी करण्यास मदत होईल. राज्यामध्ये आरोग्य संस्थांमध्ये प्रसुतीचे प्रमाण ९१ ऽ आहे. तथापी या संस्थेतील प्रसुतीपैकी ६० ऽ ते ७० ऽ प्रसुती खाजगी रुग्णालयांमध्ये होतात. तसेच शासकीय संस्थांमधील प्रसुती होणा-या मातांना औषधी, विविध तपासण्या, प्रसंगी सिझेरियन इत्यादीसाठी लागणारी साहित्य बाहेरुन खरेदी करण्यासाठी तसेच मातेला संदर्भीत केल्यानंतर आवश्यक त्या वाहनांची सोय करणे यासाठी संबंधीत मातेला किवा तिच्या कुटुंबीयांना खर्च करावा लागतो. पैशा अभावी यामध्ये होणा-या विलंबामुळे प्रसंगी माता मृत्यू अथवा अर्भक मृत्यृ होण्याची शक्यता असते. यासाठी केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या सूचनांनुसार राज्यामध्ये उपरोक्त शासन निर्णयान्वये जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमांतर्गंत माता व नवजात अर्भकांना सार्वजनिक आरोग्य संस्थांमध्ये संपूर्ण मोफत सेवा पुरविण्यात येणार आहेत. यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दारिद्रय रेषेवरील तसेच प्रसुतीसाठीच्या कोणत्याही खेपेच्या गरोदर स्त्रीस व ३० दिवसांच्या आत नवजात अर्भकास सर्व प्रकारच्या आरोग्य विषयी सेवा सर्व शासकीय आरोग्य संस्थांमध्ये मोफत देण्यात याव्यात. या कार्याक्रमाच्या अंमलबजावणीसाठी पुढीलप्रमाणे सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्याअनुषंगाने सामान्य रुग्णालय, सातारा येथे जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमांतर्गंत कॉल सेंटर सुरु करणेत आले असून त्याठिकाणी १०२ क्रमांक दूरध्वनी क्रमांकावर दूरध्वनी केल्यास माता व बालकांस खालीलप्रमाणे सेवा मिळतात.
अ) गरोदर मातेला मोफत देण्याच्या आरोग्य विषयी सेवा
ब) नवजात अर्भकास ३० दिवसापर्यंत मोफत देण्याच्या आरोग्य विषयी सेवा |
वैद्यकीय अधिकारी, प्राआकेंद्रे सर्व |
सन २०१४-१५ मध्ये राबविण्यात आलेले नाविन्यपूर्ण उपक्रम / योजना
- हिमोग्लोबीन तपासणी
- सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजना - दारिद्रय रेषेवरील लाभार्थींसाठी
- महिला आरोग्य अभियान
- बाल आरोग्य अभियान
- कमी वजन व कमी दिवस असलेल्या अर्भक मृत्यू अन्वेषण समिती
- अपंग व्यक्तींची तपासणी करुन अपंग प्रमाणपत्र देणे
- कायापालट प्राथमिक आरोग्य केंद्रे - २९
- टोकन प्रणाली - १६
- माता व बालक संगोपन समुदेशन केंद्र
- निरोध कॉर्नर
- १० - १९ वर्ष वयोगटातील मुलींची हिमोग्लोबीन तपासणी मोहिम
- गुगल अर्थ वर आरोग्य संस्थांची माहिती
- सांसद आदर्श ग्राम अंतर्गंत आरोग्य तपासणी कार्ड
- प्राथमिक आरोग्य केंद्र रँकींग नुसार कलर कोडींग