हिंदू हदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना / नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र
15 व्या वित्त आयोगातंर्गंत सातारा जिल्हयाकरीता हिंदू हदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना 10 व नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र 35 मंजूर करणेत आलेली आहेत. जेणेकरुन मागास/दुर्लक्षित/झोपडपट्टी भागातील जनतेस त्यांच्या कामकाजानंतर आरोग्य सेवा मिळणेस मदत होणार आहे. सदर आपला दवाखाना/नागरी आरोग्यवर्धिनी केंद्रांच्या कामकाजाची वेळ सकाळी 9 ते दुपारी 12.00 व सायं.5.00 ते रात्री 8.00 वाजेपर्यंत निश्चित करणेत आली आहे. जेणेकरुन Slum भागातील जनतेस त्यांच्या कामकाजानंतर आरोग्य सेवा मिळणेस मदत होणार आहे. सदर दवाखान्यामध्ये प्रामुख्याने बाहयरुग्ण सेवा, मोफत औषधोपचार, मोफत चाचण्या, गर्भवती मातांची तपासणी, टेलिकन्सलटेशन, मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन, इ. सेवा पुरविण्यात येणार आहेत.
लाभार्थी:
सर्व लाभार्थी
फायदे:
Slum भागातील जनतेस बाहयरुग्ण सेवा, मोफत औषधोपचार, मोफत चाचण्या, गर्भवती मातांची तपासणी, टेलिकन्सलटेशन, मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन, इ. सेवा पुरविण्यात येणार आहेत.
अर्ज कसा करावा
संबंधीत आरोग्य केंद्रांत