बंद

    प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान

    • तारीख : 31/07/2016 -

    प्रत्येक महिन्याच्या 9 तारखेला प्रधानमंत्री मातृत्व सुरक्षा अभियान अंतर्गंत गरोदर स्त्रियांची शासकीय संस्थेमध्ये खाजगी स्त्रीरोग तज्ञांमार्फत तपासणी करुन उपचार करण्यात येतात, जेणेकरुन जिल्हयातील माता मृत्यू चे प्रमाण कमी करणे व  माता व बालक सुदृढ व निरोगी राहतील हा यामागचा मुख्य हेतू आहे. त्यासाठी जिल्हयातील 50 च्या वर खाजगी स्त्रीरोग व्यवसायिक या योजनेमध्ये सहभागी आहेत.

    लाभार्थी:

    15 ते 45 वर्षे वयोगटातील पात्र लाभार्थी

    फायदे:

    खाजगी वैद्यकीय तज्ञांमार्फत गरोदर मातांची व स्तनदा मातांची तपासणी व उपचार.

    अर्ज कसा करावा

    नजिकच्या प्राआकेंद्राच्या ठिकाणी वै.अ. व आरोग्य कर्मचारी यांचेकडे