जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम (JSSK)
मातामृत्यू व अर्भक मृत्यूदर कमी करणे हे आरसीएच कार्यक्रमाचे महत्वाचे उद्दिष्ट आहे. यासाठी प्रसुतीपूर्व, प्रसुती दरम्यान व प्रसुती पश्चात मोफत सेवा देणे, तसेच नवजात अर्भकाला जन्मानंतर 30 दिवसापर्यंत आवश्यक त्या सर्व सेवा मोफत पुरविण्यात आल्यास निश्चितपणे माता मृत्यूदर व अर्भक मृत्यूदर कमी करण्यास मदत होईल. राज्यामध्ये आरोग्य संस्थांमध्ये प्रसुतीचे प्रमाण 91 % आहे. तथापी या संस्थेतील प्रसुतीपैकी 60 % ते 70 % प्रसुती खाजगी रुग्णालयांमध्ये होतात. तसेच शासकीय संस्थांमधील प्रसुती होणा-या मातांना औषधी, विविध तपासण्या, प्रसंगी सिझेरियन इत्यादीसाठी लागणारी साहित्य बाहेरुन खरेदी करण्यासाठी तसेच मातेला संदर्भीत केल्यानंतर आवश्यक त्या वाहनांची सोय करणे यासाठी संबंधीत मातेला किंवा तिच्या कुटुंबीयांना खर्च करावा लागतो. पैशा अभावी यामध्ये होणा-या विलंबामुळे प्रसंगी माता मृत्यू अथवा अर्भक मृत्यृ होण्याची शक्यता असते. यासाठी केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या सूचनांनुसार राज्यामध्ये उपरोक्त शासन निर्णयान्वये जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमांतर्गंत माता व नवजात अर्भकांना सार्वजनिक आरोग्य संस्थांमध्ये संपूर्ण मोफत सेवा पुरविण्यात येणार आहेत. यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दारिद्रय रेषेवरील तसेच प्रसुतीसाठीच्या कोणत्याही खेपेच्या गरोदर स्त्रीस व 30 दिवसांच्या आत नवजात अर्भकास सर्व प्रकारच्या आरोग्य विषयी सेवा सर्व शासकीय आरोग्य संस्थांमध्ये मोफत देण्यात याव्यात. या कार्याक्रमाच्या अंमलबजावणीसाठी पुढीलप्रमाणे सूचना देण्यात आलेल्या आहेत.
लाभार्थी:
15 ते 45 वर्षे वयोगटातील पात्र लाभार्थी
फायदे:
सर्व गरोदर माता व एक वर्षातील बालके यांची तपासणी, औषधोपचार व संदर्भसेवा
अर्ज कसा करावा
नजिकच्या प्राआकेंद्राच्या ठिकाणी वै.अ. व आरोग्य कर्मचारी यांचेकडे