जननी सुरक्षा योजना
जिल्हयातील दारिद्रय रेषेखालील स्त्रियांना पहिल्या 2 बाळंतपणासाठी सदर योजनेतून अनुदान दिले जाते. सदर स्त्रिला प्रसुतीनंतर दवाखान्यात प्रसुती झाल्यास 7 दिवसात रक्कम रु.700/- व घरी प्रसुती झाल्यास रक्कम रु.500/- अनुदान वितरीत करणेबाबत शासनाच्या मार्गदर्शन सूचनाप्रमाणे आरोग्य सहाय्यक (म) यांना सूचित करण्यात आले आहे. गरोदरपणातील जोखमीमुळे सिजेरियन शस्त्रक्रिया झाल्यास लाभार्थींस रु.1500/- एवढे सहाय्यक अनुदान ती स्त्री ज्या दवाखान्यात प्रसूत झाली असेल त्या बिलाच्या पूर्ततेसाठी अनुदान वितरीत करण्यात येते. वरील सर्व सेवा लाभार्थीना मिळणेसाठी प्रत्येक उपकेंद्रांचे आरोग्य सेविकेकडे रु.1500/- अग्रिम ठेवण्यात आले आहे. जननी सुरक्षा योजनेंसाठी लाभार्थ्यांना देय असलेले अनुदान बाळंतपणाच्या वेळी किंवा बाळंतपणानंतर जास्तीत जास्त 7 दिवसांच्या आत अदा करावे अशा सूचना आहेत.
लाभार्थी:
15 ते 45 वर्षे वयोगटातील पात्र लाभार्थी
फायदे:
गरोदरपणातील जोखमीमुळे सिजेरियन शस्त्रक्रिया झाल्यास लाभार्थींस रु.1500/- एवढे सहाय्यक अनुदान ती स्त्री ज्या दवाखान्यात प्रसूत झाली असेल त्या बिलाच्या पूर्ततेसाठी अनुदान वितरीत करण्यात येते.
अर्ज कसा करावा
ज्या ठिकाणी नाव नोंदणी झालेली आहे अशा प्राआकेंद्राच्या ठिकाणी वै.अ. व आरोग्य कर्मचारी यांचेकडे