राष्ट्रीय बायोगॅस व खत व्यवस्थापन कार्यक्रम
सदरची योजना केंद्र शासनाच्या अनुदानामधून सन 1982 पासून राबविली जात आहे. केंद्र शासनाच्या नविन व नवीकरणीय ऊर्जा विभागाचे मंत्रालयाचे दिनांक 2 नोव्हेंबर 2022 चे प्रशासकीय मंजूरी नुसार सन 2021-22 ते 2025-26 या कालावधीसाठी सुधारीत अनुदान दराप्रमाणे राबविण्यात येत आहे.
योजनेचा उद्देश
स्वयंपाकासाठी बायोगॅस पुरविणे.
- एल.पी.जी. व इतर पारंपारिक उर्जा साधनांचा वापर कमी करणे.
- एकात्मिक उर्जा धोरणात नमूद केल्यानूसार स्वयंपाकासाठी आवश्यक उर्जा मिळविणे.
- रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रीय खतांचा वापर करण्यास लाभार्थींना प्रवृत्त करणे.
- ग्रामीण भागातील स्त्रियांचे जीवनमान सुधारणे व त्यांना होणारा त्रास कमी करणे.
- बायोगॅस सयंत्रास शौचालय जोडून ग्रामीण भागातील स्वच्छता राखण्यास मदत करणे.
अटी व शर्ती
- लाभार्थींकडे पुरेशा प्रमाणात जनावरे उपलब्ध असणे आवश्यक आहे.
- बायोगॅस सयंत्र उभारणीसाठी लाभार्थीकडे स्वत:च्या मालकीची जागा असणे आवश्यक आहे.
- शेतमजूर असल्यास ग्रामसेवकाचा दाखला घेणे बंधनकारक राहिल.
- शासनाने मान्यता दिलेल्या मॉडेलच्या सयंत्राची उभारणी करणे बंधनकारक आहे.
लाभार्थीची वर्गवारी | 1 घ.मी. क्षमतेच्या बायोगॅस संयंत्रासाठी प्रती संच रक्कम रुपये | 2 ते 4 घ.मी. क्षमतेच्या बायोगॅस संयंत्रासाठी प्रती संच रक्कम रुपये | 6 घ.मी. क्षमतेच्या बायोगॅस संयंत्रासाठी प्रती संच रक्कम रुपये | 8 ते 10 घ.मी. क्षमतेच्या बायोगॅस संयंत्रासाठी प्रती संच रक्कम रुपये | 15 घ.मी. क्षमतेच्या बायोगॅस संयंत्रासाठी प्रती संच रक्कम रुपये | 20 ते 25 घ.मी. क्षमतेच्या बायोगॅस संयंत्रासाठी प्रती संच रक्कम रुपये |
---|---|---|---|---|---|---|
अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती वर्गवारीतील लाभार्थीसाठी प्रती संयंत्र अनुदान | 17,000/- | 22,000/- | 29,250/- | 34,500/- | 63,250/- | 70,400/- |
सर्वसाधारण वर्गवारीतील लाभार्थीसाठी प्रती संयंत्र अनुदान | 9,800/- | 14,350/- | 22,750/- | 23,000/- | 37,950/- | 52,800/- |
बायोगॅस संयंत्रास शौचालय जोडणीसाठी | 1,600/- | 1,600/- | 1,600/- | 1,600/- | 00 | 00 |
लाभधारकाने सादर करावयाची कागदपत्रे
- शेत जमिनीचा खाते उतारा
- शेतमजुर असल्यास त्याबाबत ग्रामसेवकाचा दाखला
- बायोगॅस सयंत्र पुर्णत्वाचा दाखला
- यापुर्वी बायोगॅस सयंत्रासाठी लाभार्थीचे स्वत:चे नांवे अथवा घरातील इतर कोणत्याही व्यक्तीच्या नांवे शासकीय अनुदान घेतले नसल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र.
- सयंत्र कार्यान्वित ठेवणेसाठी आवश्यक प्रमाणात दैनंदीन शेण-पाण्याचा वापर करणेचे लाभार्थीचे प्रतिज्ञापत्र
- पंचायत समितीकडील अनुदान मिळणेबाबतचा विहित नमुन्यातील प्रस्ताव
- सयंत्र कार्यान्वित झाले नंतर सयंत्रासहीत लाभधारकाचा फोटोग्राफ.
संपर्क
योजने अंतर्गत बायोगॅस सयंत्र उभारणी करण्यास इच्छूक लाभार्थींनी ग्रामसेवक अथवा आपले तालुक्याच्या पंचायत समिती कार्यालयाचे गट विकास अधिकारी/सहायक गट विकास अधिकारी अथवा कृषि अधिकारी/विस्तार अधिकारी (कृषि ) यांचेशी संपर्क साधावा.
लाभार्थी:
ग्रामीण भागातील शेतकरी
फायदे:
वरील प्रमाणे
अर्ज कसा करावा
योजने अंतर्गत बायोगॅस सयंत्र उभारणी करण्यास इच्छूक लाभार्थींनी ग्रामसेवक अथवा आपले तालुक्याच्या पंचायत समिती कार्यालयाचे गट विकास अधिकारी/सहायक गट विकास अधिकारी अथवा कृषि अधिकारी/विस्तार अधिकारी (कृषि ) यांचेशी संपर्क साधावा.