बंद

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना सन 2024-25

    • तारीख : 01/04/2024 -
    योजने अंतर्गत मंजूर घटक व त्यासाठी देय अनुदान मर्यादा खालील प्रमाणे
    अ.क्र. बाब अनुदानाची मर्यादा रक्कम रुपये
    1 नवीन विहिर 4,00,000/-
    2 जुनी विहीर दुरुस्ती 1,00,000/-
    3 शेत तळयांचे प्लॅस्टिक अस्तरीकरण प्रचलित आर्थिक मापदंड व शेततळयाचे आकारमानानुसार परिगणित होणा-या रकमेच्या किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या ९० टक्के किंवा रू.२ लाख यापैकी जे कमी असेल ते
    4 इनवेल बोअरींग 40,000/-
    5 वीज जोडणी आकार २0,000/-किंवा प्रत्यक्ष भरलेला आकार यापैकी जे कमी असेल ते

     

    6 विद्युत पंपसंच/डिझेल इंजिन  ( नवीन बाब) 10 अश्वशक्ती क्षमतेपर्यत पंपसंचकरिता प्रचलित आर्थिक मापदंडाच्या किंवा

    प्रत्यक्ष होणा-या खर्चाच्या ९०  किंवा रू.४०,००० यापैकी जे कमी असेल ते

    7 सोलार पंप ( वीज जोडणी आकार व पंपसंच ऐवजी ) प्रचलित आर्थिक मापदंडाच्या किंवा प्रत्यक्ष होणा-या खर्चाच्या ९० किंवा

    रू.५०,०००  या यापैकी जे कमी असेल ते

    8 एचडीपीई/ पीव्हीसी पाईप

    ( नवीन बाब)

    प्रचलित आर्थिक मापदंडाच्या किंवा प्रत्यक्ष होणा-या खर्चाच्या १०० टक्के किंवा

    रू.५०,००० यापैकी जे कमी असेल ते

    9 सूक्ष्म सिंचन संच
    9.1 तुषार सिंचन संच प्रचलित आर्थिक मापदंडाच्या किंवा प्रत्यक्ष होणा-या खर्चाच्या ९०  किंवा

    रू.४७,०००  यापैकी जे कमी असेल ते

    9.2 ठिबक सिंचन संच प्रचलित आर्थिक मापदंडाच्या किंवा प्रत्यक्ष होणा-या खर्चाच्या ९० किंवा

    रू.९७,००० यापैकी जे कमी असेल ते

    9.3 तुषार सिंचन संच पुरक अनुदान प्रति थेंब अधिक पीक योजनेअंतर्गत (१) अल्प / अत्यल्प भूधारकांसाठी ५५‍ + मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेतून 25  + डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि

    स्वावलंबन योजनेतुन 10  तसेच (2) बहू भूधारकांसाठी 45 + मुख्यमंत्री

    शाश्वत सिंचन योजनेतून 30 + डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन

    योजनेतुन 15 किंवा रू 47,000/- या यांपैकी जे कमी असेल ते

    ( एकूण 90 अनूदान मर्यादेत)

    9.4 ठिबक सिंचन संच पुरक अनुदान प्रति थेंब अधिक पीक योजनेअंतर्गत (१) अल्प / अत्यल्प भूधारकांसाठी ५५ ‍ +

    मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेतून 25 + डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि

    स्वावलंबन योजनेतुन 10 तसेच (2) बहू भूधारकांसाठी 45 + मुख्यमंत्री

    शाश्वत सिंचन योजनेतून 30 + डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन

    योजनेतुन 15 किंवा रू 97,000/- या यांपैकी जे कमी असेल ते  ( एकूण 90 अनूदान मर्यादेत )

    10 यंत्रसामुग्री ( बैलचलित / ट्रॅक्टर चलित अवजारे )    ( नवीन बाब) ५०,०००/-
    11 परसबाग ( नवीन बाब) ५,000/-

    लाभार्थी पात्रतेच्या अटी

    1. लाभार्थी अनुसूचित जाती / नवबौध्द शेतकरी असणे आवश्यक.
    2. सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र आवश्यक.
    3. शेतकऱ्याचे स्वत:चे नांवे जमिन धारणेचा 7/12 व 8-अ उतारा आवश्यक  आहे.
    4. लाभार्थ्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक.
    5. लाभार्थ्याचे बँक खाते असणे व ते आधार कार्डशी संलग्न असणे आवश्यक.
    6. दारीद्रय रेषेखालील लाभार्थ्यास प्रथम प्राधान्य.
    7. सदर योजनेच्या लाभार्थ्यासाठी लागू असलेली रु.१,५०,००० वार्षिक उत्पन्न मर्यादेची अट रद्द करण्यात येत आहे.लाभार्थी शेतक-यांकडे किमान 0.40 हेक्टर व कमाल 6.00 हेक्टर शेतजमीन असणे आवश्यक असेल.मात्र लाभार्थ्याची जमीन दुर्गम भागात व विखंडीत असल्याने ०.४० हे. पेक्षा कमी जमिन धारणा असलेले दोन किंवा अधिक लाभार्थी एकत्र आल्यास त्यांची एकत्रित जमिन किमान ०.४० हे.इतकी होत असल्यास त्यांनी करार लिहून दिल्यास त्यांना योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील. त्याचप्रमाणे दारिद्रय रेषेखालील लाभार्थ्याना कमाल ६.० हे. धारणक्षेत्राची अट लागू असणार नाही.
    8. एकदा संबधित योजनेचा पूर्ण लाभ घेतल्यास पुढील ५ वर्ष त्याच लाभार्थ्यास किंवा कुटुंबास या योजनेचा लाभ देय होणार नाही.
    9. अशाच स्वरुपाच्या कृषि विषयक विकास योजनेकरता विशेष घटक योजनेतुन तसेच केंद्र शासनाच्या SCA व घटनेच्या कलम २७५ (A) अंतर्गत उपलब्ध करून दिलेल्या निधीतून राबविण्यात येणा-या योजनेतून लाभ दिला असल्यास या योजनेंतर्गत देण्यात येणारा लाभ अनुज्ञेय असणार नाही.
    10. सदर योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्याच्या ७/१२ उता-यावर नोंद घेण्यात येईल.

    लाभार्थी निवडीची कार्यपध्दती

    • इच्छूक लाभार्थ्यानी कृषि विभागाच्या महाडिबीटी पोर्टलद्वारे योजनेमध्ये सहभागी होणे आवश्यक राहील.लाभार्थ्याची निवड त्या त्या वर्षात उपलब्ध झालेल्या अनुदानाच्या मर्यादेतेच करण्यात येईल.

    लाभार्थी:

    लाभार्थी अनुसूचित जाती / नवबौध्द शेतकरी असणे आवश्यक.

    फायदे:

    वरील प्रमाणे

    अर्ज कसा करावा

    इच्छूक लाभार्थ्यानी कृषि विभागाच्या महाडिबीटी पोर्टलद्वारे योजनेमध्ये सहभागी होणे आवश्यक राहील.लाभार्थ्याची निवड त्या त्या वर्षात उपलब्ध झालेल्या अनुदानाच्या मर्यादेतेच करण्यात येईल.