एकात्मिक बाल विकास योजना
परिचय :-
एकात्मिक बाल विकास सेवा योजना जिल्हा कक्ष सातारा हा सातारा जिल्हा परिषदेमधील एक विभाग आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजना संबंधित विविध कार्यक्रम, व योजना राबविण्यासाठी सातारा जिल्हा परिषदेमार्फत 19 प्रकल्पाकडून ग्रामीण भागात केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार योजना राबविल्या जातात.
दृष्टी आणि ध्येय :-
ग्रामीण भागातील 3 ते 6 वयोगटातील मुलांना पुर्व प्राथमिक शिक्षण देणे ,माता व बाल मृत्य दर कमी करणे,पुरक पोषण आहार देणे.अंगणवाडीतील 3 ते 6 वयोगटातील मुलांचे कुपोषण कमी करणे,बालकांचा सर्वागींण विकास घडवून आणने,अंगणवाडी इमारत बांधकाम करणे.
उद्दिष्टे आणि कार्ये :-
एकात्मिक बाल विकास सेवा योजना जिल्हा परिषद सातारा विभागामार्फत मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना राज्य शासनामार्फत सुरु करणेत आली आहे. तसेच अंगणवाडी सेविका,मदतनीस,मिनी सेविका यांना सेवानिवृत्ती,राजीनामा,मृत्यू,सेवासमाप्ती नंतर एक रकमी एलआयसी लाभ दिला जातो. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे मार्फत ग्रामीण भागातील 3 ते 6 वयोगटातील मुलांना लसीकरण,आरोग्य तपासणी,संदर्भ सेवा,पोषण शिक्षण, सेवा दिल्या जातात.नवीन अंगणवाडीसाठी इमारत बोधणे व दुरुस्ती करीता डी.पी.सी.नाबार्ड मार्फत निधी उपलब्ध करुन दिला जातो,एकात्मिक बाल विकास विभागामार्फत भरती प्रकिया व बदली प्रकिया राबवली जाते.
प्रशासकीय रचना
- एकात्मिक बाल विकास सेवा योजना जिल्हा कक्ष सातारा जिल्हा परिषद सातारा त्यामध्ये
1) एकात्मिक बाल विकास सेवा योजना जिल्हा कक्ष सातारा जि. प. सातारा 2) बाल विकास प्रकल्प अधिकारी या प्रशासकिय व्यवस्थेव्दारे एकात्मिक बाल विकास सेवा योजना विभागाचे कामकाज सुरु असते.
संलग्न कार्यालये
संचालक/आयुक्तालय
- एकात्मिक बाल विकास सेवा योजना,नवी मुंबई,
कार्यालयाचा संपर्क
पंचायत समिती कार्यालय
गट विकास अधिकारी व संपर्क क्रमांक
अ.क्र | नाव | पदनाम | ई-मेल | कार्यालय दूरध्वनी |
1 | श्री.गणेश विभुते | बाल विकास प्रकल्प अधिकारी,पंचायत समिती कराड | Icdskrad1@gmail.com | 02164-228844 |
2 | श्री.नागेश ठोंबरे | बाल विकास प्रकल्प अधिकारी,पंचायत समिती कराड 1 | Icdskrad1@gmail.com | 02164-228844 |
3 | श्री.नागेश ठोंबरे | बाल विकास प्रकल्प अधिकारी,पंचायत समिती कराड 2 | Icdskrad1@gmail.com | 02164-228844 |
4 | श्रीम.राजश्री बने | बाल विकास प्रकल्प अधिकारी,पंचायत समिती पाटण | patancdpo@gmail.com | |
5 | श्रीम.राजश्री बने | बाल विकास प्रकल्प अधिकारी,पंचायत समिती पाटण 1 | Patancdpo2@gmail.com | |
6 | श्री.संदिप भिंगारे | बाल विकास प्रकल्प अधिकारी,पंचायत समिती सातारा | Icdssatara12@gmail.com | 02162-222895 |
7 | श्री.संदिप भिंगारे | बाल विकास प्रकल्प अधिकारी,पंचायत समिती सातारा 1 | Cdposatara2@gmail.com | 02162-222880 |
8 | श्रीम.शैला खामकर | बाल विकास प्रकल्प अधिकारी,पंचायत समिती जावली | icdsjawali@gmail.com | 02378-285991 |
9 | श्रीम.रंजना भनगे | बाल विकास प्रकल्प अधिकारी,पंचायत समिती महाबळेश्वर | cdpomashwar@gmail.com | |
10 | श्रीम. उज्वला गायकवाड | बाल विकास प्रकल्प अधिकारी,पंचायत समिती वाई | icdswai@gmail.com | 02167-227802 |
11 | श्रीम.छाया मुगदुम | बाल विकास प्रकल्प अधिकारी,पंचायत समिती खंडाळा | icdskhandala@gmail.com | 02169-252021 |
12 | श्रीम.प्रियांका गवळी | बाल विकास प्रकल्प अधिकारी फलटण | cdpophaltan@gmail.com | 02166-225860 |
13 | श्रीम.प्रियांका गवळी | बाल विकास प्रकल्प अधिकारी फलटण 1 | Cdpphaltan2@gmail.com | 02166-225860 |
14 | श्री.शंकर इंगळे | बाल विकास प्रकल्प अधिकारी माण दहिवडी | Cdpoman2015@gmail.com | 02165-299200 |
15 | श्री.शंकर इंगळे | बाल विकास प्रकल्प अधिकारी माण म्हसवड | Cdpoman2015@gmail.com | 02165-295016 |
16 | श्रीम.वर्षाराणी ओमासे | बाल विकास प्रकल्प अधिकारी खटाव | khatavicds@gmail.com | |
17 | श्रीम.संगीता खाबडे | बाल विकास प्रकल्प अधिकारी खटाव १ | khatavicds@gmail.com | |
18 | श्रीम.शारदा जाधव | बाल विकास प्रकल्प अधिकारी कोरेगांव | cdpokoregaon@gmail.com | 02163-221471 |
19 | श्रीम.विदया बगाडे | बाल विकास प्रकल्प अधिकारी कोरेगांव 1 | Cdpokoregaon2@gmail.com | 02163-221471 |
सातारा जिल्हा परिषद,सातारा कार्यालय प्रमुख व संपर्क क्रमांक |
- जिल्हा कार्यक्रम अधिकारी (मवबावि) :-
नांव | पदनाम | ई–मेल | दूरध्वनी क्रमांक (02162) | कार्यालयाचा पत्ता |
मा. रोहिणी सुरेशचंद्र ढवळे | जिल्हा कार्यक्रम कार्यकारी अधिकारी (मवबावि) | dyceozpsatara@gmail.com | 229888 | 3 रा मजला, जिल्हा परिषद सातारा सातारा-कोरेगांव रोड सदरबझार सातारा. |
कनिष्ठ प्रशासन अधिकारी :-
नांव | पदनाम | ई–मेल | दूरध्वनी क्रमांक (02162) | कार्यालयाचा पत्ता |
रिक्तपद | कनिष्ठ प्रशासन अधिकारी | dyceozpsatara@gmail.com | 229888 | 3 रा मजला, जिल्हा परिषद सातारा सातारा-कोरेगांव रोड सदरबझार सातारा.. |
योजना दस्तऐवज
महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांक एबावि- २०22/प्र.क्र.251/का-6 दि.30 ऑक्टोंबर 2023 अन्वये राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना सुरु करणेत आली . सदरच्या योजनांचा तपशिल
गट –अ :- लेक लाडकी योजना
सदर योजनेची उदिदष्टे खालील प्रमाणे.
- मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देवून मुलींचा जन्मदर वाढविणे.
2.मुलींच्या शिक्षणास चालना देणे.
- मुलींच्या मृत्यूदर कमी करणे व बालविवाह रोखणे.
- कुपोषण कमी करणे.
5.शाळाबाहय मुलींचे प्रमाण 0 (शुन्य)वर आणण्यासाठी प्रोत्साहित करणे.
महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांक एबावि- २०13/प्र.क्र.141/का-6 दि.30 एप्रिल 2014 एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतील अंगणवाडी कर्मचा-यांना एल.आय.सी.योजनेतंर्गत सेवानिवृत्तीनंतर एकरकमी लाभ देण्याबाबत. सदरच्या योजनांचा तपशिल
गट –ब :- एकरकमी एलआयसी
सदर योजनेची उदिदष्टे खालील प्रमाणे (.pdf)
- अंगणवाडी सेविका,मदतनीस व मिनी अंगणववाडी सेविका या मानधनी कर्मचा-यांना सेवानिवृत्ती
राजीनामा/मृत्यू सेवेतून काढून टाकल्यानंतर खालील प्रमाणे एल.आय.सी.योजनेतंर्गत
एकरकमी लाभ दिनांक 30/04/2014 पासून देण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.
लाभस्तर | अंगणवाडी सेविका | मिनी अंगणवाडी सेविका/मदतनीस |
सेवानिवृत्ती | रु.1,00,000/- | रु.75000/- |
राजीनामा /सेवेतून काढून टाकणे | प्रत्येक पुर्ण सेवा केलेल्या एका वर्षासाठी महिन्याचे वेतन(जास्तीत जास्त 1,00,000/-मर्यादेपर्यत) तथापी कमीत कमी पाच वर्षाची सेवा पुर्ण करणे आवश्यक | प्रत्येक पुर्ण सेवा केलेल्या एका वर्षासाठी महिन्याचे वेतन(जास्तीत जास्त 75,000/-मर्यादेपर्यत) तथापी कमीत कमी पाच वर्षाची सेवा पुर्ण करणे आवश्यक |
मृत्यू | रु.1,00,000/- | रु.75000/- |
गट –क :- अंगणवाडी बांधकाम
महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांक एबावि- २०20/प्र.क्र.131/का-2 दि.31 जानेवारी 2022 अन्वये महिला व बाल विकास सशक्तीकरण योजनेसाठी जिल्हा वार्षीक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत किमान 3% इतका निधी कायमस्वरुपी उपलब्ध करणेबाबत. सदरच्या योजनांचा तपशिल
सदर योजनेची उदिदष्टे खालील प्रमाणे (.pdf)
- अंगणवाडी केंद्रांचे नवीन बांधकाम करणे.
- अंगणवाडी केंद्रांना नलिकांव्दारे पाणीपुरवठा करणे.
- अंगणवाडी केंद्रांना वीज पुरवठा करणे.
- अंगणवाडी केंद्रांतील स्वयंपाकघरांचे आधुनिकीकरण करणे.
- अंगणवाडी केंद्रांच्या इमारतीचे विस्तारीकरण करणे.
- अंगणवाडी केंद्रांच्या इमारतींची विशेष दुरुस्ती करणे.
- अंगणवाडी केंद्रांमध्ये मातांच्या स्वतंत्र प्रतिक्षागृहाचे बांधकाम करणे.
- अंगणवाडी केंद्रांकरीता संरक्षक भिंत बांधणे.
- वाढ संनियंत्रण संयत्रांचा पुरवठा व देखभालीसाठी खर्च करणे.
माहितीचाअधिकारअधिनियम-2005
अ.क्र |
सहाय्यक जनमाहिती अधिकारी |
जन माहिती अधिकारी |
प्रथम अपिलीय अधिकारी |
1. | विस्तार अधिकारी सां. |
कनिष्ठ प्रशासन अधिकारी जिल्हा परिषद सातारा |
जिल्हा कार्यक्रम अधिकारी (मवबावि) जिल्हा परिषद सातारा |
2. | वरिष्ठ सहाय्यक (प्रशा) | ||
कनिष्ठ सहाय्यक (प्रशा) | |||
Email- dyceozpsatara@gmail.com |