बंद

    लघुपाटबंधारे विभाग

    आपल्या देशामध्ये ७० टक्के शेती ही पावसावर अवलंबून आहे. परंतु सध्या पावसाचे प्रमाण कमी झाल्याने तसेच जलसंधारणाच्या मोठया प्रकल्पांचा शेतकऱ्यांना फार उशिरा लाभ होत असल्याने सध्या लघु पाटबंधारे कामांना फार महत्व प्राप्त झाले आहे. लघु पाटबंधारे स्वरुपाची ० ते १०० हेक्टर्स मधील कामे अल्प कालावधीत पुर्ण होत असलेने त्याचा लाभ त्वरीत शेतक-यांना होत असतो. यामध्ये सामान्यपणे पाझर तलाव, ग्राम तलाव, कोल्हापूर पध्दतीचे बंधारे, साठवण बंधारे, वळण बंधारे, साठवण तलाव अशी कामे केली जातात. अशा ० ते १०० हेक्टर सिचन क्षमतेमधील लघु पाटबंधारेची कामे जिल्हा परिषदेमार्फत शासनाच्या विविध लेखाशिर्षाअंतर्गत राबविली जातात. यासाठी सातारा जिल्हा परिषदेकडे लघु पाटबंधारे विभाग असून त्या अंतर्गत ११ तालुक्यातील लघु पाटबंधारेची कामे, लघु पाटबंधारे उपविभाग सातारा, खटाव, फलटण, कराड व ग्रामीण पाणी पुरवठा उप विभाग कोरेगाव, वाई व महाबळेश्वर या तीन उपविभागामार्फत केली जातात.