बंद

    महिला व बाल कल्याण

    परिचय:

    महिला व बाल कल्याण विभाग हा सातारा जिल्हा परिषदेमधील एक विभाग आहे. महिला व बाल कल्याण विकासाशी संबंधित विविध कार्यक्रम , व योजना राबविण्यासाठी जिल्हा परिषदेमध्ये महिला व  बाल कल्याण समितीची स्थापना करण्यात आलेली आहे .सदर विभाग हा जिल्हा कार्याक्रम अधिकारी व सभापती महिला व बाल कल्याण समिती यांचे मार्फत शासन निर्णयानुसार महिला व मुलींना सक्षम करणेसाठी जिल्हा परिषदेमध्ये 10 टक्के निधीतून व शासकिय अनुदानातून प्रशिक्षण  व सक्षमिकरणाच्या योजना महिला व मुलींसाठी राबविल्या जातात .

    दृष्टी आणि ध्येय:

    ग्रामीण भागातील गोर, गरीब ,गरजू ,दारिद्र रेषेखालील व सर्व क्षेत्रातील  महिला व मुलींचा विकास व सक्षमीकरण करणे

    उद्दिष्टे आणि कार्ये :

    महिला व बाल  विकास विभागामार्फत जिल्हा परिषद उत्पन्नाचे  10 टक्के सेस निधीतून विविध कार्यक्रम व  योजना सक्षमपणे राबविण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. हा लाभ ग्रामीण भागातील गोर, गरीब ,गरजू ,दारिद्र रेषेखालील महिला व मुलींपर्यत  पोहचविणेचे काम केले जाते. सर्व क्षेत्राात  महिला व मुलींचा विकास व सक्षमीकरण  व्हावे.तसेच  पोषण व आरोग्य विषयक दर्जा सुधारावा, स्वच्छता प्रजनन व लैगिक आरोग्य, आणि   कुटुंब व बालकांची काळजी घेणे या विषयीची जाणीव व जागृत्ती निर्माण व्हावी. कार्यक्रम व  योजनातून मार्गदर्शन केले जाते. महिला व मुलींमध्ये आत्मविश्वास वाढावा.विविध कायदेविषयक तरतूदींची माहिती मिळावी म्हणून प्रशिक्षण शाळा आयोजित केल्या जातात यासाठीची खर्चाची मर्यादा महिला व बाल विकास समिती निश्चित करते.हे या विभागाचे प्रमुख उदिदष्य आहे