बंद

    आरोग्य विभाग

    1. विभागाबाबत सर्वसाधारण माहिती 

    ग्रामीण भागात दर 30,000 लोकसंख्येत एक (डोंगरी भागात 20,000 लोकसंख्येमागे एक) प्राथमिक आरोग्य केंद्र आणि दर 5000 लोकसंख्येत एक आरोग्य उपकेंद्र (डोंगरी भागात 3,000 लोकसंख्येमागे एक) या निकषाप्रमाणे जिल्हयात प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रे स्थापन करणेत आली आहेत. जिल्हयात 1 सामान्य रुग्णालय, 18 ग्रामीण / कुटीर रुग्णालय, 84 प्राथमिक आरोग्य केंद्रे, 6 प्राथमिक आरोग्य पथके, 418 उपकेंद्रे व 17 जिल्हा परिषद आयुर्वेदीक दवाखाना व 4 नागरी आरोग्य केंद्र कार्यरत आहेत.

     

    • प्रस्तावना

     

    आरोग्य म्हणजे केवळ व्याधी किंवा विकलांगता याचा अभाव नव्हे, तर संपूर्ण शारीरिक, मानसिक आणि सामाजिक स्वास्थ्य म्हणजे आरोग्य अशी जागतिक आरोग्य संघटनेची आरोग्य विषयक संकल्पना आहे. “सर्वासाठी आरोग्य” हे उद्दिष्ट ठेवून ते साध्य करण्याची बांधीलकी राज्य शसनाने स्विकारली असून त्यासाठी गेल्या काही वर्षापासून प्रतिबंधक, प्रवर्तक, उपचारात्मक आणि पुनर्वसनात्मक आरोग्य सेवा जनतेला पुरविणेकरीता आरोग्य विषयक सुविधांचे जाळे उभारणेसाठी राज्य शासनाकडून प्रयत्न करणेत येत आहे. राज्याच्या कानाकोप-यामध्ये ग्रामीण जनतेला आरोग्य विषयक सुविधा पोहचविणेसाठी ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे यांची स्थापना करणेत आली आहे. तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गंत विविध कार्यक्रम, क्षयरोग नियंत्रण, कुष्ठरोग निर्मुलन, इ. कार्यक्रमांवर भर दिला जात आहे. पावसाळयामध्ये गॅस्ट्रो, हिवताप व पाण्यामुळे होणा-या इतर रोगांचा प्रादुर्भाव होवू नये म्हणून विविध उपाययोजना राबविणेत येत आहेत. सार्वजनिक आरोग्य सेवेमध्ये खालील आरोग्य कार्यक्रमांतर्गंत सेवा पुरविण्यात येतात.

    • वाढत्या लोकसंख्येस आळा घालणेसाठी राष्ट्रीय कुटुंब कल्याण तथा लोकसंख्या नियंत्रण कार्यक्रम.
    • मातृत्वाच्या वाटेवर प्रकृतीशी झगडणा-या माता, त्यांची बालके जन्मत:च गंभीर असतात. त्यासाठी राष्ट्रीय प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रम. त्याचप्रमाणे शालेय तसेच आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी कार्यक्रम.
    • डासांमुळे फैलावणा-या वाढत्या रोगांवर नियंत्रणसाठी राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम.
    • शारीरिक विकलांगता आणणा-या रोगापासून मुक्तीसाठी राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रम.
    • मनुष्य प्रकृतीचा क्षय करणा-या रोगांवर नियंत्रणसाठी राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम.
    • मानवी जीवनातील अंध:कार दूर करणेसाठी राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम.
    • दूषित पाण्यामुळे तसेच इतर प्रकारे उद्भवणा-या साथीच्या रोगांवर प्रतिबंध व उपाययोजना राबविणेसाठी एकात्मिक रोग सर्व्हेक्षण कार्यक्रम.
    • दूषित रक्ताव्दारे पसरवणा-या लैंगिक व एडस् सारख्या रोगांचा मुकाबला करणेसाठी राष्ट्रीय एडस् नियंत्रण कार्यक्रम.
    • याशिवाय इतर कार्यक्रमांतर्गंत आयोडीनयुक्त मीठाच्या कमतरतमुळे उद्भवणा-या गलगंडासारख्या रोगांवर नियंत्रणासाठी राष्ट्रीय आयोडीन न्यूनता विकार नियंत्रण कार्यक्रम. त्याचप्रमाणे एक सामाजिक व राष्ट्रीय गरज म्हणून जन्म मृत्यू व विवाह नोंदणी जे काम ग्रामपंचायत पातळीवर केले जाते परंतू त्याचे नियंत्रण मात्र सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत केले जाते.

    वरील सर्व कार्यक्रमासाठी आवश्यक ते वैद्यकीय/निमवैद्यकीय कर्मचा-यांचे प्रशिक्षण व त्याबरोबरच आरोग्य विषयक सामाजिक हिताच्या गोष्टींना व्यापक स्वरुपात सर्व माध्यमांव्दारे प्रसिध्दी देवून जनजागरणाचे महत्वाचे काम या विभागामार्फत केले जाते.

    जिल्हयातील शासकीय आरोग्य संस्थांची आकडेवारी खालील तक्त्यामध्ये दर्शविली आहे.

    अ.

    क्र.

    तालुका कार्यरत आरोग्य संस्था
    सामान्य/ ग्रामीण/कुटीर रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्रे आरोग्य उपकेंद्रे प्राथमिक आरोग्य पथके जि.परिषद आयुर्वेद दवाखाने
    1 सातारा 2 12 47 0 1
    2 जावली 2 5 25 0 2
    3 मश्वर 1 3 15 1 0
    4 वाई 1 4 27 1 1
    5 खंडाळा 1 4 25 1 3
    6 फलटण 1 7 37 0 3
    7 माण 2 6 35 1 2
    8 खटाव 3 9 44 2 1
    9 कोरेगाव 2 7 37 0 1
    10 कराड 2 14 65 0 1
    11 पाटण 2 13 61 0 2
    एकूण 19 84 418 6 17
    • जीवन विषयक आकडेवारी :-

    जिल्हयाचा जन्मदर, मृत्यू दर व अर्भक मृत्यू दर काढणेसाठी मृत्यूच्या कारणांचे सर्व्हेक्षण ही योजना जिल्हयातील सर्व गावामध्ये सुरु आहे. प्रत्येक प्रा.आ.केंद्रांतील एक गाव या योजनेंतर्गंत निवडणेचे प्रस्तावित आहे. या योजनेतर्गंत दरमहा रहिवाशी जन्म-मृत्यू घटनांची नोंद केली जाते. मृत्यूच्या बाबतीत कारणांचा शेाध घेतला जातो व त्या आधारे जिल्हयातील जीवन विषयक दर काढले जातात.

    मृत्यूच्या कारणांचे सर्वेक्षण (ग्रामीण) योजनेवरुन जिल्हयाचे जीवन विषयक दर खालीलप्रमाणे

    अ.क्र.

    दर्शक

    2019

    2020

    2021

    2022

    2023

    1

    जन्मदर

    12.6

    11.8

    12.45

    13.55

    11.22

    2

    मृत्यूदर

    7.9

    9.29

    10.56

    8.86

    7.64

    3

    अर्भक मृत्यू दर

    10.25

    11.19

    8.66

    8.01

    8.9

    4

    जननदर

    1.69

    1.5

    1.69

    1.63

    1.45

    जिल्हयातील सर्व महसुली गावामध्ये घडलेल्या जीवन विषयक घटनांची नोंद करणेसाठी महसुली गाव स्तरावर निबंधक म्हणून ग्रामसेवक अथवा ग्राम विकास अधिकारी काम पहातात.

     

    • जनगणना 2001 व 2011 :

    सन 2011 च्या जनगणनेनुसार सातारा जिल्हयाची लोकसंख्या ही 30.03 लक्ष आहे. 2001 ते 2011 या कालखंडात 6.94 टक्के एवढी लोकसंख्या वाढ झालेली आहे. सन 2011 च्या जनगणनेनुसार जिल्हयातील साक्षरतेचे प्रमाण 84.20 टक्के असून 92.09 टक्के पुरुष व 76.29 टक्के स्त्रीया साक्षर आहेत. लोकसंख्येची घनता दर चौ.कि.मी.मध्ये 287 आहे.

    अ. क्र. दर्शक सातारा महाराष्ट्र
    2001 2011 2001 2011
    1 लोकसंख्या (लाख) एकूण 28.09 30.03 968.79 1123.72
    पुरुष 14.08 15.10 503.34 583.61
    स्त्री 14.01 14.93 464.18 540.11
    2 लोकसंख्या वाढीचा दर 14.59 6.94 22.57 15.99
    3 लिंग प्रमाण (0 ते 6 वर्ष वयोगट) 878 895 913 894
    4 साक्षरता एकूण 78.52 84.20 77.27 82.91
    पुरुष 88.45 92.09 86.27 89.82
    स्त्री 68.71 76.29 67.51 75.48
    5 लोकसंख्येची घनता (प्रति चौ.कि.मी.) 267 287 314 365

    भारत, महाराष्ट्र व सातारा जिल्ह्याचे 1901 पासून सर्वसाधारण तुलनात्मक लिंग प्रमाण :-

    (दर हजार पुरुषांमागे स्त्रीयांचे प्रमाण)

    वर्ष 1911 1921 1931 1941 1951 1961 1971 1981 1991 2001 2011
    भारत 964 955 950 945 946 941 930 934 927 933 943
    महाराष्ट्र 966 950 947 949 941 936 930 937 934 922 929
    सातारा 1025 1030 1006 1035 1051 1047 1037 1061 1029 995 988

     

    दृष्टी आणि ध्येय :-        

    • क्षयरोग मुक्त जिल्हा – डिसेंबर 2025 पर्यंत सातारा जिल्हा क्षयरोग मुक्त जिल्हा करणेच्या दृष्टीने योग्य ती उपाययोजना राबविण्यात येत आहे.
    • कॅन्सर मुक्त अभियान – प्राआकेंद्रस्तरावर बाहयरुग्ण विभागात येणा-या रुग्णांची अत्याधुनिक यंत्राव्दारे योग्य प्राथमिक तपासणी करुन त्यांचेवर तात्काळ पुढील उपचारासाठी संदर्भ सेवा देण्यात येऊन उपचार करणेत येणार आहेत. महिलांमध्ये गर्भाशयाचा कर्करोग व स्तनाचा कर्करोग यासाठी जनजागृती करणेत येत आहे.
    • स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र (SMART PHC)

    महाराष्ट्र राज्यामध्ये सातारा जिल्हा प्रशासकीय कामकाज व लोक उपयुक्‍त नविन योजना राबविण्याबाबत नेहमीच अग्रेसर राहीला असून राज्याकरीता महत्वपूर्ण ठरलेले अनेक पथदर्शक प्रकल्प सातारा जिल्हयात प्रायोगिक तत्वावर यशस्विपणे राबविणेत आलेले आहेत. आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सातारा अंतर्गतही जिल्हयामध्ये अनेक नाविन्यपूर्ण योजना राबविण्यात आल्या असून त्याव्दारे प्राथमिक रुग्ण सेवेचा दर्जा उंचविणेस मदत झालेली आहे, परंतु खाजगी आरोग्य संस्थांशी तुलना करीता शासकीय आरोग्य सेवा अदयापी तांत्रिकदृष्टया मागासलेली व सुमार दर्जाची असल्याचे दिसून येते. यामध्ये प्रामुख्याने नियोजन, निधी व सकारात्मक मानसिकतेचा अभाव दिसून येतो. या सर्वांचा परिणाम म्हणून गोर गरीब जनतेस नाईलास्तव खाजगी आरोग्य सेवेकरीता फार मोठी आर्थिक किमंत मोजावी लागत आहे. या सर्व बाबींचा विचार करता जिल्हयातील प्राथमिक आरोग्य केंद्रांचा दर्जा उंचावून सेवा, क्षमता व स्वच्छता इत्यादी बाबींमध्ये ती नेहमीच अग्रेसर राहतील याकरीता आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सातारा जिल्हयामध्ये “स्मार्ट पीएचसी” ही योजना राबवित आहे.

    योजनेचे स्वरुप – जिल्हयातील प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत गुणवत्तापूर्वक व सर्वसमावेशक सेवा प्रदान करणेसाठी प्राआकेंद्र स्मार्ट करणेची संकल्पना राबविेणेत येत असून या अंतर्गत प्रामुख्याने आरोग्य संस्थांच्या भौतिक सुविधांचा दर्जा उंचावणे, प्रशिक्षणाव्दारे कार्यरत कर्मचारी व अधिकारी यांचे तांत्रिक ज्ञान व रुग्णसेवे प्रती निष्ठा उंचावणे, नियमावली नुसार शिष्टाचार सेवा प्रदान करणे, तत्काळ संदर्भ सेवा उपलब्ध करुन देणे, माहिती तंत्रज्ञानाचा वापर करणे, पर्यावरण पुरक नैसर्गिक उर्जास्त्रोचा वापर करणे, लोकसहभाग वाढविणे इत्यादी बाबींवर भर देण्यात येणार आहे.

    बांधकाम व परिसर सुशोभिकरण – प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये बाहय परिसरामध्ये प्रामुख्या सरंक्षक भिंत, अंतर्गत रस्ते, बाग, प्रसाधनगृह, निवासस्थाने इ. बाबींचा तर अंतर्गत भागामध्ये स्वागतकक्ष, वैदयकिय अधिकारी कक्ष, प्रसुतीगृह, प्रयोगशाळा, औषधभांडार, आंतर व बाहय रुग्ण विभाग, शस्त्रक्रियागृह व संगणक कक्ष, इ. बाबींचा समावेश होतो या सर्व बाबीं सुस्थितीत ठेवणे व आवश्यकतेनुसार दुरुस्ती करणे, सुशोभिकरण करणे, स्वच्छता, इत्यादी बाबींवर विशेष लक्ष देण्यात येणार असून रुग्ण व नातेवाईक यांचेकरीता प्राआकेंद्र परिसरातील वातावरण आरोग्यदायी व आनंददायी राहील याची काळजी घेणेत येईल. तसेच याचबरोबर प्राआकेंद्र परिसरात आयुष गार्डन विकसित करणेत येणार असून आरोग्य संस्थेची ऊर्जेची गरज नैसर्गिक ऊर्जास्त्रोताव्दारे भागविणेत येणार असून पावसाच्या पाण्याचा जास्तीत जास्त उपयोग व्हावा याकरीता जल पुनर्भरण योजना राबविणेत येणार आहे.

    अदयावत वैदयकिय साहित्य – प्राआकेंद्रामधील आंतर-बाहय विभाग, प्रसुतीगृह व शस्त्रक्रियागृह हे प्रमुख विभाग असून हे सर्व विभाग अदयावत तांत्रिक संसाधनांनी सुसज्ज ठेवणे ही योजनेतील प्राथमिकता असणार आहे, ज्याव्दारे रुग्णांना अदयावत व जलद वैदयकिय सुविधा पुरवता येईल. यामध्ये प्रामुख्याने अदयावत लेबर टेबल, शेडोलेस लॅम्प, औषध व साहित्याकरीता कॅबिनेट, इन्स्ट्रुमेंट ट्रॉली, बेबी वॉमर, सक्शन मशिन, अत्यावश्यक ९ ट्रे, स्टेचर विथ ट्रॉली, ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर, ऑटोक्लेव्ह, टयुबकटॉमी किट, स्टरलायजेशन संच, इत्यादी बाबींचा समावेश असणार आहे. त्याप्रमाणे सदयस्थितीत असणारी ऑपरेशन थिएटर सेमी मॉडयुलर ऑपरेशन थिएटर मध्ये रुपांतरीत करावयाचा मानस आहे. प्रयोगशाळामध्ये जास्तीत जास्त प्रकारच्या तपासण्या होण्याकरीताही अत्याधुनिक संसाधनाची आवश्यकता आहे.

    आधुनिक तंत्रज्ञान वापर – रुग्णांची नोंदणी ऑनलाईन पध्दतीने करणे, लोकांना स्मार्ट हेल्थ कार्ड उपलब्ध करुन देणे, रुग्णांना त्यांच्या तपासणीचे अहवाल मोबाईलवर उपलब्ध करुन देणे तसेच रुग्ण पुढील उपचाराकरीता इतर शासकीय संस्थेकडे संदर्भीत केलेस रुग्णांची यापूर्वीचा उपचार इतिहास त्या संस्थेकडे ऑनलाईन पध्दतीने उपलब्ध होणेकरीता अदयावत संगणकीय प्रणालींचा वापर करणेचा आहे, याव्दारे कामकाजासंबधी सर्व माहिती संगणकावर उपलब्ध होईल त्याचा उपयोग दर्जेदार रुग्ण सेवा देणेकरीता होईल अशी खात्री आहे. तसेच अहवाल सादर करणे, मिटींग प्रेझेन्टेंशन करीता प्रोजेक्टर, पत्र व्यवहार, इ. बाबींकरीता आधुनिक संगणकीय संच, मुद्रकांची उपलब्धता व इंटरनेट सुविधा प्राआकेंद्राकरीता करुन देण्यात येणार आहे.

    मनुष्यबळ व प्रशिक्षण – स्मार्ट पीएचसी योजना यशस्वीपणे राबविणेकरीता प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध असणे ही महत्वाची बाब आहे, याकरीता सर्व अधिकारी व कर्मचारी अदयावत राहतील याकरीता त्यांना वेळोवेळी तांत्रिक प्रशिक्षण उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच अधिकारी व कर्मचारी वर्गाची कार्यक्षमता वाढविणे व मानसिक ताण-तणाव कमी करणे याकरीता ध्यान-योग या बाबींच्या सुध्दा प्रशिक्षणात समावेश करणेत येणार आहे. तसेच वेळोवेळी वैदयकिय क्षेत्रातील तंज्ञाचे मार्गदर्शक सत्रांचेही आयोजन करणेत येणार आहे. आपत्ती व्यवस्थापनामध्ये आरोग्य विभागाचा नेहमीच महत्वाचा वाटा राहीला आहे, त्यामुळे पूर, साथ अशा बाबींमध्ये अधिकारी/कर्मचारी वर्ग सक्षमतेने कार्यरत राहील याकरीता आप्तती व्यवस्थापना संबंधी बाबींचाही समावेश प्रशिक्षणामध्ये करणेत येईल.

    संस्थांची निवड व निधी उपलब्धता – सातारा जिल्हयामध्ये स्मार्ट पीएचसी योजनेची अंमलबजावणी प्रायोगिक तत्वावर करणेकरीता एकुण 65 प्राआकेंद्रांची निवड निवडक निकषांच्या आधारे करणेत आलेली आहे. उर्वरीत सर्व प्राआकेंद्रांचे रुपांतर स्मार्ट प्राआकेंद्रामध्ये करणेत येणार आहे.

    • जन्म दर : १२.०

    स्त्रीरोगतज्ज्ञ : कुटुंब नियोजन कार्यक्रमांतर्गत पुढील पाच वर्षांत सरासरी दरवर्षी १८००० ते २०००० शस्त्रक्रिया करण्याचे नियोजन केले आहे.

    पहिल्या व दुसऱ्या प्रश्नांवरील शस्त्रक्रिया १% ने वाढवण्याचे नियोजन (म्हणजे सुमारे ३०० ते ३५०).

    ३ आणि ३ पेक्षा जास्त अपत्य असणाऱ्या जननक्षम जोडप्यांवर कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करण्यासाठी उपाययोजना.

    तात्पुरते कुटुंब नियोजन पद्धती १% ने वाढवून ९% पर्यंत पोहोचणार आहेत. §

    • अर्भक मृत्यू दर: २०.००

    संस्थात्मक प्रसूतींचे प्रमाण ९८% पर्यंत वाढवण्याचे नियोजन, सरकारी संस्थांमधील प्रसूतींचे प्रमाण ४०% पर्यंत वाढवण्याचे नियोजन, एएनसी आणि पीएनसीची गुणात्मक सेवा, रक्तक्षय टाळण्यासाठी योग्य प्रतिबंधक आणि उपचारात्मक उपचार, लसीकरणाची गुणात्मक सेवा, उच्च जोखमीच्या रुग्णांसाठी संदर्भ सेवा,  पीएचसी स्तरावर स्त्रीरोगतज्ज्ञ आणि बालरोगतज्ज्ञांची सेवा.

    • मातृ मृत्यू दर: ०.५०

    संस्थात्मक प्रसूतींचे प्रमाण ९८% पर्यंत वाढवण्याचे नियोजन, सरकारी संस्थांमधील प्रसूतींचे प्रमाण ४०% पर्यंत वाढवण्याचे नियोजन, एएनसी आणि पीएनसीची गुणात्मक सेवा आणि तत्पर संदर्भ सेवा,  वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, पीएचसी स्तरावर स्त्रीरोगतज्ज्ञांची सेवा, मातृ मृत्यू लेखापरीक्षण.

    • जोडप्याच्या संरक्षणाचे प्रमाण : ७७

    पहिल्या व दुसऱ्या प्रश्नांवरील शस्त्रक्रिया १% ने वाढवण्याचे नियोजन (म्हणजे सुमारे ३०० ते ३५०),  तात्पुरते कुटुंब नियोजन पद्धती १% ने वाढवून ९% पर्यंत पोहोचणार आहेत, पुरुष नसबंदीचे लक्ष्य १०% पर्यंत वाढवण्याचे नियोजन.

    • एकूण प्रजनन दर: १.७६

    दोन मुलांच्या दरम्यान अंतर राखण्यासाठी लाभार्थ्यांची संख्या वाढवा, लहान कुटुंब नियम स्वीकारण्यासाठी समुदायात जागृती निर्माण करा.

     

     

    उद्दिष्टे आणि कार्ये :-

     

    ध्येयग्रामीण व शहरी भागात गुणवत्तापूर्ण व परिणामकारक आरोग्य सेवा पोहचविणे.

    उद्दिष्ट शासकीय संस्थेमध्ये प्रसुतीच्या प्रमाणात वाढ करणे, बालमृत्यू व मातामृत्यू कमी करणे, सार्वजनिक आरोग्य सेवा सर्वांना सुलभतेने उपलब्ध करुन देणे, जननदर कमी करणे, संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांचा प्रतिबंध व नियंत्रण करणे.

    साधावयाची ध्येय – 1) जिल्हयामध्ये जिल्हा आरोग्य अभियान पूर्णपणे कार्यरत असावे. 2) 24 x 7 च्या प्राआकेंद्रांत अत्यावश्यक आरोग्य उपलब्ध असाव्यात. 3) सर्व ग्रामीण रुग्णालय ही संदर्भ सेवा केंद्रे असावीत. 4) आयुष औषधोपचार प्रणाली मुख्य प्रवाहात आणणे. 5) सर्व भागामध्ये लोकसख्ंयेच्या प्रमाणात आशा (ASHA) कार्यरत व्हावी, 6) जननी सुरक्षा योजनेचा लाभ 100 टक्के लाभार्थींना मिळावा. 7) नवजात अर्भक व बालकांच्या आजारांचे व्यवस्थापनांवर आधारित एकात्मिक आरोग्य सेवा देण्यात याव्यात. 8) राज्याच्या अर्थसंकल्पात आरोग्य विभागास वाढीव निधी उपलब्ध व्हावा. 9) सर्व पंचायत राज संस्था व जन आरोग्य समित्यांचे सदस्यांचे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाबाबत प्रशिक्षण पूर्ण झालेले असावे. 10) 0 ते 18 वर्षे वयोगटातील सर्व मुलांची आरोग्य तपासणी, संदर्भ सेवा व उपचार उपलब्ध करुन देणे.

     

    प्रशासकीय रचना 

    • जिल्हयातील संवर्गनिहाय मंजूर, भरलेल्या व रिक्त पदांची माहिती – नोव्हेंबर 2024 अखेर :-
    अ. क्र. संवर्ग मंजूर पदे भरलेली पदे रिक्त पदे
    1 जिल्हा आरोग्य अधिकारी 01 01 00
    2 अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी 01 01 00
    3 सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी 01 01 00
    4 जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी 01 00 01
    5 प्रशासन अधिकारी 01 00 01
    6 सांख्यिकी अधिकारी 01 00 01
    7 तालुका आरोग्य अधिकारी 11 10 01
    8 वैद्यकीय अधिकारी 174 168 06
    9 औषध निर्माण अधिकारी 101 92 09
    10 प्रयोगशाळा तंत्रज्ञ 07 06 01
    11 आरोग्य पर्यवेक्षक 24 21 03
    12 आरोग्य सहाय्यक पुरुष 146 129 17
    13 आरोग्य सेवक पुरुष 509 138 371
    14 आरोग्य सेवक महिला 723 415 308
    15 आरोग्य सहाय्यक महिला 118 64 54
    16 अवैद्यकीय पर्यवेक्षक 03 03 00
    17 NHM 927 712 215

     

    Flow diagram

     

     

    संलग्न कार्यालये

     

    • जिल्हा हिवताप कार्यालय
    • जिल्हा क्षयरोग कार्यालय
    • जिल्हा कुष्ठरोग कार्यालय
    • तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय
    • प्राथमिक आरोग्य केंद्रे
    • प्राथमिक आरोग्य उपकेंद्रे
    • आयुर्वेदीक दवाखाने
    • आयुर्वेदीक पथके
    • शहरी नागरी आरोग्य केंद्र
    • आपला दवाखाना
    • शहरी आरोग्य वर्धिनी केंद्र

     

    संचालक/आयुक्तालय

     

    • उपसंचालक, आरोग्य सेवा कार्यालय, पुणे
    • संचालक, आरोग्य सेवा, पुणे व मुंबई
    • आयुक्त आरोग्य सेवा व अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई
    • अप्पर मुख्य सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई

     

     

    • प्रधानमंत्री मातृ वंदना योजना : प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेतंर्गंत देशात सर्वाधिक नोंद केल्याबद्दल सातारा जिल्हयाचा गौरव करण्यात आला.
    • pic1

     

     

     

    सन 2023-24 कायाकल्प योजने अंतर्गंत जिल्हयातील खालील आरोग्य संस्थांना पारितोषिक जाहिर करणेत आले आहे.

    •  
    SR. NO. TALUKA FACILITY NAME AWARD LEVEL AWARD PRIZE (IN Lakh)
    DH/SDH/RH
    1 KARAD SDH KARAD Commendation 1.00
    2 KOREGAON RH KOREGAON Commendation 1.00
    PHC
    1 Satara Kumthe Winner 2.00
    2 Wai Bavdhan Commendation 0.50
    3 Karad Indoli Commendation 0.50
    4 Karad Kinhai Commendation 0.50
    5 Karad Wadgaon Haweli Commendation 0.50
    6 Khatav Pusegaon Commendation 0.50
    7 Karad Masur Commendation 0.50
    8 Satara Chinchaner Vandan Commendation 0.50
    9 Satara Kanher Commendation 0.50
    10 Satara Limb Commendation 0.50
    11 Karad Rethare Bk Commendation 0.50
    12 Patan Chafal Commendation 0.50
    13 Patan Marali Commendation 0.50
    14 Patan Sonawade Commendation 0.50
    15 Karad Umbraj Commendation 0.50
    16 Karad Kole Commendation 0.50
    17 Khandala Shirwal Commendation 0.50
    18 Satara Nandgaon Commendation 0.50
    SUBCENTER
    1 Karad Charegaon Winner 1.00
    2 Karad Khodshi Runner Up 1 0.50
    3 Phaltan Nimbhore Runner Up 2 0.35
    4 Patan Jinti Commendation 0.25
    5 Mahabaleshwar Chikhali – Taldeo Commendation 0.25
    6 Wai Shendurjane i Commendation 0.25
    7 Jaoli Bhanang Commendation 0.25
    8 Karad Wahagaon Commendation 0.25
    9 Satara Vennanagar Commendation 0.25
    10 Jaoli Kedambe Commendation 0.25
    11 Patan Mhavashi Commendation 0.25
    12 Phaltan Hol – Phaltan Commendation 0.25
    13 Patan Aawarde Commendation 0.25
    14 Phaltan Tardaf Commendation 0.25
    15 Mahabaleshwar Machutar Commendation 0.25
    16 Phaltan Dhaval Commendation 0.25
    17 Satara Varye Commendation 0.25
    18 Satara Dhawadshi Commendation 0.25
    19 Phaltan Nandal Commendation 0.25
    20 Mahabaleshwar Khingar Commendation 0.25
    21 Phaltan Kalaj Commendation 0.25

     

     

     

     

    pic8pic7pic6pic5pic4pic3pic2