पशुसंवर्धन विभाग

पशुवैद्यकीय दवाखान्यांची संख्या

श्रेणी - १       : ५६
फिरते पथक  : २
श्रेणी - २       : ११३
------------------------
एकूण            : १७१

पशुवैद्यकीय दवाखान्यांची संख्या

अ.क्र तालुका पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-१ पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-२
सातारा सातारा, अंगापूर, नागठाने, नुने, परळी मालगांव, शेंद्रे, फिरते पथक वडूथ, कुमठे, केडगांव, नांदगांव, कामथीठोसेघर, कोपर्डे, वडगांव, अतित, जिहे, चिचणेर, सोनवडी लिब, आरुळ, काशिळ
कराड हजारमाची, मसूर, औंड, तळबिड, शेरे उंब्रज पेडगांव, उंडाळे, मासोली, आटके, शामगांव बंलवडे ब्रु., येणके, पेर्ले, सुर्ली, इंदोली
कोरेगांव रहिमतपूर, वाघोली, खेड, वाठार स्टे.पिपरी करंजखोप, किन्हई, एकंबे, चिलेवाडी सोळशी, बोरगांव, बनवडी, वाठार किरोली चिमणगांव, आंबवडे देऊर सातारारोड
फलटण आदर्की, साखरवाडी, आसू, गिरवी गुणवरे, बरड, ढवळ, हिगणगांव, तरडगांव घाडगेवाडी, विडणी, जिती, पाडेगांव
पाटण पाटण, ढेबेवाडी, मल्हारपेठ, बहुले, तारळे गव्हाणवाडी, फिरते पथक सणबूर, चाफळ, तळमावले, धामणी, मुरुड केरळ, काडोली, हेळवाक, मोरगीरी, कारवट कुंभारगांव
खटाव पुसेगांव, का.खटाव, पुसेसावळी, मायणी औंध, चोराडे, वडगांव, खटाव, गोपूज वडूज पडळ, बुध, चितळी, निढळ, डिस्कळ, तडवळे, निमसोड, कलेढोण, सि.कुरोली
माण दहिवडी, वडजल, म्हसवड, मोहि, वावरहिरे मार्डी, पळशी, देवापूर, वरकुटे, बिजवडी, मलवडी महिमानगड, कुळकजाई
वाई बोरगांव, भुईंज, वाशिवली रेनावळे, उडतारे, उळुंब, गोपर्डी, शिगांव, बावधन, सुरुर, किकली ओझर्डे, केंजळ, पाचवड , वेलंग, कवठे, मांढरदेव
खंडाळा पारगांव, शिरवळ, लोणुद, लोहम, कोपर्डे अहिरे, पळशी, भादे
१० जावली मेढा, कुडाळ, केळघर, हुमगांव, बामणोली, मालचौंडी, , मार्ली केडांबे, गांजे, भणंग, सायगांवकरहर, काटवली
११ महाबळेश्वर पाचगणी, महाबळेश्वर मांघर, झांजवड भिलार, तळदेव, कुंभरोशी, खिगर, माचुतर चिखली मेटगुताड, गोगवे, वाघावळे
एकूण ५८ ११३

पशुसंवर्धन विभागामार्फत शेतक-यांसाठी वैयक्तिक लाभाच्या योजना

विशेष घटक योजना

अ) दोन दुधाळ जनावरांचे गट वाटप

योजनेचे उद्देश

 • जिल्हा दुध उत्पादनास चालना देणेसाठी
 • अनु.जाती व नवबौध्द लाभार्थींना स्वयंरोजगाराद्वारे उत्पन्नाचे साधन उपलब्ध करुन देणेसाठी.

योजनेचे स्वरुप

 • फक्त अनु.जाती व नवबौध्द लाभार्थींसाठी
 • दोन गाई / म्हैशींचे वाटप (प्रत्येक लाभार्थीस)
 • ७५ टक्के अनुदान विम्यासह रु.६३७९६/-

लाभार्थी निवडीचे निकष

 • दारिद्रय रेषेखालील लाभार्थी
 • अत्यल्प भुधारक शेतकरी
 • अल्प भूधारक शेतकरी
 • सुशिक्षित बेरोजगार
 • महिला बचत गटातील लाभार्थी (३०टक्के महिला लाभार्थी ), (३ टक्के अपंगासाठी )

ब) अनुसूचित जातीतील लाभार्थ्यांना १० अ १ शेळी गट वाटप-

योजनेचे उद्देश

 • अनु.जाती व नवबौध्द लाभार्थींना ग्रामीण भागात स्वयंरोजगाराद्वारे उत्पन्नाचे साधन उपलब्ध करुन देणेसाठी विषेश घटक योजने अंतर्गत १० अ १ शेळी गट वाटप करण्यात येतो.

योजनेचे स्वरुप

 • फक्त अनु.जाती व नवबौध्द लाभार्थींसाठी
 • १० अ १ शेळी गट वाटप (प्रत्येक लाभार्थीस)
 • ७५ टक्के अनुदान विम्यासह र.रु. ५३४२९/-

लाभार्थी निवडीचे निकष

 • दारिद्रय रेषेखालील लाभार्थी
 • अत्यल्प भुधारक शेतकरी
 • अल्प भूधारक शेतकरी
 • सुशिक्षित बेरोजगार
 • महिला बचत गटातील लाभार्थी (३०टक्के महिला लाभार्थी ), (३ टक्के अपंगासाठी)

क) दुभत्या जनावरांना खादय वाटप

योजनेचे उद्देश

 • दुभत्या जनावरांच्या भाकड काळात त्यांना खादय उपलब्ध करुन देणे.

योजनेचे स्वरुप

 • प्राधान्याने वरील योजनेत वाटप केलेल्या जनावरांना १०० टक्के अनुदानावर भाकड काळासाठी गाईस १५० किलो व म्हैशींस २५० किलो खादय मोफत वाटप करण्यात येतो.

जिल्हा वार्षिक योजना

अ) वैरण उत्पादनासाठी उत्तेजन

योजनेचे उद्देश

 • जिल्ह्यातील वैरण उत्पादनामधील कमतरता काही प्रमाणात भरुन काढणेसाठी व पशुपालकांकडे असलेल्या पशूधनाची उत्पादकता वाढविण्याच्या अनुषंगाने जास्तीत जास्त दुध उत्पादनासाठी पशुधनाला पुरेशी हिरवी वैरण उपलब्ध करणे.

योजनेचे स्वरुप

१०० टक्के अनुदानावर वैरणीसाठी बियाणे दिले जाते.(मका,कडवळ,बहुवार्षिक चारा पिकाची ठोंबे इ.) रु..६००/- अनुदान मर्यादेत वाटप करण्यात येते

लाभार्थी निवडीचे निकष

 • लाभार्थींकडे स्वतःची शेतजमीन व सिचनाची सुविधा असणे आवश्यक आहे.
 • ३ ते ४ जनावरे असणा-या लाभार्थींना प्राधान्य.

ब) एकात्मिक कुक्कुट विकास कार्यक्रम

योजनेचे उद्देश

 • परसातील पक्षी पालनास चालना देण्यसाठी व ग्रामीण भागामध्य अंडी यांचेद्वारे सकस आहाराची उपलब्धता होणेसाठी.

योजनेचे स्वरुप

 • ५० टक्के अनुदानावर सुधारीत जातीच्या गिरीराज एक दिवशीय प्रत्येकी १०० पिल्लांचे ८०००/- अनुदान वाटप करण्यात येते. (प्रकल्प खर्च १६०००/-)

लाभार्थी निवडीचे निकष

 • कोणत्याही गटातील एका कुटुंबातील एकच व्यक्ती लाभ घेऊ शकते.
 • दारिद्रय रेषेखालील लाभार्थी, भुमिहिन शेतमजूर,मागासवर्गीय, अल्प व अत्यल्प भुधारक लाभार्थी यांना प्राधान्य. (३० टक्के महिला लाभार्थी ), (३ टक्के अपंगासाठी)

क) कामधेनू दत्तक ग्राम योजना

योजनेचे उद्देश

 • पशुसंवर्धन विभागाच्या सर्व योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणेसाठी

योजनेचे स्वरुप

 • निवड झालेल्या दत्तक गावामध्ये पशुसंवर्धन विषयक गोचीड निर्मुलन, पशुपालक मंडळ स्थापना, वांझ तपासणी शिबीरे, लसीकरण्, खनिज मिश्रण वाटप इ. योजना वर्षभर राबविल्या जातील यासाठी रु. १५२५००/- लक्ष प्रती गाव निधी खर्च करण्यात येतो.

लाभार्थी निवडीचे निकष

 • पैदासक्षम जनावरांची संख्या किमान ३०० असावी.
 • गांव दुध संकलन केंद्राच्या मार्गावर असावे.
 • सक्रीय सहभाग मिळत असलेल्या गावांला प्राधान्य.

जिल्हा परिषद सेस योजना

अ) श्वान दंश लसीकरण १०० टक्के परतावा

योजनेचे उद्देश

 • पिसाळलेल्या श्वानांच्या दंशामुळे जनावरांचे संभाव्य मैंत्यु टाळण्याकरिता करण्यात येणा-या लसीकरणा करणेसाठी.

योजनेचे स्वरुप

शेतक-यांच्या जनावरांस कुत्रे चावल्या नंतर देण्यात येणारी ५ इंजेक्शनस्चे रु.२२५/- परत दिले जातात.

लाभार्थी निवडीचे निकष

 • लस स्थानिक औषध दुकानातून खरेदीची पावती
 • स्थानिक शासकीय पशुवैदयकाचे प्रमाणपत्र

ब) वैरण विकास बियाणे

योजनेचे उद्देश

 • जिल्यातील वैरण उत्पादनामधील कमतरता काही प्रमाणात भरुन काढणेसाठी.
 • पशुपालकांकडे असलेल्या पशूधनाची उत्पादकता वाढविण्याच्या अनुषंगाने जास्तीत जास्त दुध उत्पादनासाठी पशुधनाला पुरेशी हिरवी वैरण उपलब्ध करणेसाठी.

योजनेचे स्वरुप

 • १०० टक्के अनुदानावर वैरणीसाठी बियाणे दिले जाते.(मका,कडवळ इ.) रु..६००/- अनुदान मर्यादेत.

लाभार्थी निवडीचे निकष

 • लाभार्थींकडे स्वतःची शेतजमीन व सिचनाची सुविधा असणे आवश्यक आहे.
 • ३ ते ४ जनावरे असणा-या लाभार्थींना प्राधान्य.

क) सर्वसाधारण लाभार्थींस शेळी गट वाटप

योजनेचे उद्देश

 • जिल्ह्यातील दुध व मांस उत्पादनास चालना देणेसाठी.
 • सर्वसाधारण लाभार्थींना स्वयंरोजगाराद्वारे उत्पन्नाचे साधन उपलब्ध करुन देणेसाठी.

योजनेचे स्वरुप

 • ५० टक्के अनुदानावर ५अ१ शेळयांचा गट वाटप

लाभार्थी निवडीचे निकष

 • लाभार्थींचे वार्षिक उत्पन्न २५,०००/- चे आत असणे आवश्यक.
 • लाभार्थी शासकीय नोकरीत नसावा.
 • लाभार्थ्यांस ३ पेक्षा जास्त अपत्य नसावेत. (३० टक्के महिला लाभार्थी )

ड) २ एच.पी विद्युत कडबाकुट्टी यंत्र वाटप

योजनेचे उद्देश

 • शेतकर्‍यांकडील जनावरांसाठी उपलब्ध वैरणीची कुट्टी केल्यामुळे सुमारे ३० टक्के वैरणीची बचत होते, त्यामुळे शेतकर्‍यांचे वैरण व परिश्रमात बचत होते.

योजनेचे स्वरुप

 • ५० टक्के अनुदानावर ५ जनावरे असणार्‍या शेतकर्‍यांचे अर्ज क्षेत्रीय संस्थामार्फत प्राप्त झालेनंतर पशुसंवर्धन व दुग्धशाळा समितीमार्फत निवड केलेल्या लाभार्थ्यांना २ एच.पी विद्युत कडबाकुट्टी यंत्र वाटप करण्यात येते.

लाभार्थी निवडीचे निकष

 • लाभार्थीकडे ५ जनावरे असलेबाबत स्थानिक पशुवैद्यकीय संस्थेचा दाखला.
 • १ मे २००१ नंतर तिसरे अपत्य नसलेबाबत ग्रामसेवकाचा दाखला.
 • लाभार्थीच्या कुटूंबातील कोणतीही व्यक्ती शासकीय/ निमशासकीय नोकरीत नसलेबाबत दाखला.
eXTReMe Tracker
सातारा कराड वाई महाबळेश्वर जावली पाटण कोरेगांव खटाव फलटण खंडाळा माण