लघुपाटबंधारे विभाग

प्रस्तावना

आपल्या देशामध्ये ७० टक्के शेती ही पावसावर अवलंबून आहे. परंतु सध्या पावसाचे प्रमाण कमी झाल्याने तसेच जलसंधारणाच्या मोठया प्रकल्पांचा शेतकर्‍यांना फार उशिरा लाभ होत असल्याने सध्या लघु पाटबंधारे कामांना फार महत्व प्राप्त झाले आहे. लघु पाटबंधारे स्वरुपाची ० ते १०० हेक्टर्स मधील कामे अल्प कालावधीत पुर्ण होत असलेने त्याचा लाभ त्वरीत शेतकर्‍यांना होत असतो. यामध्ये सामान्यपणे पाझर तलाव, ग्राम तलाव, को.प.बंधारे, साठवण बंधारे, वळण बंधारे, साठवण तलाव अशी कामे केली जातात.

अशा ० ते १०० हेक्टर सिचन क्षमतेमधील लघु पाटबंधारेची कामे जिल्हा परिषदेमार्फत शासनाच्या विविध लेखाशिर्षाअंतर्गत राबविली जातात. यासाठी सातारा जिल्हा परिषदेकडै लघु पाटबंधारे विभाग असून त्या अंतर्गत ११ तालुक्यातील लघु पाटबंधारेची कामे लघु पाटबंधारे उपविभाग सातारा, खटाव, फलटण, कराड व जिल्हा परिषद निर्मित खंडाळा अशा पाच व ग्रामीण पाणी पुरवठा उप विभाग कोरेगाव व वाई या दोन उपविभागामार्फत केली जातात.

या विभागाकडून करण्यात येणार्‍या विविध कामांची माहिती

पाझर तलाव/ग्राम तलाव

पाणी पाझरण्यासाठी उपयुक्त असलेल्या भुस्तरीय स्थळावर नाला पाहून मातीचा बंधारा बांधून त्यामध्ये पावसाळयात पाणी साठवण्यात येते. अशा प्रकारे साठविलेले पाणी पाझरून तलावाच्या खालील भागातील विहीरीच्या पाण्याची पातळी वाढते. तसेच पाझर तलावाखालील भूजलाची पातळी वाढविणेस या तलावांचा उपयोग होतेा. या तलावापासून होणारे सिचन हे अप्रत्यक्ष स्वरुपाचे सिचन असते. तलावातील उपलब्ध पाण्याच्या उपयोग मत्स्यव्यवसायासाठी ही करता येतो.

कोल्हापुर पध्दतीचे बंधारे

नदी किवा नाले यातून पावसाळयात वाहून जाणारे पाणी दगडी बंाध व झडपाद्धारे (फळया टाकून) अडविले जाते. यास केाल्हापूर पंध्दतीचे बंधारे असे म्हणतात. या मधून उपसा पध्दतीने शेतकरी शेतीला पाणी देऊ शकतो. ज्या ठिकाणी को.प.बंधार्‍याचे वरील बाजूस मोठे धरण/तलाव असतो त्यामधून वरचेवर पाणी सोडून को.प.बंधार्‍यामध्ये पाणी अडवून सिचन केले जाते.

वळण बंधारे

सदरचे बंधारे हे सतत वाहत्या ओढयावर या पध्दतीने बंाधण्यात येतात की, वाहणारे पाणी झडपाद्धारेअडवून ठेवण्यात येते व पाटाद्धारे ते पाणी लाभ क्षेत्रातील शेतीस सिचनासाठी वापरण्यात येते. या बंधारेद्धारे प्रत्यक्ष सिचन केले जाते व सदरचे बंधारे हे जेथे पावसाचे प्रमाण जास्त प्रमाणात आहेत त्या ठिकाणीच बांधण्यात येतात.

या विभागाकडील विविध लेखाशिर्षाखालील माहिती

जिल्हा वार्षिक योजना

सन २०१४-१५ या आर्थिक वर्षामध्ये ५ ल.पा.सामान्य कामे व ५ ल.पा. को.प.बंधारे या लेखाशिर्षा अंतर्गत या विभागाकडे एकुण २०९ कामे होती. त्यापैकी ८४ कामे पुर्ण झालेली असून उर्वरीत १२५ कामे प्रगतीपथावर आहेत व दोन्ही लेखाशिर्षाखाली रक्कम रुपये १२३७.२६ लक्ष ऐवढे अनुदान खर्च करण्यात आलेला आहे पुर्ण झालेल्या कामा मध्ये ४० साठवण बंधारे,२४ साठवण तलाव, १ पाझर तलाव व ९ वळण बंधारे व १० ग्राम तलाव या कामांचा समावेश असून अंदाजे १६८० हेक्टर्स सिचन क्षमता निर्माण झालेली आहे

मा.मुख्यमंत्री सहा.निधी

मा.जिल्हाधिकारी, सातारा यांना लघुपाटबंधारे विभागाने जिल्हयामधील बंधारे दुरूस्तीचा एकूण रक्कम रू.२५६६.५८ लक्ष रक्कमेचा आराखडा जून २०१३ मध्ये सादर केला होता. त्यापैकी मुख्यमंत्री सहाय्यता.निधीतून लघुपाटबंधारे विभाग जिल्हा परिषद सातारा या विभागास दि. २८.२.२०१४ रोजी को.प.बंधारे/वळण बंधारे दुरूस्ती करणेकामी रक्कम रूपये २००.०० लक्ष अनुदान प्राप्त झाले आहे. सदर निधीतून दुरूस्तीची एकूण ३७ कामे घेणेत आलेली आहेत. सदर कामामधील सध्या ३५ कामे पूर्ण असून २ कामे प्रगती पथावर आहेत या योजनेतून खुले दरवाजे बंद करुन पाणी अडविण्यात येत असलेने ९२.५० हेक्टर्स सिचन क्षमता निर्माण झालेली आहे

तसेच सन २०१४-१५ या आर्थिक वर्षामध्ये दुस-या टप्प्यामध्ये मा. मुख्यमंत्री सहाय्यता निधिमधून को.प.बंधारे दुरूस्ती करणेकांमी मा. प्रधान सचिव, मा.मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालयांस दि. १५.५.२०१४ अन्वये एकूण ३१ कामांकरीता रक्कम रूपये १७०.०० लक्ष उपलब्ध झाले आहेत. त्यामध्ये एकूण ३१ कामे प्रस्तावित केली होती. त्यांपैकी ३१ कामांना प्रशासकीय मान्यता मिळालेली आहेत. ३१ कामांचे कार्यारंभ आदेश देणेत आलेल असून सदर कामामधील सध्या ११ कामे पूर्ण असून २० कामे प्रगती पथावर आहेत. सदर याजनेतील पुर्ण झालेल्या कामांमुळे सिचनात ७७.५० हेक्टर्स सिचन क्षमता निर्माण झालेली आहे

तसेच सन २०१४-१५ या आर्थिक वर्षामध्ये तिसर्‍या टप्प्यामध्ये मा.मुख्यमंत्री सहाय्यता निधिमधून को.प.बंधारे दुरूस्ती करणेकामी मा.प्रधान सचिव, मा.मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालयास कडून एकूण २० कामाकरीता रक्कम रूपये १२०.०० लक्ष निधी उपलब्ध झाला आहे. सदर २० कामांना प्रशासकीय मान्यता मिळालेली असून १८ कामांचे कार्यारंभ आदेश देणेत आलेले आहेत व दोन कामांच्या ई-निविदा चालु आहे. सदर कामामधील सध्या ३ कामे पूर्ण असून १५ कामे प्रगतीपथावर आहेत सदर योजनेममुळे ५५.०० हेक्टर्स सिचन क्षमता निर्माण झालेली आहे

ल.पा. जिल्हा परिषद, सेस देखभाल व दुरुस्ती

या योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेमार्फत या विभागास निधी प्राप्त होतेा. व प्राप्त निधीतून मा. जिल्हा परिषद सदस्य यांनी शिफारस केलेल्या जिल्हयातील साठवण बंधारे/वळण बंधारे/ग्राम तलाव/पाझर तलाव यांची दुरुस्ती केली जाते.

सन २०१४-१५ या आर्थिक वर्षासाठी या विभागास या लेखााशर्षाखाली रुपये २००.०० लक्ष निधी प्राप्त झाला असून सदर निधीतून २३ कामांची निवड केलेली आहे. व निवड केलेल्या कामांपैकी २३ कामांचे कार्यारंभ आदेश देण्यात आलेले आहे व त्यापैकी १३ कामे पुर्ण झाले असून उर्वरीत कामे प्रगतीपथावर आहे.

महात्मा जोतिबा फुले जल व भूमी संधारण अभियान

या योजने अंतर्गत अनुदान हे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सातारा यांचेमार्फत या विभागास प्राप्त होते व सदर अनुदानातून जिल्हयातील साठवण बंधारे/वळण बंधारे/ग्राम तलाव/पाझर तलाव यांची दुरुस्ती केली जाते सदर कामांना प्रशासकीय मान्यता ही मा. जिल्हाधिकारी यांचेमार्फत दिली जाते.

सन २०१४-१५ या आर्थिक वर्षासाठी या विभागास रु. ६.७८ लक्ष एवढे अनुदान प्राप्त झाले असून या अनुदानातून वाई तालक्यातील जांब या गावातील पाझर तलावांची दुरुस्ती हाती घेण्यात आलेली आहे.

गाळ काढणे

जिल्हा वार्षिक योनजेअंतर्गत जिल्हा नियोजन समिती मार्फत अनुदान या विभागास प्राप्त होते. सदर अनुदानातून दुष्काळी तालुक्यातील प्रामुख्याने कोरेगांव, खटाव व माण तालुक्यातील गावामधील साठवण बंधारे/वळण बंधारे/ग्राम तलाव/पाझर तलावामध्ये साठलेला गाळ काढणेसाठी वापरण्यात येणाृया वाहनांच्या इंधनावर होणारा खर्च अदा करणेसाठी अनुदाना खर्च करण्यात येते. सदर योजने अंतर्गत रक्कम रुपये ५० लक्ष एवढे अनुदान प्राप्त झाले असून त्यामधून गट विकास अधिकारी पंचायत समिती कोरेगांव यांना ८.०० लक्ष, गट विकास अधिकारी पंचायत समिती खटाव यांना २०.०० लक्ष व गट विकास अधिकारी पंचायत समिती माण यांना २२.०० लक्ष अनुदान वितरीत केलेले आहे.

जलयुक्त शिवार

सन २०१४-१५ या आर्थिक वर्षामध्ये जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत निवडण्यात आलेल्या २१५ गांवापैकी या विभागाकडे विविध लेखाशिर्षाअंतर्गत ४५ गावामध्ये एकुण ५४ कामे हाती घेण्यात आलेले आहेत व रक्कम रुपये २४४.४७ लक्ष एवढे अनुदान खर्च झालेला आहे.

जलव्यवस्थापन व स्वच्छता समिती

शासनाच्या आदेशान्वये जिल्हा परिषदस्तरावर मा. अध्यक्ष, जिल्हा परिषद सातारा यांचे अध्यक्षतेखाली जलव्यवस्थापन व स्वच्छता समिती स्थापन केली असून सदर समितीमध्ये मा. उपाध्यक्ष जि.प.सातारा, मा. सभापती, शिक्षण व अर्थ समिती, जि.प.सातारा, मा. सभापती, शेती व पश्ुसवर्धन, जि.प.सातारा व सभापती, महिला व बालकल्याण समिती, व सभापती, समाजकल्याण समिती हे पदसिध्द सदस्य असतात व अन्य आठ जिल्हा परिषद,सदस्य हे सभासद आहेत. त्याच प्रमाणे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.सातारा. कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे विभाग जि.प.सातारा, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जि.प.सातारा व उप मुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत विभाग हे देखिल या समितीचे सदस्य आहेत. मा. अति.मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.सातारा हे या समितीचे सदस्य सचिव आहेत.

जलव्यवस्थापन व स्वच्छता समिती

मा. श्री. माणिकराव विठठल सोनवलकर,
अध्यक्ष जि प सातारा
अध्यक्ष
मा. श्री. प्रदिप उर्फ रवि सुर्यकांत साळूंखे,
उपाध्यक्ष जि प सातारा
पदसिध्द सदस्य
मा. श्री. अमित गेणूजी कदम,
सभापती, शिक्षण व अर्थ समिती जि प सातारा
पदसिध्द सदस्य
मा. श्री. शिवाजी तुकाराम शि शिदे,
सभापती, कृषी व पशुसंवर्धन समिती
पदसिध्द सदस्य
मा. श्री. मानसिग भिकू माळवे,
सभापती, समाजकल्याण समिती
पदसिध्द सदस्य
मा. सौ. कल्पना नानासो मोरे,
सभापती, महिला व बाल कल्याण समिती
पदसिध्द सदस्य
मा. श्री. प्रल्हाद मारुती भिलारे, सदस्य
मा. श्री. राजू अनिल भोसले सदस्य
मा सौ. मंदाकिनी हिदूराव पाटील सदस्या
मा. श्रीमती वंदना अविनाश धायगुडे- पाटील सदस्या
मा. सौ. स्मिता प्रशांत वायदंडे सदस्या
मा. सौ.वैशाली सतीश फडतरे सदस्या
मा. श्री.दिलीप ज्ञानदेव बाबर निमंत्रित सदस्य
मा. श्री. विश्वास दत्तात्रय गावडे निमंत्रित सदस्य
मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि प सातारा पदसिध्द सदस्य
मा. अति मुख्य कार्यकारी अधिकारी, जि प सातारा पदसिध्द सदस्य सचिव
मा. उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राप), जि प सातारा पदसिध्द सदस्य
मा. कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पूरवठा विभाग, जि प सातारा पदसिध्द सदस्य
मा. कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे विभाग जि प सातारा पदसिध्द सदस्य
सातारा कराड वाई महाबळेश्वर जावली पाटण कोरेगांव खटाव फलटण खंडाळा माण