कृषी विभागविविध कृषि पुरस्कार प्राप्त शेतकर्‍यांची यादी

शेतकर्‍यांसाठी वैयक्तिक लाभाच्या योजना

१) राष्ट्रीय बायोगॅस व खत व्यवस्थापन कार्यक्रम

सदरची योजना केंद्र शासनाच्या अनुदाना मधून सन १९८२ पासून राबविली जात आहे. केंद्र शासनाच्या नविन व नवीकरणीय ऊर्जा विभागाचे मंत्रालयाचे दिनांक ३० जून २०१४ चे प्रशासकीय मंजूरी नुसार सदरची योजना १२ व्या पंचावार्षिक योजनेच्या उर्वरीत कालावधीसाठी सुधारीत अनुदान दराप्रमाणे राबविण्यात येत आहे.?

योजनेचा उद्येश

 • स्वयंपाकासाठी बायोगॅस पुरविणे.
 • एलपीजी व इतर पारंपारीक उर्जा साधनांचा वापर कमी करणे.
 • एकात्मिक उर्जा धोरणात नमूद केल्यानूसार स्वयंपाकासाठी आवश्यक उर्जा मिळविणे.
 • रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रीय खतांचा वापर करण्यास लाभार्थींना प्रवृत्त करणे.
 • ग्रामीण भागातील स्त्रीयांचे जीनवमान सुधारणे व त्यांना होणारा त्रास कमी करणे.
 • बायोगॅस सयंत्रास शौचालय जोडून ग्रामीण भागातील स्वच्छता राखण्यास मदत करणे.??

अटी व शर्ती

 • लाभार्थींकडे पुरेशा प्रमाणात जनावरे उपलब्ध असणे आवश्यक आहे.
 • बायोगॅस सयंत्र उभारणीसाठी लाभार्थीकडे स्वतःच्या मालकीची जागा असणे आवश्यक आहे.
 • शेतमजूर असल्यास ग्रामसेवकाचा दाखला घेणे बंधनकारक राहील.
 • शासनाने मान्यता दिलेल्या मॉडेलच्या सयंत्राची उभारणी करणे बंधनकारक आहे.

अनुदानाचा दर

दि.८ मे २०१४ नंतर उभारणी होणार्‍या सयंत्रासाठी केंद्र शासनाचे अनुदानाचे दर खालील प्रमाणे.

अनुदानाचा दर

लाभधारकाने सादर करावयाची कागदपत्रे

 • शेतजमिनीचा खाते उतारा
 • शेतमजुर असल्यास त्याबाबत ग्रामसेवकाचा दाखला
 • बायोगॅस सयंत्र पुर्णत्वाचा दाखला
 • यापुर्वी बायोगॅस सयंत्रासाठी लाभार्थीचे स्वतःचे नांवे अथवा घरातील इतर कोणत्याही व्यक्तीच्या नांवे शासकीय अनुदान घेतले नसल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र.
 • सयंत्र कार्यान्वित ठेवणेसाठी आवश्यक प्रमाणात दैनंदीन शेण-पाण्याचा वापर करणेचे लाभार्थीचे प्रतिज्ञापत्र.?
 • पंचायत समिती कडील अनुदान मिळणेबाबतचा विहीत नमुन्यातील प्रस्ताव
 • सयंत्र कार्यान्वित झाले नंतर सयंत्रासहीत लाभधारकाचा फोटोग्राफ?

संपर्क

योजने अंतर्गत बायोगॅस सयंत्र उभारणी करण्यास इच्छूक लाभार्थींनी ग्रामसेवक अथवा आपले तालुक्याच्या पंचायत समिती कार्यालयाचे गट विकास अधिकारी/सहायक गट विकास अधिकारी अथवा कृषि अधिकारी/विस्तार अधिकारी(कृषि) यांचेशी संफ साधावा.?

२) राज्य पुरस्कृत फलोत्पादन पिक संरक्षण योजना

उद्देश

सदरची योजना १०० राज्य पुरस्कृत असून सातारा जिल्हयास या योजनेमधून बटाटा पिकावरील करपा रोगाचे नियंत्रणासाठी ५० टक्के अनुदानावर कॉपर ऑक्झिक्लोराईड या बुरशीनाशकाचे शेतकर्‍यांना वाटापाची बाब मंजूर आहे.सदर बुरशीनाशकासाठी संबंधित पंचायत समितीचे गट विकास अधिकारी अथवा कृषि अधिकारी यांचेशी संफ साधावा.

३) अनु.जाती व नवबौध्द शेतकर्‍यांना दारीद्रय रेषेचे वर आणणेसाठी अर्थसहाय्य देणेची योजना

उद्येश

अनु.जाती व नवबौध्द शेतकर्‍यांच्या शेतीमध्ये सुधारणा करून त्यांना मिळणार्‍या शेती उत्पन्नात वाढ करणे सदर वर्गवारीतील शेतकर्‍यांचा अर्थिक व सामाजिक स्तर उंचावणे.

योजनेच्या अटी व शर्ती

 • लाभार्थी शेतकर्‍याजवळ त्याचे स्वःताचे नांवे ६ हेक्टर किवा त्यापेक्षा कमी शेतजमिन आसावी.
 • लाभार्थी हा अनु.जाती किवा नवबौध्द जातीचा असावा.
 • संबंधित लाभार्थीचे सर्व मार्गाने मिळणारे वार्षिक उत्पन्न रूपये ५०,०००/- चे आंत असावे.
 • शेतकरी स्वतः शेती विकासाची कामे हाती घेण्यास उत्सूक असावा.
 • वैयक्तीक लाभार्थी निवडताना महीलांना प्राधान्य राहील.
 • राज्य शासनाच्या समाजकल्याण कार्यालयाकडून पॉवर टिलरचा लाभ घेतलेल्या अगर त्यासाठी निवड केलेल्या लाभार्थीस लाभ दिल्यापासून पुढील ३ वर्षे सदर योजनेचा लाभ घेता येणार नाही.

अनुदानाच्या बाबी

 • जमिन सुधारणा,निविष्ठा,अवजारे,इनवेल बोअर,पंपसंच,पाईपलाईन,जुनी विहीर दुरूस्ती,नवीन विहीर,बैलजोडी, रेडेजोडी,बैलगाडी,शेततळे,तुषार/ठिबक सिचन संच, ताडपत्री तसेच परसबाग इत्यादी बाबींसाठी अनुदान देय आहे.
 • वरील बाबींपैकी जे लाभार्थी नवीन विहीर या घटकाचा लाभ घेणार आहेत अशा लाभार्थींना जास्तीत जास्त रू.१,००,०००/- कमाल मर्यादेपर्यंत तर नवीन विहीर या घटकाचा लाभ घेणार नाहीत अशा लाभार्थींना रक्कम रू.५०,०००/- कमाल मर्यादेपर्यंत वरील पैकी केवळ एका घटकांसाठी अनुदान देय आहे.
 • जे लाभार्थी नवीन विहीर या घटकाचा लाभ घेणार आहेत त्यांना इतर बाबींचा देय राहणार नाही.
 • सदर योजनेंतर्गत निवड झालेपासून दोन अर्थिक वर्षापर्यंत लाभ देय राहील.

योजने अंतर्गत मंजूर बाबी व कमाल अनुदान मर्यादा :-

योजने अंतर्गत मंजूर बाबी व कमाल अनुदान मर्यादा

४) गुण नियंत्रण योजना

उद्येश

शेतकर्‍यांना दर्जेदार व गुणवत्तायुक्त कृषि निविष्ठांची उपलब्धता करून देणे,कृषि निविष्ठा विक्री केंद्रास,भाजीपाला रोपवाटीका तसेच हाऊस होल्ड पेस्ट कंट्रोल साठी किटकनाशके विक्री परवाना देणेसाठी कृषि विकास अधिकारी,जिल्हा परिषद यांना परवानादाता अधिकारी घोषित केलेले आहे. कृषि निविष्ठांची गुणवत्ता व दर्जा तपासणे,भेसळीला आळा घालणे,शेतकर्‍यांची खते/बियाणे/किटकनाशके यांचे बाबत फसवणूक होऊ नये तसेच कृषि निविष्ठांचा काळाबाजार होऊ नये यासाठी जिल्हयात राज्य शासनाचा कृषि विभाग व जिल्हा परिषदेचा कृषि विभाग या यंत्रणेच्या अधिनस्त जिल्हा,उपविभाग व तालुका स्तरावर गुणनियंत्रण निरीक्षक कार्यरत आहेत. खालील अधिकारी यांना गुणनियंत्रण कामकाजासाठी गुणनियंत्रण निरीक्षक म्हणून घोषित केलेले आहे.

गुण नियंत्रण योजना

खते, बियाणे व किटकनाशक परवाना बाबतची - चेकलिस्ट

 • Online Application Form.(www.mahaagriiqc.gov.in) (खत नविन व नुतनीकरणासाठी फॉर्म-A1, बियाणे नविनसाठी-फॉर्म A व नुतनीकरणासाठी-फॉर्म C किटकनाशक नविनसाठी-फॉर्म VI व नुतनीकरणासाठी-फॉर्म VII) पुर्ण भरलेला.
 • परवाना फी चलन (www.gras.mahakosh.gov.in/echallan).
 • वजन काटा पावती.
 • शेती अधिकारी यांचा जागा पाहणी दाखला (FORMA –IV) मध्ये आवश्यक.
 • वस्तुअधिनियमाखाली शिक्षा झाली नाही याबाबतचा दाखला.
 • जागेचा नकाशा (नकाशामध्ये गावातील शाळा, मंदिर, ग्रामपंचायत, इत्यादी महत्वाचे ठिकाणापैकी एका ठिकाण त्यामध्ये दिसावे.)
 • ग्रामपंचायत/नगरपालीका नाहरकत प्रमाणपत्र (सरपंच व प्रशासकीय अधिकारी यांच्या दोघांचाही स्वाक्षरीसह)
 • जागेचा उतारा ग्रामीण भागासाठी ग्रामपंचायत नमुना नंबर ८ व शहरी भागासाठी नगरपालीका उतारा अ जोडून दयावा.
 • जागा भाडयाची असल्यास मुळ मालकाचे १००/- च्या स्टॅप पेपरवर लेखी आवश्यक (तहसीलदारासमोर केलेले अफीडेटिव/नोटरी आवश्यक)
 • उगमप्रमाणपत्र दिनांक, डीलरचे नाव, परवाना नंबर व अंतीम मुदत, परवानाधारकाची स्वाक्षरी, व मुदतीत असलेली.
 • सहकारी संस्था असलेस संस्थेचा ठराव व सहाय्यक निबंधक यांचे शिफारस पत्र.
 • परवानाधारकाचे पॅनकार्ड/आधारकार्ड ची झेरॉक्स प्रत.
 • नविन परवाना असल्यास परवाना धारकाचे १००/- च्या स्टँप पेपरवर हमीपत्र आवश्यक.
 • परवाना नुतनीकरण असल्यास या कार्यालयामार्फत देण्यात आलेल्या परवान्याची झेरॉक्स प्रत.
 • खत व बियाणे परवाना नुतनीकरणासाठी मागील ३ वर्षाची व किटकनाशकासाठी मागील २ वर्षाची उलाढाल आवश्यक.
 • किटकनाशके व खत उत्पादन,विक्री साठवणुक प्रदर्शन यासाठी परवानाघेण्यासाठी केंद्रशासनाने दि. ०५/११/२०१५ मध्ये आवश्यक शैक्षणिक अर्हता निश्चित केली असून बंधनकारक राहिल. त्याचा गोषवारा खालीलप्रमाणे..

किटकनाशके व खत उत्पादन, विक्री, साठवणूक, प्रदर्शन साठी परवाना घेण्यासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता

किटकनाशके व खत उत्पादन, विक्री, साठवणूक, प्रदर्शन साठी परवाना घेण्यासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता

कृषि निविष्ठा परवाना फी व मुदत नविन व नुतनीकरणासाठी

कृषि निविष्ठा परवाना फी व मुदत नविन व नुतनीकरणासाठी

कृषि निविष्ठा गुणवत्तेच्या तक्रारी बाबत

 • बियाणे/खते/किटकनाशके तालुका स्तरीय तक्रार निवारण समितीची रचाना बियाणे

  बियाणे/खते/किटकनाशके तालुका स्तरीय तक्रार निवारण समितीची रचाना

 • तक्रारी नंतर करावयाची कार्यवाही
  • शेतक-यांची तक्रार तालुका कृषि अधिकारी यांचेकडे करावी. व अशी तक्रार प्राप्त होताच तसे उप विभागीय कृषि अधिकारी यांना तात्काळ कळवावे.
  • उ. वि. कृ. अ. यांनी ७ दिवसांचे आंत क्षेत्रीय भेट आयोजीत करावी.
  • अशा भेटीकरीता कंपनी प्रतिनिधी व विक्रेता यांना लेखी पत्राने उपस्थित राहणे बाबत कळवावे.
  • शेतक-यांकडे खरेदीच्या पावत्या आहेत अशी खात्री करून विहीत प्रपत्रात पंचनामा करावा. व त्याती प्रत कंपनी प्रतिनिधी व विक्रेत्याला देण्यात यावी.
  • तपासणी वेळी कंपनी प्रतिनिधी व तक्रारदार शेतक-याची साक्ष घणे बंधनकारक असते.
  • तक्रार असलेल्या बियाणे लॉटचा नमुना घेऊन तो अधिसुचित प्रयोगशाळेतुन तपासुन घ्यावा.

टिप - सातारा जिल्हातील खते, बियाणे व किटकनाशक परवानाधारकाची माहिती https://mahaagriiqc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

५ ) पिकस्पर्धा

उद्येश

कृषि उत्पादन करताना शेतकर्‍यांमध्ये जास्तीत जास्त चुरस निर्माण होऊन कृषि उत्पादनात वाढ करणेसाठी सन १९५९-६० पासून राज्यात पिकस्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे.

योजनेमध्ये सहभागासाठी अटी व शर्ती

 • शेतकर्‍याचे स्वतःचे नांवे शेतजमिन आवश्यक व सदरची शेतजमिन स्वतः कसत असणे आवश्यक.
 • कोणत्याही पातळीवरील स्पर्धेमध्ये ज्या स्पर्धकास भाग घेऊन बक्षिस मिळालेले नसेल अथवा ज्यांनी स्पर्धेतून रीतसर माघार असेल तर त्यांना पुन्हा त्याच पातळीवर त्याच हंगामासाठी त्याच पिकासाठी बक्षिस मिळेपर्यंत भाग घेता येतो.
 • ज्या स्पर्धकाने स्पर्धेत २ रा किवा ३ रा क्रमांकाने बक्षिस मिळविले असेल अशा स्पर्धकास पुन्हा त्याच पिकाचे स्पर्धेसाठी रीतसर भाग घेता येईल.
 • सतत दोन वर्षे पुरेशा प्रमाणात अर्ज प्राप्त न झाल्यास स्पर्धा होऊ न शकल्यास अशावेळी स्पर्धेसाठी अर्ज करून सहभाग घेतलेल्या स्पर्धकास ती पातळी वगळून त्यापुढील पातळीवरील स्पर्धेसाठी सहभाग घेऊ शकेल.
 • एकाच वेळी एकाच पिकासाठी दोन वेगवेळया पातळीवरील स्पर्धेमध्ये भाग घेता येणार नाही.
 • स्पर्धकाचे वारसदारास स्पर्धेसाठी आवश्यक असणारी पात्रता ही वारसा हक्काने प्राप्त होऊ शकणार नाही.
 • स्पर्धा पुर्ण होणेसाठी त्या स्पर्धेमधील किमान ६ स्पर्धकांच्या पिकांची कापणी होणे आवश्यक आहे.

पिक स्पर्धसाठी प्रवेश शुल्क

 पिक स्पर्धसाठी प्रवेश शुल्क

विविध पातळीवरील बक्षिसाची रक्कम

विविध पातळीवरील बक्षिसाची रक्कम

निरनिराळया पातळीवरील पिक स्पर्धा आयोजन व परीक्षण समिती रचना

अ ) पंचायत समिती पातळी

 पंचायत समिती पातळी

ब) जिल्हा परिषद पातळी

 जिल्हा परिषद पातळी

क) राज्य पातळी

राज्य पातळी

६ ) कृषि पुरस्कार

उद्येश

शेती मध्ये उल्लेखनिय काम करणार्‍या शेतकर्‍यांना बहूमान मिळावा या उद्देशाने शासनामार्फत डॉ.पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार,वसंतराव नाईक कृषि भूषण पुरस्कार, कृषिभूषण सेंद्रीय शेती पुरस्कार,वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार, उद्यान पंडीत पुरस्कार तसेच महीला शेतकर्‍यांना जिजामाता कृषिभूषण पुरस्कार व कृषि क्षेत्रातील पत्रकारीतेकरीता वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार इत्यादी पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

कृषि पुरस्काराचे प्रकार :-

१) वसंतराव नाईक कृषि भूषण पुरस्कार

२) वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार

३) वसंतराव नाईक कृषि मित्र पुरस्कार

४) जिजामाता कृषि भूषण पुरस्कार

५) डॉ.पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार

६) डॉ.जे.के.बसू सेंद्रीय शेती पुरस्कार

वसंतराव नाईक कृषि भूषण पुरस्कार परीक्षण व निरीक्षण समिती खालील प्रमाणे

जिल्हास्तर समिती

वसंतराव नाईक कृषि भूषण पुरस्कार परीक्षण व निरीक्षण समिती

विभागस्तर समिती

वसंतराव नाईक कृषि भूषण पुरस्कार परीक्षण व निरीक्षण समिती

आयुक्तलय स्तर समिती

वसंतराव नाईक कृषि भूषण पुरस्कार परीक्षण व निरीक्षण समिती

निकष

१) कृषि क्षेत्रात संघटनात्मक कार्यकरणा-या व्यक्तीला किवा गटाला किवा संस्थेला पुरस्कार देणेत प्रास्तावीत करण्यात यावे.प्रास्तावीत गटाने किवा संस्थेने केलेले कार्य संपूर्ण राज्याला दिशादर्शक असावे.

२) प्रपत्रामध्ये माहिती देताना संबंधित शेतक-यांचे ई-मेल, वेबसाईट इत्यादी बाबींचा समावेश करुन त्याचे कार्य व कार्यक्षेत्र हा मुद्दा विचारात घेणेत यावा.

३) प्रपत्रामध्ये माहिती देताना शेतक-यांचा आधारकार्ड नंबर व बँकेचा खाते क्रमांक यांसह त्यांची पाश्वभूमी, शिक्षण केलेले कार्य त्यामुळे इतर शेतक-यांना झालेला फायदा या तपशिलासह सबंधितांनी शासन/कृषि क्षेत्रात सहभाग असणे आवश्यक आहे.

४) शासकीय किवा शासन अंगीकृत व सहकार संस्था(उदा.स्थानिक स्वराज्य संस्था, कृषि विद्यापिठे) यांच्या आस्थापनेवर काम करणारे किवा सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी पुरस्कारासाठी पात्र असणार नाही. तसेच केंदशासनाकडन किवा राज्य शासनाकडून किवा अंगीकृत संस्थेकडून कोणत्याही प्रकारचे नियमित मानधन घेणारी संस्था किवा व्यक्ती पुरस्कारासाठी पात्र असणार नाही.

५) सबंधिताने पूर्वी घेतलेल्या पुरस्काराचा तपशील, तसेच कृषि विभागाकडून किवा इतर विभागाकडून मिळालेल्या पुरस्काराचा तपशील प्रमाणपत्रासह सादर करणे आवश्यक आहे.

६) सबंधितानी जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या स्वाक्षरीचा चारित्र्याचा दाखला मूळ प्रतीत सादर करणे आवश्यक आहे.

७) जिल्हास्तरीय समितीने प्रत्यक्ष कार्यक्षेत्रास भेट देवून संबंधिताने केलेल्या कार्याची खात्री करुन प्रस्ताव निकषाप्रमाणे योग्य असल्यासच प्रपत्रामध्ये शिफारशीसह अभिप्राय द्यावेत. यामध्ये सबंधित शेतक-यांनी कृषि विकास, विस्तार, सामुहिक कृषिपणन व्यवस्थापनासाठी प्रयत्न केले आहेत काय. याबाबत सविस्तर अभिप्राय असणे आवश्यक आहे.

८) वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त शेतक-याबाबतच कृषि भूषण पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करावा.

९) शासनाकडून दिल्या जाणा-या दोन पुरस्कारामधील अंतर किमान ५ वर्षा इतके असावे.

१०) सबंधिताकडून ते शासन किवा शासनअंगीकृत संस्थेमध्ये नोकरी करत नसलेबाबत रु. १००/- च्या स्टॅम्पवर प्रतिज्ञापत्र घेणेत यावे.

वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार परीक्षण व निरीक्षण समिती खालील प्रमाणे :

तालुकास्तरीय समिती

वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार परीक्षण व निरीक्षण समिती

जिल्हास्तरीय निवड समिती

वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार परीक्षण व निरीक्षण समिती

विभागीय स्तरावरील समिती

वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार परीक्षण व निरीक्षण समिती

निकष

१) प्रस्तावासोबत सर्व कागदपत्रे जसे ७/१२, उतारा,जिल्हा पोलीस, अधिक्षक यांचेकडुन चारित्र्य निर्दोष दाखल्याची मुळप्रत इत्यादी सर्व कागदपत्रे असणे आवश्यक आहे. अन्यथा प्रस्ताव विचारात घेतला जाणार नाही. याची सर्वस्वी जबाबदारी जिल्हास्तरीय समितीची राहील.

२) एकापेक्षा जास्तवेळा शेतीनिष्ठ म्हणून शेतक-याची निवड केली जाणार नाही याची खात्री करुन घ्यावी. तसेच सदर शेतकरी एखादया संस्थेकडुन अगर शासनाकडून मानधन किवा निवृत्ती वेतन घेत नाही याची खात्री करुन तसे अभिप्राय दयावेत.

३) दोन्ही गटाचे बाबतीत ५ किवा त्याहून जास्त सालदार ठेवलेल्या शेतक-यांची शिफारस करु नये.

४) प्रत्येक गटास ज्या तीन शेतक-यांचा प्रस्ताव पाठविला जाईल त्या शेतक-यांचे तीन पासपोर्ट साईज तीन छाया चित्रे टाचणी न लावता पाकीटात घालुन छायाचित्राच्या मागे सुवाच्छ अक्षरात नाव, गाव, तालुका, जिल्हा व गटाचा (सर्वसाधारण/अदिवासी)उल्लेख करुन पाठवावेत.

५) प्रस्तावित शेतक-यांचे संपुर्ण नाव पत्ता प्रस्तावामध्ये प्रथम दर्शनी सुवाच्छ अक्षरात लिहावा. प्रस्तावात अचुक/संपुर्ण नाव न लिहले गेल्यास सन्मानपत्र,परिचयपुस्तिका ,ओळखपत्र यामध्ये चुकीचे नाव लिहले जाऊ शकेल. ही बाब कृपया लक्षात घ्यावी.

६) पहिल्या तीन क्रमांकाच्या परिचय लेख (थोडक्यात)स्वतंत्रपणे तयार करुन स्वताः पाठवावेत.त्या शेतक-यांनी केलेली पीकविषयक कामगिरी,जमिन सुधारणा, सुधारीत बियाणे,किटकनाशके यांचा वापर जोडधंदा, कंपोस्ट व रासायनिक खताचा वापर/गोबर गॅस प्लॅन्ट तसेच त्यांनी मागील तीन वर्षा मध्ये काढलेले पिकनिहाय हेक्टरी उत्पादन झालेला फायदा इ. मुद्याचा समावेश असावा.

७) शासनाकडून दिल्या जाणा-या दोन पुरस्कारामधील अंतर किमान ५ वर्षा इतके असावे.

वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार परीक्षण व निरीक्षण समिती खालील प्रमाणे

जिल्हास्तर समिती

वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार परीक्षण व निरीक्षण समिती

विभागस्तर समिती

वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार परीक्षण व निरीक्षण समिती

आयुक्तालयस्तर समिती

वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार परीक्षण व निरीक्षण समिती

निकष

१) कृषि क्षेत्रात संघटनात्मक कार्यकरणा-या व्यक्तीला किवा गटाला किवा संस्थेला पुरस्कार देणेत प्रास्तावीत करण्यात यावे.प्रास्तावीत गटाने किवा संस्थेने केलेले कार्यसंपूर्णराज्याला दिशादर्शक असावे.

२) प्रपत्रामध्ये माहिती देताना संबंधित शेतक-यांचे ई-मेल, वेबसाईट इत्यादी बाबींचा समावेश करुन त्याचे कार्य व कार्यक्षेत्र हा मुद्दा विचारात घेणेत यावा.

३) प्रपत्रामध्ये माहिती देताना शेतक-यांचा आधारकार्ड नंबर व बँकेचा खाते क्रमांक यांसह त्यांची पाश्वभूमी, शिक्षण केलेले कार्य त्यामुळे इतर शेतक-यांना झालेला फायदा या तपशिलासह सबंधितांनी शासन / कृषि क्षेत्रात सहभाग असणे आवश्यक आहे.

४) शासकीय किवा शासन अंगीकृत व सहकार संस्था (उदा.स्थानिक स्वराज्य संस्था, कृषि विद्यापिठे) यांच्या आस्थापनेवर काम करणारे किवा सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी पुरस्कारासाठी पात्र असणार नाही. तसेच केंदशासनाकडन किवा राज्य शासनाकडून किवा अंगीकृत संस्थेकडून कोणत्याही प्रकारचे नियमित मानधन घेणारी संस्था किवा व्यक्ती पुरस्कारासाठी पात्र असणार नाही.

५) सबंधिताने पूर्वी घेतलेल्या पुरस्काराचा तपशील, तसेच कृषि विभागाकडून किवा इतर विभागाकडून मिळालेल्या पुरस्काराचा तपशील प्रमाणपत्रासह सादर करणे आवश्यक आहे.

६) सबंधितानी जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या स्वाक्षरीचा चारित्र्याचा दाखला मूळ प्रतीत सादर करणे आवश्यक आहे.

जिजामाता कृषिभूषण पुरस्कारासाठी परीक्षण व निरीक्षण समिती खालील प्रमाणेः-

जिल्हास्तर समिती

जिजामाता कृषिभूषण पुरस्कारासाठी परीक्षण व निरीक्षण समिती

आयुक्तालयस्तर समिती

जिजामाता कृषिभूषण पुरस्कारासाठी परीक्षण व निरीक्षण समिती

विभागीय स्तरावरील समिती

जिजामाता कृषिभूषण पुरस्कारासाठी परीक्षण व निरीक्षण समिती

निकष

१) कृषि क्षेत्रात संघटनात्मक कार्यकरणा-या व्यक्तीला किवा गटाला किवा संस्थेला पुरस्कार देणेत प्रास्तावीत करण्यात यावे. प्रास्तावीत गटाने किवा संस्थेने केलेले कार्य संपूर्ण राज्याला दिशादर्शक असावे.

२) प्रपत्रामध्ये माहिती देताना संबंधित शेतक-यांचे ई-मेल, वेबसाईट इत्यादी बाबींचा समावेश करुन त्याचे कार्य व कार्यक्षेत्र हा मुद्दा विचारात घेणेत यावा.

३) प्रपत्रामध्ये माहिती देताना शेतक-यांचा आधारकार्ड नंबर व बँकेचा खाते क्रमांक यांसह त्यांची पार्श्वभूमी, शिक्षण केलेले कार्य त्यामुळे इतर शेतक-यांना झालेला फायदा या तपशिलासह सबंधितांनी शासन / कृषि क्षेत्रात सहभाग घेणे आवश्यक आहे.

४) शासकीय किवा शासन अंगीकृत व सहकार संस्था(उदा.स्थानिक स्वराज्य संस्था, कृषि विद्यापिठे) यांच्या आस्थापनेवर काम करणारे किवा सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी पुरस्कारासाठी पात्र असणार नाही. तसेच केंदशासनाकडन किवा राज्य शासनाकडून किवा अंगीकृत संस्थेकडून कोणत्याही प्रकारचे नियमित मानधन घेणारी संस्था किवा व्यक्ती पुरस्कारासाठी पात्र असणार नाही.

५) सबंधिताने पूर्वी घेतलेल्या पुरस्काराचा तपशील, तसेच कृषि विभागाकडून किवा इतर विभागाकडून मिळालेल्या पुरस्काराचा तपशील प्रमाणपत्रासह सादर करणे आवश्यक आहे.

६) सबंधितानी जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या स्वाक्षरीचा चारित्र्याचा दाखला मूळ प्रतीत सादर करणे आवश्यक आहे.

७) जिजामाता कृषिभूषण पुरस्कारा साठी शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त शेतकर्‍यांनीच प्रस्ताव सादर करावा.

८) शासनाकडून दिल्या जाणा-या दोन पुरस्कारामधील अंतर किमान ५ वर्षा इतके असावे.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कारासाठी परीक्षण व निरीक्षण समिती खालील प्रमाणेः

जिल्हास्तर समिती

डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कारासाठी परीक्षण व निरीक्षण समिती

विभागस्तर समिती

डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कारासाठी परीक्षण व निरीक्षण समिती

आयुक्तालयस्तर समिती

डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कारासाठी परीक्षण व निरीक्षण समिती

निकष

१) कृषि क्षेत्रात संघटनात्मक कार्यकरणा-या व्यक्तीला किवा गटाला किवा संस्थेला पुरस्कार देणेत प्रास्तावीत करण्यात यावे. प्रास्तावीत गटाने किवा संस्थेने केलेले कार्य संपूर्ण राज्याला दिशादर्शक असावे.

२) प्रपत्रामध्ये माहिती देताना संबंधित शेतक-यांचे ई-मेल, वेबसाईट इत्यादी बाबींचा समावेश करुन त्याचे कार्य व कार्यक्षेत्र हा मुद्दा विचारात घेणेत यावा.

३) प्रपत्रामध्ये माहिती देताना शेतक-यांचा आधारकार्ड नंबर व बँकेचा खाते क्रमांक यांसह त्यांची पार्श्वभूमी, शिक्षण केलेले कार्य त्यामुळे इतर शेतक-यांना झालेला फायदा या तपशिलासह सबंधितांनी शासन / कृषि क्षेत्रात सहभाग घेणे आवश्यक आहे.

४) शासकीय किवा शासन अंगीकृत व सहकार संस्था(उदा.स्थानिक स्वराज्य संस्था, कृषि विद्यापिठे) यांच्या आस्थापनेवर काम करणारे किवा सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी पुरस्कारासाठी पात्र असणार नाही. तसेच केंदशासनाकडन किवा राज्य शासनाकडून किवा अंगीकृत संस्थेकडून कोणत्याही प्रकारचे नियमित मानधन घेणारी संस्था किवा व्यक्ती पुरस्कारासाठी पात्र असणार नाही.

५) सबंधिताने पूर्वी घेतलेल्या पुरस्काराचा तपशील, तसेच कृषि विभागाकडून किवा इतर विभागाकडून मिळालेल्या पुरस्काराचा तपशील प्रमाणपत्रासह सादर करणे आवश्यक आहे.

६) सबंधितानी जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या स्वाक्षरीचा चारित्र्याचा दाखला मूळ प्रतीत सादर करणे आवश्यक आहे.

डॉ. जे.के.बसू सेंद्रीय व आधुनिक शेती पुरस्कारासाठी परीक्षण व निरीक्षण समिती खालील प्रमाणे

तालुकास्तरीय समिती

डॉ. जे.के.बसू सेंद्रीय व आधुनिक शेती पुरस्कारासाठी परीक्षण व निरीक्षण समिती

जिल्हास्तरीय निवड समिती

 डॉ. जे.के.बसू सेंद्रीय व आधुनिक शेती पुरस्कारासाठी परीक्षण व निरीक्षण समिती

निकष

सेंद्रीय शेतीमध्ये उल्लेखनीय काम तसेच आधुनिक तत्रंज्ञानाचा वापर करुन शेतीचे उत्पादन करणारा सातारा जिल्हयातील कोणताही शेतकरी या पुरस्कारासाठी निवडीमध्ये भाग घेऊ शकेल. सदरचा पुरस्कार केवळ सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने देणेत येतो व त्याचे वितरण दरवर्षी १ जुलै या दिवशी केले जाते. डॉ.जे.के.बसू हे आंतरराष्ट्रीय किर्तीचे मृदा शास्त्रज्ञ होते.सन १९२५ ते १९४० या काळात मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगांव येथे त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील दक्षिण कालवा विभागातील ऊस जमिनीचे सर्वेक्षण करून ऊसाखालील जमिनींचे वर्गीकरण केले.सदर सर्वेक्षणानुसार त्यांनी अ,ब,क,ड,ह,फ या जमिनींच्याप्रकारान्‌ुसार ऊस लागवडीसाठी दोन सरीतील अंतर,पाण्याच्या पाळया,ऊसाचे वाण,खतांच्या मात्रा निश्चित करण्याचे संशोधनात्मक कामकाज केले.भारतात अशा प्रकारचे मृद सर्वेक्षण करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य आहे.जमिनीच्या प्रकारानुसार ऊसाकरीता केलेल्या सदरहू शिफारशी मुळे ऊसाचे उत्पादन वाढू लागले व त्याचा बहूसंख्य शेतकर्‍यांना होऊ लागला.अशा प्रकारे महाराष्ट्रातील मृद सर्वेक्षणाच्या कामाचा पाया डॉ.जे.के.बसू यांच्या कारकिर्दीत घालण्यात आला.सन १९९९-२००० मध्ये त्यांचे सुपुत्र मा.श्री.रतिकांत बसू यांनी सातारा जिल्हयास सहकुटुंब भेट दिली. त्याचवेळी पाडेगाव ऊस संशोधन केंद्रास देखील भेट देऊन सदर भेटीवेळी उपस्थित असलेले जिल्हा परिषदेचे तात्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री.दिलीप बंड यांचे कडे डॉ. जे.के.बसू यांचे स्मृती प्रिथ्यर्थ शेतकर्‍यांसाठी काही मदत करण्याचेमत मा.श्री.रतिकांत बसू यांनी व्यक्त केले.त्यास अनुसरून सातारा जिल्हयातील सेंद्रीय व आधुनिक शेती मध्ये उल्लेखनिय काम करणार्‍या शेतकर्‍यांसाठी डॉ. जे.के.बसू सेंद्रीय व आधुनिक शेती पुरस्कार देणेची संकल्पना बसू कुटुंबियांनी मान्य करून त्यासाठी त्यांनी रूपये १.०० लाखाची रक्कम कायम स्वरूपी ठेव जिल्हा परिषदेस सुपुर्द केली.सदर पुरस्कारासाठी व्यक्ती/संस्थांची निवड करणेसाठी मा.अध्यक्ष,जिल्हा परिषद यांचे अध्यक्षतेखाली निवड समिती निश्चित करण्यात आली आहे.जि.प.कडे सदरच्या ठेवीतून मिळणार्‍या व्याजाच्या रक्कमेतून पुरस्कारासाठी निवड होणार्‍या शेतकर्‍यांस बक्षिसाची रक्कम रोखीने दिली जात आहे.

७. यशवंतराव चव्हाण कृषि पर्यटन व यशवंतराव चव्हाण कृषि पर्यटन मित्र पुरस्कारः-

कृषि पर्यटन हा शेतीपुरक व्यवसाय करण्यास अत्यंत योग्य भौगोलिक परिस्थिती सातारा जिल्हयात आहे. सदरव्यवसाय करण्यासाठी अनेक शेतकरी जिल्हयात इच्छूक असून सध्या अनेक शेतकरी कृषि पर्यटन व्यवसायाकडे वळले आहेत. सातारा जिल्हा परिषदेमार्फत स्वयंस्फुर्तीने कृषि पर्यटनास चालना देण्याचा प्रयत्न करीत आहे. या व्यवसायामध्ये शास्त्रोक्त पध्दतीने काम केल्यास व्यवसाय किफायतशीर होऊ शकतो व शेतकर्‍यास शेती बरोबरच कृषि पर्यटन व्यवसायामधून देखील चांगला अर्थिक नफा मिळण्यास मदत होत आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या कृषि पर्यटनाच्या चालना देण्याच्या धोरणास जिल्हयातील शेतकरी चांगला प्रतिसाद देत आहे. कृषि पर्यटन व्यवसायामध्ये उल्लेखनिय काम करणार्‍या शेतकर्‍यांचा यशवंतराव चव्हाण कृषि पर्यटन गौरव पुरस्कार व कृषि पर्यटन व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न करणार्‍या शेतकर्‍यास यशवंतराव चव्हाण कृषि पर्यटनमित्र पुरस्कार या पुरस्काराने गौरविण्यासाठी सातारा जिल्हा परिषदेमार्फत सन२०१६-१७ पासून सुरूवात करण्यास हि सभा मंजूरी देत आहे. तसेच ??सदर पुरस्कारासाठी पुढील प्रमाणे कार्यपध्दती विहित करण्यात येत आहे.

पुरस्काराचे नांवः- यशवंतराव चव्हाण कृषि पर्यटन गौरव पुरस्कार व यशवंतराव चव्हाण कृषि पर्यटनमित्र पुरस्कार.

पुरस्कारासाठी पात्रता

कृषि पर्यटन व्यवसायामध्ये तसेच त्याचे प्रसारासाठी उल्लेखनिय काम करणारा सातारा जिल्हयातील कोणताही कृषि पर्यटन केंद्र चालक शेतकरी सदर पुरस्कारासाठी निवडीमध्ये भाग घेऊ शकेल.

पुरस्काराचे गुणांकनासाठी कार्यपध्दती

सदर पुरस्कार मागील ३ अर्थिक वर्षी शेतकर्‍याने केलेल्या कामकाजाचा कालावधी मुल्यांकनासाठी गृहीत धरण्यात येईल.मुल्यांकनासाठी कृषि विकास अधिकारी यांनी दोन्ही पुरस्कारांसाठी स्वतंत्र मुद्देनिहाय प्रपत्र विहित करावे व त्यामध्ये शेती बरोबर कृषि पर्यटनाच्यासर्वांगीन बाबींचा समावेश करावा.सदरचे प्रपत्राव्दारे एकूण ४५० गुणांचे गुणांकन करावे त्यापैकी १५० गुण पंचायत समितीस्तरावर तर ३०० गुण जिल्हास्तरावर देण्यासाठी निश्चित करावे.

पुरस्कारार्थीचे निवडीसाठी निवड समितीची रचना :-

सदरच्या दोन्ही ?पुरस्कार्थीचे निवडीसाठी पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावर समिती राहील. पंचायत समितीस्तरावर संबंधित पंचायत समितीचे सभापती यांचे अध्यक्षतेखाली गट विकास अधिकारी व कृषि अधिकारी पं.स. अशी एकूण ३ सदस्यीय समिती राहील.कृषि अधिकारी पं.स.सदर समितीचे सदस्य सचिव म्हणून कामकाज पाहतील.सदर समितीव्दारे प्राप्त प्रस्तावातील शेतकर्‍याचे कृषि पर्यटन केंद्राची/कामाची क्षेत्रीय पाहणी करून १५० गुणांपैकी योग्य गुण देऊन प्रस्ताव जि.प.ला सादर करतील. जिल्हास्तरावर मा.अध्यक्ष,जिल्हा परिषद सातारा यांचे अध्यक्षतेखाली, ?मा.सभापती, कृषि व पशुसंवर्धन समिती, अति.मुख्य कार्यकारी अधिकारी व कृषि विकास अधिकारी अशी एकूण ४ सदस्यांची समिती राहील. कृषि विकास अधिकारी जि.प.सदर समितीचे सदस्य सचिव म्हणून कामकाज पाहतील.सदर समितीव्दारे प्राप्त प्रस्तावातील शेतकर्‍याचे शेतीच्या व कृषि पर्यटन केंद्राच्या विकासाची क्षेत्रीय पाहणी करून ३०० गुणांपैकी योग्य गुण देतील.अशा रीतीने पं.स.स्तर अधिक जि.प.स्तर मिळून एकूण ४५० गुणांपैकी मिळालेले गुण एकत्र करून गुणानुक्रम निश्चित करावा व त्यामधून शेतकर्‍यांची पुरस्कारासाठी निवड कराव. पुरस्कार्थी निवडीची संख्या निश्चित करणेचा अधिकार समितीचे अध्यक्ष यांना राहतील.

पुरस्काराचे वितरण व कालावधीः-

पुरस्कारासाठी निवड झालेल्या पुरस्कार्थींना सातारा जिल्हा परिषदेमार्फत प्रमाणपत्र, स्मृतीचीन्ह, पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ यांचे सन्मानपुर्वक विरतण करावे???.पुरस्कार्थींना दरवर्षी १ जुलै या कृषिदिन कार्यक्रमामध्ये इत्यादींचे सन्मानपुर्वक वितरीत करावे.

जिल्हा परिषद स्वीय निधीतील व्यक्तीगत लाभाच्या योजना

जिल्हा परिषद स्वीय निधीमधून अल्प/अत्यल्प भुधारक शेतकरी/मागासवर्गीय शेतकरी/महीला शेतकर्‍यांना सायकल कोळपी,स्प्रेपंप,कडबाकुटी यंत्र,ताडपत्री, सुधारीत/संकरीत बियाणे,युरीया ब्रिकेट,गांडूळ कल्चर/खत,नारळ रोपे,पाईप, विद्यूत पंपसंच, डिझेल इंजिन इत्यादी बाबींचा ५० टक्के अनुदानावर लाभ देणेत येतो. तसेच जिल्हयातील विविध सहकारी ?संस्था/साखर कारखाने /कृषि उत्पन्न बाजार समित्या यांचेमार्फत आयोजित केल्या जाणार्‍या कृषि प्रदर्शनामध्ये जिल्हा परिषदेच्या वतीने सहभाग घेऊन कृषि उत्पादन वाढीचे तंत्रज्ञानाचा प्रसार व प्रचार करणेत येतो. त्याचप्रमाणे सन २०१४-१५ पासून जिल्हयात कृषि पर्यटन व्यवसायाच्या माध्यमातून शेतकर्‍यांना अर्थिकफायदा मिळविण्याच्या दृष्टीकोनातून कृषि पर्यटनास चालना देणे करीता जिल्हा परिषदेच्या स्विय निधीमधून शेतकर्‍यांना अर्थसहाय्य देणेची नाविन्यपुर्ण योजना राबविण्यात येत आहे.

८) नाविन्यपूर्ण योजना अतंर्गत कृषि पर्यटन केंद्र प्रशिक्षण

सातारा जिल्हा हा पर्यटनाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. परंतू शेती क्षेत्र ही पर्यटनाचे स्थळ होऊ शकेल. यातुन कृषि पर्यटनच्या संकल्पनेचा उदय झाला. या योजनेची वैशिष्टये

१) कृषि विज्ञान केंद्रव्दारे प्रशिक्षणाचे आयोजन.

२) महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ येथे कृषि संलग्न विभागासोबत कार्यशाळेचे आयोजन.

३) जिल्हा परिषद स्वनिधी मधून कृषि पर्यटनास चालना देणेची योजना.

९) नाविन्यपुर्ण योजना अंतर्गत सातारा ऑरगॅनिक उपक्रमास चालना देणे :-

देशात हरित क्रांतीनंतर अन्नधान्य व कृषि उत्पादन वाढीसाठी सुधारित,संकरीत जातीच्या बियाणेचा वापर वाढला तसेच अधिक उत्पादन काढण्यासाठी सिंचन सुविधा, रासायनिक खतांचा वापर, पिकांवरील किड/रोगांचे नियंत्रणासाठी किटकनाशके/बुरशीनाशके यांचा वापर शेतकरी मोठया प्रमाणावर करु लागले, सुरवातीच्या काळात रासायनिक खताला प्रतिसाद मिळाल्याने कृषि उत्पादनात देखील मोठया प्रमाणावर वाढ झाली. परंतु मर्यादित क्षेत्रातुन अधिकाअधिक कृषि उत्पादन वाढीसाठी शेतक-यांमध्ये स्पर्धा होऊन रासायनिक खते, किटकनाशके व सिंचनाचा अतिरिक्त वापर होऊान लागला आहे. त्याचे दुष्परिणाम गेल्या काही वर्षापासून दिसून येत आहे. जमिनीचे आरोग्य बिघडून शेती उत्पादनामध्ये रासायनिक खतांचे, किटकनाशकांचे अंश राहिल्याने विषयुक्त अन्नाचे सेवन होऊन लोकांच्या आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत.

या दुष्पपरिणामांवर उपाययोजना म्हणून सेंद्रीय शेतीपध्दतीचा अंगीकार करणे ही काळाजी गरज निर्माण झालेली आहे.

त्यासाठी सेंद्रीय शेतीचे महत्व पटवून देणे, सेंद्रीय कृषि उत्पादनांचे आरोग्याच्या दृष्टिने फायदे, विषमुक्त अन्न म्हणजे काय, सेंद्रीय शेतीस प्रोत्साहन देणे, सेंद्रीय शेतमालास बाजारपेठ उपलब्ध करुन देणे, सेंद्रीय शेती बाबत तज्ञांमार्फत शालेय वि'ार्थ्यांना सेंद्रीय शेती कशी व का करायची याचे महत्व पटवून देण्यासाठी प्रशिक्षण देणे इत्यादी साठी सातारा जिल्हा परिषदेमार्फत सन २०१५-१६ पासून सातारा ऑरगॅनिक हा नाविन्यपुर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. सातारा ऑरगॅनिक उपक्रमातंर्गत तालुक्यात सेंद्रीय शेती करणारे ३२ शेतक-यांची तालुका तज्ञ मार्गदर्शक म्हणून नेमणुक करण्यात आली आहे. या उपक्रमाअंतर्गत वर नमुद केले प्रमाणे सेंद्रीय शेतीच्या विविध संकल्पना शालेय विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शेतक-यांचे शेतावर पाहण्यास व अनुभवन्यास मिळणेसाठीशालेय वि'ार्थ्याच्या सहलीचे आयोजन करणेत आले आहे. शालेय विद्यार्थ्याना मार्गदर्शन केल्याचे मोबदल्यात त्यांना कृषि विभागा मार्फत मानधनपोटी अनुदान ही देण्यात येत आहे. योजनेतंर्गत नेमणुक केलेल्या मार्गदर्शक तज्ञावर विविध जबाबदा-या निश्चित करणेत आल्या आहेत.

योजनेचा उद्देशः-

शालेय विद्यार्थ्यांना सेंद्रीय शेतीचे महत्व पटवून देऊन सेंद्रीय कृषि उत्पादन घेण्याबाबतच्या संकल्पनेचा विस्तार घरोघरी पोहचविणे हा प्रमुख उद्देश प्रस्तावित योजनेमधून साध्य करावयाचा आहे. सेंद्रीय शेतीच्या विविध संकल्पना शालेय वि'ार्थ्यांना प्रत्यक्ष शेतक-यांचे शेतावर पाहण्यास व अनुभवन्यास मिळणेसाठी विद्यार्थ्याच्या सहलींचे आयोजन तालुक्यासाठी नेमलेल्या तज्ञ मार्गदर्शक शेतक-यांचे शेतावर करणेत आले आहे.जेणेकरुन विद्यार्थी सेंद्रीय शेतीची संकल्पना आत्मसात करतील तसेच सेंद्रीय शेतीचे महत्व वाढीस लागेलव त्याचा प्रचार व प्रसार करतील.

जिल्हा परिषद सेस निधी मधून शेतकर्‍यांना व्यक्तीगत लाभाच्या खालील प्रमुख योजनांचा लाभ देण्यात येतो.

१) शेतकर्‍यांना अनुदानावर कडबाकुट्टी यंत्र वाटप योजना :-

जनावरांना वापरण्यात येणार्‍या चार्‍याची उपयुक्तता वाढविणेसाठी जिल्हा परिषदेच्या सेस निधीमधून शेतकर्‍यांना ५० टक्के अनुदानावर कडबाकुट्टी यंत्राचे वाटप करण्यात येते.यामध्ये अल्प,अत्यल्प भुधारक शेतकरी,महीला शेतकरी,अपंग शेतकरी व मागासवर्गीय शेतकर्‍यांना प्राधान्य दिले जाते.

२) शेतकर्‍यांना अनुदानावर सिंचन साहीत्याचे वाटप करणेची योजना :-

ज्या शेतकर्‍यांकडे पिकांना पाणी देण्यासाठी सिंचन सुविधा उपलब्ध आहे अशा गरजू शेतकर्‍यांना विद्यूतपंपसंच,डीझेल इंजिन अथवा पेट्रोडीझेल इंजिन तसेच एचडीपीई पाईप सारख्या सिंचन साहीत्याचे ५० टक्के अनुदानावर वाटप केले जाते. यामध्ये अल्प,अत्यल्प भुधारक शेतकरी,महीला शेतकरी,अपंग शेतकरी व मागासवर्गीय शेतकर्‍यांना प्राधान्य दिले जाते.

३) शेतकर्‍यांना अनुदानावर ताडपत्री वाटप योजना :-

धान्याचे पावसापासून संरक्षण करणे, मळणी वेळी धान्याची साठवणूक करणे इत्यादी साठी शेतकर्‍यांना ५० टक्के अनुदानावर ताडपत्रींचे वाटप जिल्हा परिषद सेस योजनेमधून केले जाते. यामध्ये अल्प,अत्यल्प भुधारक शेतकरी,महीला शेतकरी,अपंग शेतकरी व मागासवर्गीय शेतकर्‍यांना प्राधान्य दिले जाते.

४) शेतकर्‍यांना अनुदानावर सुधारीत/संकरीत बियाणे वाटप योजना :-

बियाणे बदलाचा दर वाढवून पिकांचे प्रति हेक्टरी उत्पादकता वाढविणेसाठी शेतकर्‍यांना ५० टक्के अनुदानावर भात,ज्वारी,बाजरी,मका,सोयाबीन,भुईमुग,वाटाणा,घेवडा इत्यादी पिकांचे संकरीत/सुधारीत वाणाचे बियाणेचे वाटप केले जाते. यामध्ये अल्प,अत्यल्प भुधारक शेतकरी,महीलाशेतकरी,अपंग शेतकरी व मागासवर्गीय शेतकर्‍यांना प्राधान्य दिले जाते.

५) शेतकर्‍यांना अनुदानावर पिक संरक्षण आयुधांचे वाटप करणेची योजना :-

पिकांचे किड व रोगा पासून संरक्षण करणेसाठी शेतकर्‍यांना बॅटरी ऑपरेटेड स्प्रेपंप,इंपोर्टेड स्प्रेपंप,एचटीपी स्प्रेपंप इत्यादी पिक संरक्षण आयुधांचे वाटप ५० अनुदानावर वाटप केले जाते. यामध्ये अल्प,अत्यल्प भुधारक शेतकरी,महीला शेतकरी,अपंग शेतकरी व मागासवर्गीय शेतकर्‍यांना प्राधान्य दिले जाते.

६) शेतकर्‍यांना अनुदानावर सायकल कोळप्यांचे वाटप योजना :-

पिकातील आंतरमशागतीचे काम करणे,तण नियंत्रण करणे यासाठी शेतकर्‍यांना ५० टक्के अनुदानावर सायकल कोळप्यांचे वाटप केले जाते. यामध्ये अल्प,अत्यल्प भुधारक शेतकरी,महीला शेतकरी,अपंग शेतकरी व मागासवर्गीय शेतकर्‍यांना प्राधान्य दिले जाते.

७) शेतकर्‍यांना कृषि पर्यटनासाठी प्रोत्साहनदेणेची योजना :-

कृषि पर्यटनास चालना देणेसाठी व सदरचा व्यवसाय शास्त्रोक्त पध्दतीने करणेसाठी इच्छूक शेतकर्‍यांना कृषि पर्यटना संबंधीचे तज्ञ व्यक्तींकडून ३ दिवसांचे निवासी प्रशिक्षण कृषि विज्ञान केंद्राचे ठीकाणी दिले जाते.कृषि पर्यटन व्यवसायामध्ये शेतकर्‍यांना येणार्‍या अडीअडचणी सोडविण्यासाठी सर्व संबंधितांची शेतकर्‍यां समवेत चर्चा घडवून आणणेसाठी सभा,चर्चासत्रांचे आयोजन देखील जिल्हा परिषदे मार्फत केले जाते.

८) शेतकर्‍यांना सेंद्रीय शेतीस प्रोत्साहन देणेच्या योजना :-

सेंद्रीय शेतीचे उत्पादनासाठी शेतकर्‍यांना प्रोत्साहन देणे करीता सातारा ऑरगॅनिक या नावाने जिल्हा परिषदे मार्फत सन २०१५-१६ पासून नाविन्यपुर्ण उपक्रम राबविला जात आहे.यामध्ये शेतकर्‍यांच्या सहभागातून सेंद्रीय शेत मालाची विक्री करण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत सातारा येथे प्रायोगिक तत्वावर विक्री केंद्र सुरू करूनदेण्यात आले आहे त्याच प्रमाणे या उपक्रमांतर्गत शेतकर्‍यांचे चर्चासत्र,मेळावे,प्रशिक्षण व क्षेत्रीय भेटींचे आयोजन देखील करण्यात येत आहे.

eXTReMe Tracker
सातारा कराड वाई महाबळेश्वर जावली पाटण कोरेगांव खटाव फलटण खंडाळा माण