फलटण तालुका

फलटण तालुका

फलटण

पूर्वी या गावात मोठ्या प्रमाणात फळफळावर पिकत होती. यावरुन फलस्थानचे फलटण हे नाव पडले. फलटणचे नाईक निबाळकर हे घराणे ७५० ते ८०० वर्षापूर्वीचे प्राचीन घराणे आहे. मालोजी राजे व शिवाजी राजे यांना या घराण्यातील अनुक्रमे दिपाबाई व सईबाई या मुली दिल्या होत्या. तसेच शिवाजी महाराजांची मुलगी या घराण्यात दिली होती. म्हणजे हिदवी स्वराज्याशी नातेसंबंध असलेले घराणे आहे. फलटण शहरातील श्रीराम मंदीर हे फलटण शहराचे भूषण आहे. फलटणचे श्रीराम मंदिर २२५ वर्षापूर्वीचे आहे. मंदीराभोवतीउंच दगडी भित आहे. भव्य प्रवेशव्दारातून आत प्रवेश केल्यावर डाव्या बाजूला राजवाडा तर उजव्या बाजूला श्रीरामाचे मंदीर आहे. मंदीर पूर्वाभिमुख असून मंदीरासमोर तीन दीपामाला आहेत. गाभार्‍यातील राम लक्ष्मण व सीता यांच्या मुर्ती नयन मनोहर आहेत. हेमाड पंती शैलीतील मंदीर असून याचे शिखर व कहस अत्यंत प्रेक्षणीय आहेतच् श्रीराममंदीराला लागूनच राधाकृष्णा,एकमुखी दत्त व गरुड यांची मंदीरे आहेत. त्याच्या उत्तरेला शेजारी दत्तात्रयाचे मंदीर असून श्रीमंत मुदोजीराव नाईक यांनी बांधले आहे. त्याचबरोबर जैन धर्मियांचे वास्तव्य व त्यांची मंदिरे मोठ्या प्रमाणात आहेत.

जबरेश्वर मंदीर

श्रीराम मंदीराजवळ काही अंतरावा रस्त्याच्या मधेमध जबरेश्वराचे प्राचीन मंदीर आहे. हे हेमांडपंथी शैलीतील मंदीर, त्यावरील शिल्पाकृती व दगडावरील बारीक कलाकुसर विशेषत्वाने नजरेत भरते. हे मंदीर एकाच प्रचंड आकाराच्या शिलेमधून कोरुन काढल्यासारखे भासते. गाभार्‍यातील पिड चौकोनी आकाराची असून तिचे तोंड पूर्वेकडे आहे. पिडीवर दोन शाळुंका असून त्यांचा आकारही वेगळा आहे. अशा प्रकारची पिड सहसा कोठे आढळत नाही. गाभार्‍यच्या प्रवेश व्दाराशेजारी पाच फण्यांची नागीण व तिचे दोन पिल्ले यांची मुर्ती आहेच् तर उजव्या बाजूला कोनाडयात विठ्ठल-रुक्मीणी, नंदी, कासव, गणपती अशा मुर्ती आहेत. या बंदीस्त सभागृहाचा आकार गोलाकार आहे.

संतोषगड

या गडालाच किल्ले ताथवडा असे म्हणतात. संतोषगड हा फलटणपासून २० कि.मीऋ अंतरावर आहे. हा किल्ला मध्यम आकाराचा असला तरी भक्कम आहे. त्याची बांधणी खुद्द छत्रपती शिवरायांनी केली आहे. संतोषगड आपल्याला तीन टप्प्यात चढावा लागतो. पहिला टप्पा चढल्यावर आपण एका मठात पोहोचतो तिथे एक साधुमहाराज आपले स्वागत करतील. त्यांच्या माताजीचे प्रवचनपर उपदेश एकण्याचा लाभा पर्यटकांना घेता येईल. या मठाजवळ तीन गुहा असून तयात एक तळे आणि एक मुर्ती दिसते. ठिसर व चढणीचा डोंगर चढून दुसर्‍या टप्प्यावर आल्यावर दोन प्रवेश व्दारातून जाताना मारुतीचे मंदीर दिसते. गडाच्या तिसर्‍या टप्प्यावर बालेकिल्ला आहे. तेथे तातोबा महादेवाचे मंदीर पाहण्यासारखे आहे. गडावर अनेक भुयारे व गुहा आहेत. या भुयार्‍यंाच्या मार्गात पाण्याचा भरपूर साठा आहे.

सीतामाईचा डोंगर

उत्तर रामायण घडलेले हेच ठिकाण आहे. अशी या भागातील स्त्रीयांची श्रघ्दा आहे. सीमाबाई, लव-कुश व वाल्मिकी ऋषींच्या वास्तव्याच्या पाऊलखुणा येथे आढळतात. एकट्या सीतेचे मंदिर केवळ येथेच पहावयास मिळते. माणगंगा व बाणगंगा नद्या येथून उगम पावतात.