समर्थ रामदास स्वामी स्थापित सातारा जिल्हयातील मारुती

समर्थ रामदास स्वामी स्थापित सातारा जिल्हयातील मारुती

शिष्यांना आणि लोकांना एकत्र आणून त्यांच्यात परस्पराविषयी आत्मियता निर्माण व्हावी म्हणून समर्थांनी रामजन्माचे व हनुमान जयंतीचे उत्सव सुरु केले. अशा उत्सवांसाठी त्यांनी मोक्याच्या ठिकाणी ११ तारुतींची स्थापना केली. तयापैकी ७ मारुती सातारा जिल्हयात आहेत ते खालील प्रमाणे-

शहापूरचा मारुती

शके १५६६ मध्ये स्थापन झालेली आहे. कराड-मसूर रस्त्यावर सुमारे नऊ ते दहा कि.मी अंतरावर शहापूरचा फाटा असून मुख्य रस्त्यापासून मारुतीचे मंदिर दोन फर्लांग आत आहे. येथील मारुतीची मूर्ती चुन्यापासून बनविलेली आहे, म्हणून चुन्याचा मारुती म्हटले जाते. मूर्तीची उंची ६ फूट आहे.

महारुद्र मारुती मसूर

मसूरच्या ब्रम्हपुरीभागात शके १५६६ मध्ये या मारुतीची स्थापना केली. समर्थस्थापित अकरा मारुतीत ही सर्वात देखणी मुर्ती आहे.

दास मारुती चाफळ

श्रीरामाच्या समोर दोन्ही कर जोडून उभा असलेला हा मारुती म्हणजे श्रीरामासमोर नम्रपणे उभा असलेला दूतच आहे. प्रभु रामचंद्रास समोर नम्र हणुमंतांची मूर्ती असली पाहिजे म्हणून समर्थांनी सुंदर दगडी मंदिर बांधून त्यात दास मारुतीची स्थापना केली. मूर्तीची उंची ६ फूट आहे. दासमारुतीसाठी समर्थांनी बांधलेले मंदिर आज ही उत्तम स्थितीत आहे.

खडीचा मारुती शिगणवाडी

शके १५७१ मध्ये या मूर्तीची स्थापना झाली. सव्वा तीशने वर्षापूर्वी या मारुतीला खडीचा मारुती अथवा बालमारुती असेही म्हणतात.

मठातील मारुती उंब्रज

या मारुतीची स्थापना १५७० मध्ये झाली. समर्थ रामदास चाफळहून रोज उंब्रज येथे स्नानाला जात म्हणून येथे मारुतीची स्थापना झाली. समर्थांनी मारुती मंदिर व त्या पाठोपाठ मठ ही स्थापना केला. हा मारुती समर्थांच्या अकरा मारुतीतील सर्वात वयाने लहान असलेला बाल मारुती वाटतो.

माजलगांवचा मारुती, माजलगांव

चाफळपासून दिड मैलाच्या अंतरावर माजलगाव या गावी हा मारुती आहे. या मारुतीच्या स्थापनेविषयी दंतकथा सांगतात की, या गावाच्या शिवेवर साधारण घोडयाच्या आकाराचा एक मोठा दगड होता. या दगडाचीच लोक ग्रामरक्षक मारुती म्हणून पूजा करीत असत. नंतर समर्थांच्या हस्ते त्यांची प्रतिष्ठापना करण्यात आली.

प्रताप मारुती चाफळ

श्रीराम मंदिराच्या मागे सुमारे ३०० फूट अंतरावर प्रताप मारुतीचे मंदिर आहे. या मारुतीला भीम मारुती किवा वीर मारुती असेही म्हटले जाते. या मंदिराला ५० फूट उंच शिखर आह. मूर्तीची उंची सात ते आठ फूट आहे. मूर्ती भीमरुपी महारुद्र या स्त्रोतात समर्थांनी वर्णन केल्याप्रमाणे पुच्छ माथा मुरडिलेङ या स्थितीत आहे. या व्यतिरिक्त मनपाडळे, पारगाव (जिल्हा कोल्हापूर), शिराळे बहे बोरगाव (जिल्हा सांगली) या ठिकाणी अकरापैकी चार मारुती आहेत