कोरेगांव तालुका

कोरेगांव तालुका

रहिमतपूर

तालुका ठिकाण कोरेगाव असले तरी ते लहान असल्यामुळे तेथे ग्रामपंचायत आहे. रहिमतपूर मोठे असल्याने तेथे नगरपालिका आहे. ब्रिटिश काळात रहिमतपूर हेच तालुक्याचे ठिकाण होते. तेथे सर्व शासकीय कार्यालये होती. पण ब्रिटिशांनी सोयीसाठी शासकीय कार्यालये कोरेगावाला हलवली. तेंव्हापासून कोरेगाव हे तालुक्याचे ठिकाण आहे.

कण्हेर खेड

तालुका कोरेगाव ग्वाल्हेरच्या शिदे राजवंशाचे मूळगांव, राणोजीराव हे या घराण्याचे मूळ पुरुष. श्रीमंत महादजी शिदे यांचे स्मारक. स्वर्गीय माधवराव शिदे यांनी १९९८ साली या गावास भेट दिली. या गावास भेट देणारे ग्वाल्हेरचे ते पहिले राजे होते.

मारुती मंदिर जरंडेश्वर

सातारा, कोरेगाव मार्गाच्या मध्यावर जरंडेश्वर पर्वत आहे. येथीला मारुतीची स्थापना समर्थांनी केली असून मारुतीचे मंदिर, मंडप, धर्मशाळा, गोविदबाबा सिधये नावाच्या हनुमान भक्ताने बांधली आहेत. गोविद बाबांना हनुमानाचा साक्षात्कार झाला असे सांगितले जाते.

चंदनगड, वंदनगड

हे दोन गड कोरेगाव तालुक्याच्या सरहद्दीवर आहेत. हे गड जुळे असल्याने त्यांना चंदन, वंदन या पावाने ओळखले जाते. चंदनगडाची उंची २२०० फूट असून चारही बाजूला उंच शिळा आहेत. गडावर विस्तृत मैदान असून गैसपाक बाबांचा भव्य दर्गा आहे.

कल्याणगड

कोरेगाव पासून १३ कि.मी. अंतरावर हा किल्ला आहे. याला नांदगिरीचा किल्ला म्हणून ओळखतात. पन्हाळयाच्या शिलाहार वंशीय राजा दुसरा भोज याने १२ व्या शतकात हा किल्ला बांधला. इ.स.१६७३ साली छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याने तो जिकून घेतला. नांदगिरी हे येथील परगण्याचे मुख्य ठाणे होते. मराठेशाहीत ते तालुक्याचे ठिकाण होते. कल्याणगड चढताना अर्ध्या वाटेवर पाण्याची खांब टाक लागते. गड चळून गेल्यावर प्रथम उत्तराभिमुख प्रवेशव्दार लागते. तयातून आत गेल्यावर तटाशेजारुन खाली जाणारी वाट लागते. पुढे सुमारे ३० मीटर लांबीचे एक भुयार लागते. या भुयारात कायम गुडघाभर स्वच्छ असे पाणी असते. आतमध्ये ९ व्या शतकात स्थपलेली जैन तीर्थकार पार्श्वनाथ यांची मुर्ती आहे. त्याचजवळ देवीची मुर्ती आहे. तर डाव्या बाजूला दत्तात्रयाची मुर्ती आहे. या सर्व मुर्ती सुबक आणि रेखीव आहेत. या गुहेला या मुर्तीमुळेच पारसनाथ गुहा अथवा दत्त गुहा असे म्हणतात.

गोपाळनाथ समाधी, त्रिपुटी

नाथसिध्द श्री गोपाळनाथ महाराजांच्या वास्तव्यामुळे पवित्र झालेले त्रिपुटी गाव. या ठिकाणी गोपाळनाथंची समाधी व मठ आहे. गोपाळनाथंनी घ्वेदान्त शिरोमणीङ हा ग्रंथ लिहिला. त्यांच्या हैबती नावाच्या शिष्याने नाथलीला विलास हा ग्रंथ लिहून त्यामध्ये गोपाळनाथ यांचे सविस्तर वर्णन केले आहे.

महादेव मंदिर, चिमणगांव

कोरेगाव पासून चार मैलावर चिमणगांव आहे या गावात हेमांडपंथी शैलीत बांधलेले महादेवाचे मंदिर आहे. तसेच समर्थांनी स्थापन केलेल्या प्रसिध्द मारुती पैकी एक मारुती मंदिर येथे आहे. दरवर्षी श्रावण महिन्यातील शनिवारी येथे यात्रा भरते.